जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व लैंगिक छळ प्रतिबंधक समिती च्या वतीने दिनांक 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.
जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व लैंगिक छळ प्रतिबंधक समिती च्या वतीने दिनांक 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ नेहा कुलकर्णी, सचिव, श्रमिक संस्था मेढा उपस्थित होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ प्रमोद घाटगे होते स्त्री पुरुष समानता या बाबत विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सोबत संवाद साधत असताना प्रमुख मार्गदर्शिका मा. नेहा कुलकर्णी यांनी समाजात स्त्रीला मिळणार्या दुय्यमत्वावर नेमके बोट ठेवले. मालमत्ता अधिकार, निर्णय अधिकार,श्रमविभागणी, हिंसाचार, लैंगिकता अधिकार अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे त्यांनी कुटुंबात आणि पर्यायाने समाजात आजही असणारी स्त्री पुरुष विषमता अधोरेखित केली. उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मनात याबाबत जाणीव जागृती होऊन त्यांनी स्वतःपासून बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असत