आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात सायन्स फेस्टिवल साजरा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात सायन्स फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रश्नमंजुषा, रांगोळी, फोटोग्राफी, पोस्टर आणि पुष्प रचना यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी किसनवीर महाविद्यालय, वाईच्या वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंजुषा इंगवले ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा चे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. आर. घाटगे, अग्रणी महाविदयालय योजनेचे समन्वयक श्री. शंकर गेजगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेमध्ये किसनवीर महाविद्यालय, वाई, गिरिस्थान आर्टस् अँड कॉमर्स महाविद्यालय, महाबळेश्वर, लालबहाद्दूर शास्त्री कॉलेज, सातारा, मिनलबेन मेहता महाविद्यालय पाचगणी इत्यादी महाविद्यालयामधून स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. एकूण २
USER Satisfaction is Ultimate aim of LIBRARY & Knowledge Resource Center