आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात संपन्न

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात संपन्न
=================
 जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत
शिंदे महाविद्यालय मेढा येथे, भारताचा 74 व्या प्रजासत्ताक दिन उत्साही व आनंदी वातावरणात संपन्न झाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.याप्रसंगी उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे व उद्योजक मा. संजय जुनघरे उपस्थित होते.
ध्वजारोहण,राष्ट्रगीत,ध्वजगीत व  ध्वजवदंन झाल्यानंतर प्राचार्य डॉ.अशोक गिरी यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले की,
 " विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील नागरिकांना,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहून 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशास अर्पण केली व आजच्या दिनी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी,या राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु झाला. तो दिन म्हणजे हा प्रजासत्ताक दिन आज आपण साजरा करत आहोत. संविधानाने आपल्याला समान हक्क दिले आहेत.
आपल्या लाभलेले हक्क व कर्तव्यांचा वापर देशहितासाठी करून शांतता,समता व बंधुता ही मूल्ये जोपासावी व आपल्या हक्कांचा वापर करत असतांना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवावी " असा मौलिक संदेश दिला.
त्याचबरोबर महाविद्यालयाच्या मागील कारकिर्दीचा आढावा घेताना ते पुढे म्हणाले,
" संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या दूरदृष्टी व कार्यकुशलतेमुळे विस वर्षांपूर्वी हे महाविद्यालय स्थापन झाले. आपल्या जावळी तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील शेतकरी,शेतमजूर व माथाडी कामगार यांच्या मुला - मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून हा निर्णय घेतला आणि आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नाने आज त्यास मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.इथून पुढेही  यशाची ही चढती कमान अशीच सुरु ठेवून,आपण सर्वांनीच आमदार साहेबांच्या स्वप्न व ध्येयपूर्तीसाठी आपण सर्वांनी शैक्षणिक, क्रीडा व कला क्षेत्रात यश संपादन करून आपल्या महाविद्यालाचा नावलौकिक वाढवावा " असे आवाहन करून त्यांनी प्रजासत्ताकदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रध्वजास  सर्व उपस्थितांनी मानवंदना दिली. तसेच विध्यार्थीनी विविध देशभक्तीपर गीते सादर केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिमखाना विभाग प्रमुख प्रा.प्रमोद चव्हाण यांनी केले.यावेळी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या विध्यार्थ्यांकडून मतदार जागृतीची प्रतिज्ञा वदवून घेण्यात आली.प्रा.गायत्री जाधव यांनी प्रतिज्ञा वाचन केले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे कॉमर्स विभाग प्रमुख प्रा.अमेय देसाई यांनी,त्यांच्या आई कै.प्रा.शकुंतला आत्माराम देसाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महाविद्यालयातील पन्नास हुशार व गरीब विध्यार्थी-विध्यार्थिनींना दरवर्षी मोफत एस. टी.पास.शिष्यवृत्ती घोषित केली व प्रतिनिधिक स्वरूपात,
कु.प्रिया गोळे व कु. अक्षदा जाधव या दोन विध्यार्थिनींना,
प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी सर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी एन. एस. एस. प्रमुख प्रा.डॉ.संजय भोसले यांनी आभार मानले.अशा प्रकारे हा प्रजासत्ताकदिन उत्साहात संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.