*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना ( ISO) चे 9001-2015 जागतीक मानांकन प्राप्त*=

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास   आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना ( ISO) चे 9001-2015 जागतीक मानांकन प्राप्त*
================
दिनांक 26 जानेवारी :
जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन तथा    आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना,या संस्थेकडून आय.एस.ओ.9001-2015 जागतीक मानांकन आज प्राप्त झाले आहे.त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा,हे सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने प्रमाणित केलेले पहिले महाविद्यालय  ठरले आहे.
आज दिनांक 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक
दिनाच्या मंगल प्रसंगी या महाविद्यालयास 
"आय. एस.ओ.9001-2015" प्रमाणपत्र वितरण समारंभ पार पडला.यावेळी पुणे येथील आय एस.ओ .संस्थेचे सल्लागार श्री. अनिल येवले यांच्या हस्ते महाविद्यालयाला  आय.एस.ओ.नामांकन प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते.तर विचारपीठावर उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे, आय.एस.ओ चे लेखाधिकारी माननीय संदिप कोठुळे उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी म्हणाले की, " आमदार शशिकांत शिंदे साहेब यांनी जावली तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन या महाविद्यालयाची उभारणी केली आहे.तर उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे व आपण सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन,या  महाविद्यालयाचा अल्पावधीतच शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात,गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात आपला ठसा उमटवला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण
देण्याबरोबरच दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यासाठी महाविद्यालय सातत्याने पाठपुरावा करत आहे ही अभिमानाची बाब आहे.आगामी काळात महाविद्यालयात विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कौशल्य आत्मसात करणारे कोर्सेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.आपण सर्वांनी या महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासाचा पाया रोवला आहे. इथून पुढेही हे ज्ञानदानाबरोबर विध्यार्थी हा घटक केंद्रिभूत मानून,महाविद्यालय व संस्थेचा नवलौकिक वृद्धिंगत करावा "
अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ.संजय धोंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तर आय. एस. ओ.समितीचे समन्वयक प्रा.डॉ.विनोद पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी या कार्यक्रमास सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.शेवटी प्रा.शंकर गेजगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

*तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष व महिला गटात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय अव्वल स्थानावर*सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत दि .३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे ज्युनियर कॉलेजचे १९ वर्षाखालील गटात खो - खो स्पर्धेत मुली व मुले यांनी प्रथम क्रमांक मिळविला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघाची निवड झाली .मामुर्डी ता.जावली या ठिकाणी सदर स्पर्धा पार पडल्या असून स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री. तेजेस जाधव व शारीरिक शिक्षण संचालक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले . महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी तसेच उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांना जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.