*थोर व्यक्तींच्या विचारांचा वारसा युवापिढीने पुढे चालवावा*."*प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी*.=========================मेढा 2 ऑक्टोबर 2023 - " थोर व्यक्तींच्या विचारांची युवा पिढीने जपणूक करून, देश विकासासाठी आपला हातभार लावला पाहिजे आणि त्यांच्या विचारांचा वारसा आता युवा पिढीने पुढे चालवावा तीच खरी या महामानवांना खरी आदरांजली ठरेल " असे प्रतिपादन प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी यांनी केले. आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली.त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की," महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यात खडतर प्रवास सहन करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.त्यांना दक्षिण आफ्रिकेत ते रेल्वे मध्ये बसले असता,वर्णभेद मानणाऱ्या गोऱ्या लोकांनी रेल्वेमधून ढकलून दिले होते आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये वर्णभेद निर्मूलन झाले पाहिजे असा विचार आला.या उद्देशाने त्यांनी साऊथ आफ्रिकेत राहून,काळा गोराभेदाच्या विरोधात उठाव केला.भारतात परत आल्यानंतर त्यांनी वकिलीचा व्यवसाय न करता,देश स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात उडी घेतली व देशातील जनतेला जागृत करून,देश स्वतंत्र होईपर्यंत,ते अहिंसा,सत्य व शांततेच्या मार्गाने लढत राहिले.म्हणूनच आपला देश स्वतंत्र झाला. याच स्वतंत्र भारताचे तृतीय भूतपूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचीही आज जयंती आहे हे सुद्धा मूर्ती लहान पण कीर्ती महान असे व्यक्तिमत्व होते . शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि म्हणूनच भारताचा विकास हा भारतातील शेतीच्या विकासावरती आधारित आहे व भारत देशातील युवकांवर ते आधारलेला भारत देश आहे म्हणूनच लालबहादूर शास्त्री यांनी 'जय जवान, जय किसान' हा नारा दिला आणि त्यांनी शेतकरी, जवान व भारतीय जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले.या दोन्ही महापुरुषांचे योगदान आपल्याला कधीच विसरता येणार नाही "असे सांगून, राष्ट्रपिता महात्मा गांधी वं पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जीवनातील मौल्यवान आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.उदय पवार तर आभार डॉ. संजय भोसले यांनी मानले.============

*थोर व्यक्तींच्या विचारांचा वारसा युवापिढीने पुढे चालवावा*."
*प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी*.
=========================
मेढा 2 ऑक्टोबर 2023 - 
" थोर व्यक्तींच्या विचारांची युवा पिढीने जपणूक करून, देश विकासासाठी आपला हातभार लावला पाहिजे आणि  त्यांच्या विचारांचा वारसा आता युवा पिढीने पुढे चालवावा तीच खरी या महामानवांना खरी आदरांजली ठरेल " असे प्रतिपादन प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी यांनी केले.
  आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली.त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की," महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यात खडतर  प्रवास सहन करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.त्यांना दक्षिण आफ्रिकेत ते रेल्वे मध्ये बसले असता,वर्णभेद मानणाऱ्या गोऱ्या लोकांनी रेल्वेमधून ढकलून दिले होते आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये वर्णभेद निर्मूलन झाले पाहिजे असा विचार आला.या उद्देशाने त्यांनी साऊथ आफ्रिकेत राहून,काळा गोराभेदाच्या विरोधात उठाव केला.
भारतात परत आल्यानंतर त्यांनी वकिलीचा व्यवसाय न करता,देश स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात उडी घेतली व देशातील जनतेला जागृत करून,देश स्वतंत्र होईपर्यंत,ते अहिंसा,सत्य व शांततेच्या मार्गाने लढत राहिले.म्हणूनच आपला देश स्वतंत्र झाला. याच स्वतंत्र भारताचे तृतीय भूतपूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचीही आज जयंती आहे हे सुद्धा मूर्ती लहान पण कीर्ती महान  असे व्यक्तिमत्व होते . शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि म्हणूनच भारताचा विकास हा भारतातील शेतीच्या विकासावरती आधारित आहे व भारत देशातील युवकांवर ते आधारलेला भारत देश आहे म्हणूनच लालबहादूर शास्त्री यांनी  'जय जवान, जय किसान' हा नारा दिला आणि त्यांनी शेतकरी, जवान व भारतीय जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले.या दोन्ही महापुरुषांचे योगदान आपल्याला कधीच विसरता येणार नाही "असे सांगून, राष्ट्रपिता महात्मा गांधी वं पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जीवनातील मौल्यवान आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.उदय पवार तर आभार डॉ. संजय भोसले यांनी मानले.
============

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.