*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन कार्यक्रम संपन्न*
मेढा दि . ९ सप्टेंबर रोजी डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ विद्यार्थी - शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते .दरवर्षीप्रमाणे पाच सप्टेंबर या दिनाचे औचित्य साधून कॉलेजचे प्राचार्य मेजर डॉ .अशोक गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते .या दिवशी मुले संपूर्ण एक दिवसीय वर्ग तासिका - कार्यभार, आपल्या शिक्षकांप्रमाणे सांभाळत असतात .प्रत्येक वर्गातील मुले व मुली योग्य वेश परिधान करून टाईम टेबल प्रमाणे वर्गामध्ये तास घेत असतात .या अनोख्या उपक्रमासाठी संपूर्ण शिक्षक वृंद त्यांना सहकार्य करत असतात . कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थी -शिक्षक व शिक्षक यांच्या सत्कार समारंभाने झाला . यावेळी विद्यार्थी शिक्षकांनी मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभाग घेतला होता . यावेळी त्यांना पेन देऊन त्यांचा व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला . यावेळी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ संजय धोंडे यांनी प्रास्ताविक केले . अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षकाची ओळख कर्तव्य व विद्यार्थ्यांप्रती असणारे आपले प्रामाणिक कर्तव्य याची आठवण करून दिली . बदलत असलेल्या या आधुनिक सोशल मीडियाच्या जगात शिक्षकांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असून त्यांनी हे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले जावे बदलत्या काळाप्रमाणे आपल्याला सुद्धा विविध आव्हानासाठी तयार असले पाहिजे व विविध कौशले प्राप्त करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले, यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व सर्व शिक्षकांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन एस एस विभाग प्रमुख डॉ संजय धोंडे, व डॉ विनोद पवार तर कनिष्ठ महाविद्यालयातील समन्वयक - प्रा. संतोष कदम सहा . समन्वयक प्रा. सौ.काळे एस एन . व सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले . यावेळी उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रा डॉ प्रमोद घाटगे यांनी आवर्जून शुभेच्छा दिल्या.कार्यकमाचे सूत्रसंचालन कुमारी सानिका सुतार व साक्षी ढेबे यांनी केले तर आभार कुमारी तानिया सपकाळ यांनी मानले .