" *आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही* " प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी ∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞ " आजच्या युगात ज्ञानाला खूप महत्व आहे,हे ज्ञान गुरुबरोबरच ग्रंथसंपदेत भरून उरले आहे.आपल्याला आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही. " असे मत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी व्यक्त केले. महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या वतीने, माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती. प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, "आज ज्या महान व्यक्तीची जयंती आज आपण साजरी करत आहोत,त्यांना लहानपनापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती.डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवनामध्ये शिक्षणाच्या परिस्पर्श झाल्यामुळे तसेच जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, अभ्यासातील सातत्य व सकारात्मक दृष्टि...