Saturday, 12 November 2022

*“भविष्यास आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची आवश्यकता” : गटविकास अधिकारी श्री. रमेश काळे*जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी महाविद्यालयाची लैंगिक छळ प्रतिबंधक समिती आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प जावली(मेढा) यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.श्री.रमेश काळे यांच्या हस्ते पार पडले.शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.वृंदा शिवदे,पर्यवेक्षिका एकात्मिक बाल विकास योजना,सातारा,मा.डॉ.प्रियांका टकले,वैद्यकीय अधिकारी,सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्र,मा.शैलेश कांबळे,संचालक,कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र,कराड हे उपस्थित होते.शिबिराच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ.अशोक गिरी होते.तर शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती होती महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा.डॉ.प्रमोद घाटगे,मा.श्री.शाम राठोड,गटविस्तार अधिकारी पंचायत समिती जावली,मा.मानसी संकपाळ,पर्यवेक्षिका,एकात्मिक बालविकास सेवा योजना,जावली यांची.उद्घाटनपर भाषणात मा.श्री.रमेश काळे,गटविकास अधिकारी ,पंचायत समिती जावली यांनी जावलीसारख्या दुर्गम भागातील महिला आणि मुलींना लिंगभाव,आरोग्य,कायदे,कौशल्य विकास अशा विविध विषयांबद्दल माहिती देणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.त्यांनी उपस्थित शिबिरार्थी मुलींना आपल्या सामाजिक भान जागृत ठेऊन विविध जीवनविषयक कौशल्ये आत्मसात करून आपल्या पायावर ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.दुर्गम ग्रामीण भागातील रहिवासी असल्याचा न्यूनगंड मनातून काढून टाकून येणाऱ्या भविष्यास आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.या शिबिरामध्ये मा.वृंदा शिवदे यांनी सोशल मिडीयाचा सजग वापर या विषयावर,मा. डॉ.प्रियांका टकले यांनी मासिक पाळी आणि आरोग्य या विषयावर तर मा.शैलेश कांबळे यांनी स्पर्धा परीक्षाबद्दल मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ.अशोक गिरी यांनी,आपल्या ध्येयाप्रती संवेदनशील राहून त्या ध्येयासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करणे हि आपली प्राथमिकता असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादित केले तसेच आपल्या जवळ असणाऱ्या सकारात्मक उर्जेचा वापर आपण आपल्या विवेकाने योग्य ठिकाणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.अशा स्वरूपाच्या मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन हे समाजाप्रती आपली बांधिलकी जपण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी उद्धृत केले.या शिबिरासाठी १२५ किशोरवयीन मुली उपस्थित होत्या. शिबिरासाठी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी,अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.धनश्री देशमुख यांनी केले.

*“भविष्यास आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची आवश्यकता” : गटविकास अधिकारी श्री. रमेश काळे*


जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी महाविद्यालयाची लैंगिक छळ प्रतिबंधक समिती आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना  प्रकल्प जावली(मेढा) यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.श्री.रमेश काळे यांच्या हस्ते पार पडले.शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.वृंदा शिवदे,पर्यवेक्षिका एकात्मिक बाल विकास योजना,सातारा,मा.डॉ.प्रियांका टकले,वैद्यकीय अधिकारी,सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्र,मा.शैलेश कांबळे,संचालक,कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र,कराड हे उपस्थित होते.शिबिराच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ.अशोक गिरी होते.तर शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती होती महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा.डॉ.प्रमोद घाटगे,मा.श्री.शाम राठोड,गटविस्तार अधिकारी पंचायत समिती जावली,मा.मानसी संकपाळ,पर्यवेक्षिका,एकात्मिक बालविकास सेवा योजना,जावली यांची.
उद्घाटनपर भाषणात मा.श्री.रमेश काळे,गटविकास अधिकारी ,पंचायत समिती जावली यांनी जावलीसारख्या दुर्गम भागातील महिला आणि मुलींना लिंगभाव,आरोग्य,कायदे,कौशल्य विकास अशा विविध विषयांबद्दल माहिती देणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.त्यांनी उपस्थित शिबिरार्थी मुलींना आपल्या सामाजिक भान जागृत ठेऊन विविध जीवनविषयक कौशल्ये आत्मसात करून आपल्या पायावर ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.दुर्गम ग्रामीण भागातील रहिवासी असल्याचा न्यूनगंड मनातून काढून टाकून येणाऱ्या भविष्यास आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या शिबिरामध्ये मा.वृंदा शिवदे यांनी सोशल मिडीयाचा सजग वापर या विषयावर,मा. डॉ.प्रियांका टकले यांनी मासिक पाळी आणि आरोग्य या विषयावर तर मा.शैलेश कांबळे यांनी स्पर्धा परीक्षाबद्दल मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ.अशोक गिरी यांनी,आपल्या ध्येयाप्रती संवेदनशील राहून त्या ध्येयासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करणे हि आपली प्राथमिकता असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादित केले तसेच आपल्या जवळ असणाऱ्या सकारात्मक उर्जेचा वापर आपण आपल्या विवेकाने योग्य ठिकाणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.अशा स्वरूपाच्या मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन हे समाजाप्रती आपली बांधिलकी जपण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी उद्धृत केले.
या शिबिरासाठी १२५ किशोरवयीन मुली उपस्थित होत्या. शिबिरासाठी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी,अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.धनश्री देशमुख यांनी केले.

Friday, 11 November 2022

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात "भ्रष्टाचार मुक्त भारत- विकसित" भारत या विषयावर भित्ती पत्रिका स्पर्धा संपन्न.

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात "भ्रष्टाचार मुक्त भारत- विकसित" भारत या विषयावर भित्ती पत्रिका स्पर्धा संपन्न.*

बुधवार, दिनांक 9/11/2022 रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे बँक ऑफ महाराष्ट्र मेढा शाखेच्या वतीने कॉमर्स विभागामार्फत" भ्रष्टाचार मुक्त भारत विकसित भारत " या विषयावर भित्ती पत्रिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सदर 
 स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे, कॉमर्स विभाग प्रमुख प्रा.अमेय देसाई व प्रा.डॉ.संग्रामसिंह नलवडे उपस्थित होते.या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र मेढा शाखेचे शाखा प्रमुख श्री.अविनाश सुतार यांनी स्पर्धेचे महत्व विषद करून,यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विकसित भारत घडविण्यासाठी अशा प्रकारच्या अभियानात सहभागी होऊन समाजात जाणिव जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. सहभागी या स्पर्धेत कॉमर्स विभागातील ७६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत अनुक्रमे कु. साक्षी चिकणे, कु.कीर्ती वेंदे व कु. प्रणाली सकपाळ यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.डॉ. सुजित कसबे व प्रा. सौ गायत्री जाधव यांनी काम केले.

Tuesday, 1 November 2022

*राष्ट्रपुरुष ही देशाची संपत्ती- प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी*

*राष्ट्रपुरुष ही देशाची संपत्ती- प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी* 
 आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा येथे राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम देशाचे  माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती या निमित्ताने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये  राज्यशास्त्र विभाग प्रमुख सौ.गायत्री जाधव यांनी राष्ट्रीय एकता दिवस शपथ वाचन करून  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे प्रतिपादन केले की, ‘देशाच्या विकासात सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांनी एकसंघ भारत बनविण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.देशाच्या एकसंध उभारणीत  कणखर  राज्यकर्ता गरजेचा असतो याचे उदाहरण त्यांनी आपल्या कार्यातून दाखून दिले.  बारडोली सत्याग्रहाचे प्रणेते, ५०० पेक्षा अधिक संस्थानांचे विलीनीकरण करून नवा भारत निर्माण करणारे सच्चे देशभक्त म्हणून त्यांची  वेगळी प्रतिमा निर्माण झाली. त्यांच्या कार्याची महती कायम रहावी म्हणून गुजरात राज्यात त्यांची जगातील सर्वात उंच प्रतिमा बनविण्यात आली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात येते. त्याच बरोबर स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी देशाच्या निर्मितीसाठी कणखर भूमिका स्वीकारून देशाला विकासाच्या मार्गावर नेऊन ठेवले. बांग्लादेश निर्मिती, ऑपरेशन ब्लू सारखे महत्वाचे निर्णय घेऊन जागतिक पातळीवर आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली.त्यांच्या कार्याबाद्द्ल त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. 
        कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून ‘राष्ट्रपुरुष ही देशाची संपत्ती आहे ती आपण जीवापाड जपली पाहिजे.त्यांच्या कार्यातून प्रत्येक तरुणाने प्रेरणा घेऊन आपले कर्तुत्व  सिद्ध करावे म्हणजे स्वतः बरोबर देशाचा विकास होईल असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ५००मी.राष्ट्रीय एकता दौड घेण्यात आली या एकता दौड मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींनी उस्फुर्त सहभाग घेतला. कार्यक्रमास  महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय भोसले यांनी केले. आभार इतिहास विभाग प्रमुख प्रा.शंकर गेजगे यांनी मानले. या कार्यक्रमास  राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.उदय पवार, प्रा.सौ.धनश्री देशमुख, डॉ.सारंगपाणी  शिंदे सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले.

Saturday, 29 October 2022

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रान भाज्या रेसिपीज चे प्रदर्शन संपन्न-

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रान भाज्या  रेसिपीज चे प्रदर्शन संपन्न-

आजकालच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये माणसाकडे आरोग्य व समतोल आहार घेण्यासाठी अजिबात वेळ नाही. याचाच परिणाम म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या बाबतीत समस्या वाढत आहेत. याचा फायदा  घेऊन विदेशी कंपन्या आपली निरनिराळी उत्पादने बाजारात विकत आहेत आणि युवा पिढी याचा अंधाधुंदपणे वापर करत आहेत. वेगवेगळ्या आकर्षक जंक आणि फास्ट-फूड मुळे भविष्यात आरोग्याच्या बाबतीत उद्भवणाऱ्या नव्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता निसर्गाशी नाते जोडून जंक फूड ला बगल देऊन आपला परंपरागत वारसा जपण्याचा प्रयत्न आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालया मधील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचे रेसिपीज चे प्रदर्शन आयोजित करून केला. 
मेढा हा भाग डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेला व निसर्गाशी नाळ जोडलेला असल्याने तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी सुद्धा डोंगराळ भागातील असल्याने या उपक्रमासाठी जवळपास १२ प्रकारच्या रान भाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची रेलचेल येथे दिसून आली. यात शेवगा, कुर्डू, केना, कर्ठूली, उंबर, ढेसा, भालगा, भारंगी या सारख्या अनेक वनस्पतीनं पासून बनविलेले पदार्थ विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणले होते. याच बरोबर त्यांची माहिती म्हणजेच त्यांचे शास्त्रीय नावं, कुळ तसेच पदार्थ बनविण्याच्या कृतींचीही माहिती देण्यात आली.
हा कार्यक्रम अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत घेण्यात आला. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी व उपप्राचार्य मा. डॉ.  प्रमोद घाटगे यांचे विशेष मार्गदर्शन  लाभले. अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक प्रा. शंकर गेजगे तसेच विज्ञान शाखेचे सर्व प्राध्यापक उपस्थित राहून हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. उदय पवार यांनी केले. या स्तुत्य व नाविन्यपूर्ण  उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी व उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी कौतुक केले.

Thursday, 20 October 2022

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामार्फत प्लास्टिक निर्मूलन मोहीम*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामार्फत प्लास्टिक निर्मूलन मोहीम* 
  आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छ भारत अभियान २.० या उपक्रमांतर्गत मेढा बस स्थानक परिसरात प्लास्टिक निर्मूलन करण्यात आले. या कार्यक्रमात 25 स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी सक्रीय सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. संजय भोसले यांनी याकरिता पुढाकार घेतला.बस स्थानक परिसरात गोळा केलेला २० किलो प्लास्टिक कचरा नगरपंचायत मेढा यांच्याकडे सुफुर्द करण्यात आला. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी व उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे याचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

सकाळ बातमी