Skip to main content

Posts

सावित्रीबाई फुले पुण्यतिथी....

या एकोणिसाव्या शतकात महिला शिक्षण आणि सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या प्रमुख भारतीय समाज सुधारक, शिक्षण तज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्या काळातील काही साक्षर स्त्रियान मध्ये गणल्या जाणार्‍या, सावित्रीबाईंना त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समवेत भिडे वाड्यात पुण्या तील मुलींची पहिली शाळा स्थापन करण्याचे श्रेय जाते.  सावित्रीबाई फुले यांनी बाल विधवांना शिक्षित आणि सशक्त करण्यासाठी खूप मेहनत घेतली, बाल विवाह आणि सती प्रथा यांच्या विरोधात मोहीम चालवली आणि विधवा पुन र्विवाहाचा पुरस्कार केला.  महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्ती, बी.आर. आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांच्या सारख्या दलित जातीचे प्रतीक मानले जाते.  सावित्रीबाई फुले यांनी अस्पृश्यते विरुद्ध मोहीम चालवली आणि जात आणि लिंग- आधारित भेदभाव नष्ट करण्यासाठी सक्रिय पणे काम केले. जन्म तारीख : 3 जानेवारी, 1831 जन्म ठिकाण:  नायगाव (सध्याचा सातारा जिल्हा), ब्रिटिश भारत.  मृत्यू:  10 मार्च 1897 मृत्यूचे ठिकाण:  पुणे, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत पती चे नाव:  महात्मा ज्योतिबा फुले संस्था :  बालहत्या प्र

जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व लैंगिक छळ प्रतिबंधक समिती च्या वतीने दिनांक 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.

जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व लैंगिक छळ प्रतिबंधक समिती च्या वतीने दिनांक 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ नेहा कुलकर्णी, सचिव, श्रमिक संस्था मेढा उपस्थित होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ प्रमोद घाटगे होते स्त्री पुरुष समानता या बाबत विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सोबत संवाद साधत असताना प्रमुख मार्गदर्शिका मा. नेहा कुलकर्णी यांनी समाजात स्त्रीला मिळणार्‍या दुय्यमत्वावर नेमके बोट ठेवले. मालमत्ता अधिकार, निर्णय अधिकार,श्रमविभागणी, हिंसाचार, लैंगिकता अधिकार अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे त्यांनी कुटुंबात आणि पर्यायाने समाजात आजही असणारी स्त्री पुरुष विषमता अधोरेखित केली. उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मनात याबाबत जाणीव जागृती होऊन त्यांनी स्वतःपासून बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली.             यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असत

जागतिक महिला दिनाच्या खुप शुभेच्छा

"ज्याला स्त्री 'आई' म्हणून कळली,  तो जिजाऊचा शिवबा झाला,  ज्याला स्त्री 'बहिण म्हणून कळली  तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला,  ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणून कळली,  तो राधेचा श्याम झाला, आणि  ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली,  तो सीतेचा राम झाला !' प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या स्त्रीशक्तीला प्रथम माझा मानाचा मुजरा !  जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खुप शुभेच्छा !!!!! शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्या मागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणा साठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करतो. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्या स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व 8 मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे. आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा अन् आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच.... कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या का

DR.N.B. KHOT मॅडम यांचा ग्रंथ गौरव समिती बाबत

ILA, MUCLA, SUCLA तसेच BBKKRC SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR सर्व टिचींग व नॉन टिचिंग स्टाफ, DLIS SUK  सर्व स्टाफ, विद्यार्थी व महाराष्ट्रातील सर्व ग्रंथपाल बंधू भगिनींना कळविण्यात येते की, आज दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी डॉ. नमिता खोत डायरेक्टर BBKKRC, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या सेवा निवृत्ती कार्यक्रमासंदर्भात  मिटिंग आयोजित करण्यात आली, त्यामध्ये ग्रंथ गौरव समिती स्थापन करण्याबाबत चर्चा झाली तसेच INNOVATIVE BEST PRACTICES IN LIBRARY तसेच मी ग्रंथपाल कसा झालो  आणि डॉ. खोत मॅडम विषयी आलेले अनुभव  या  संदर्भात  ISBN सहित पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.  या संदर्भात पुढील कार्यवाहीसाठी  व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. तरी सर्वांना विनंती की, आपण  व्हाट्सअप ग्रुप लिंक चा वापर करून ग्रुप जॉईन करावा. व या ग्रुप वर पुढील कार्यवाही बाबत निवेदन अवाहन सूचना देण्यात येणार आहेत तसेच कुणाला सूचना करावयाच्या असतील तरी त्या पाठवता येतील. https://chat.whatsapp.com/IRL3sSEMg67Hpv2s0q8jyr

दैनिक सकाळ २१February २०२२

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे नेट व सेट परीक्षेत यश

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे  नेट व सेट परीक्षेत यश मेढा /सातारा : विद्यानिकेतन सेट नेट गाईडन्स सेंटर, सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी कराड यांनी नेट आणि सेट या दोन्ही परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले तसेच श्रीमती अश्विनी शिंदे पुणे आणि रूपाली पाटील कोल्हापूर यांनीही सेट परीक्षेमध्ये यश संपादन केले. गायडन्स सेंटरचे समन्वयक प्रा. वंदना शिंदे तसेच प्रा.तेजस्विनी बाबर यांनी त्यांचे अभिनंदन केले.  त्यांना  प्रा.अतुल नगरकर व डॉ.सुधीर नगरकर  ग्रंथपाल आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या श्री सिद्धार्थ कुलकर्णी हे एम.ई.सी. बी.मध्ये कार्यरत आहेत. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. सर्वांना भविष्यकाळातील कार्यासाठी विद्यानिकेतन च्या सचिव डॉ. विद्याताई शेखर पाटील यांनी  शुभेच्छा दिल्या.