" *आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही* "प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞" आजच्या युगात ज्ञानाला खूप महत्व आहे,हे ज्ञान गुरुबरोबरच ग्रंथसंपदेत भरून उरले आहे.आपल्याला आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही. " असे मत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी व्यक्त केले.महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या वतीने, माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, "आज ज्या महान व्यक्तीची जयंती आज आपण साजरी करत आहोत,त्यांना लहानपनापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती.डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवनामध्ये शिक्षणाच्या परिस्पर्श झाल्यामुळे तसेच जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, अभ्यासातील सातत्य व सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यासाच्या व्यासंगातून शास्त्रज्ञ झाले आणि राष्ट्रपती पदापर्यंत पोहचले तसेच मेहनत व प्रामाणिकपणा अंगीकारून यशस्वी झेप घेतली.म्हणूनच ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मिती करायची असेल तर, ग्रंथवाचन करून ज्ञान,मनन,चिंतन करून ज्ञान संकलन करावे व अशा महापुरुषांचे अनुकरण विध्यार्थ्यानी करावे आणि आपले भविष्य उज्वल घडवावे " असे आवाहन केले.उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करून आपली वाचन सवयी जोपासावी हा संदेश दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथपाल डॉ. सुधीर नगरकर यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी ग्रंथालयातील नियतकालिकांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. तसेच ग्रंथालयाकडून करंट कंटेंट सर्विस सुरू करण्यात आली. याचा लाभ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतला.कार्यक्रमासाठी विध्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी प्रा.राजेंद्र ननावरे यांनी आभार मानले.

" *आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही* "
प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी
∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞
" आजच्या युगात ज्ञानाला खूप महत्व आहे,हे ज्ञान गुरुबरोबरच ग्रंथसंपदेत भरून उरले आहे.आपल्याला आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही. " असे मत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या वतीने, माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.
प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, "आज ज्या महान व्यक्तीची जयंती आज आपण साजरी करत आहोत,त्यांना लहानपनापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती.डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवनामध्ये शिक्षणाच्या परिस्पर्श झाल्यामुळे  तसेच जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, अभ्यासातील सातत्य व सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यासाच्या व्यासंगातून शास्त्रज्ञ झाले आणि राष्ट्रपती पदापर्यंत  पोहचले तसेच मेहनत व प्रामाणिकपणा अंगीकारून यशस्वी झेप घेतली.म्हणूनच ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मिती करायची असेल तर, ग्रंथवाचन करून ज्ञान,मनन,चिंतन करून ज्ञान संकलन करावे व अशा महापुरुषांचे अनुकरण विध्यार्थ्यानी करावे आणि आपले भविष्य उज्वल घडवावे " असे आवाहन केले.
उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करून आपली वाचन सवयी जोपासावी  हा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथपाल डॉ. सुधीर नगरकर यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी  ग्रंथालयातील नियतकालिकांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. तसेच ग्रंथालयाकडून करंट कंटेंट सर्विस सुरू करण्यात आली. याचा लाभ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतला.
कार्यक्रमासाठी विध्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी प्रा.राजेंद्र ननावरे यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

*तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष व महिला गटात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय अव्वल स्थानावर*सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत दि .३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे ज्युनियर कॉलेजचे १९ वर्षाखालील गटात खो - खो स्पर्धेत मुली व मुले यांनी प्रथम क्रमांक मिळविला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघाची निवड झाली .मामुर्डी ता.जावली या ठिकाणी सदर स्पर्धा पार पडल्या असून स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री. तेजेस जाधव व शारीरिक शिक्षण संचालक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले . महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी तसेच उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांना जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.