Thursday, 18 May 2023

Commerce DAY 2023

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे कॉमर्स डे साजरा*
=====================
मेढा : १२/०५/२०२३

येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या वाणिज्य विभागामार्फत “कॉमर्स डे” चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गिरिस्थान महाविद्यालय महाबळेश्वर येथील वाणिज्य विभागप्रमुख डॉ. शरद गोळे  होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही.गिरी होते.तर या प्रसंगी महाबळेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.कदम सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
 कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते वाणिज्य विभागाच्या विध्यार्थ्यानी तयार केलेल्या, पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे उदघाट्न करण्यात आले. यामध्ये ५६ विद्यार्थ्यांनी आपली विविध विषयांवरील पोस्टर तयार केली होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. अमेय देसाई यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक केले.त्यानंतर प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. शरद गोळे यांनी " 
विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यानंतर जयवंत  हॉल या ठिकाणी “कॉमर्स डे” या कार्यक्रमाअंतर्गत कन्सेप्ट ऑफ कॉमर्स हा उपक्रम घेण्यात आला. त्यात १३ विद्यार्थ्यांनी वणिज्यातील मुलभूत संकल्पनाचे सादरीकरण केले.त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. शरद गोळे यांनी, " करिअर विकासासाठी व्यवस्थापन कौशल्ये"या विषयावर विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. त्यानंतर गिरिस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. कदम सर यांनी अनेक उदाहरणे देवून विद्यार्थांना करिअर कसे घडवावे याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर डॉ.अशोक गिरी यांनी बक्षिस विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून,आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षमता विकसित करण्यावर भर दिला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.या मुख्य कार्यक्रमानंतर “कॉमर्स डे” च्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण व ऑफलाईन शिक्षण या विषयावर वादविवाद स्पर्धा, फनी गेम्स आणि रोल प्ले चे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संग्रामसिंग नलवडे यांनी  केले. कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागाचे सर्व विध्यार्थी व विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शेवटी प्रा.डॉ.संजय धोंडे सर यांनी आभार मानले.

Tuesday, 2 May 2023

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे महाराष्ट्र दिन साजरा

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे महाराष्ट्र दिन साजरा…
=====================
मेढा : १ मे 2023

येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये एक मे महाराष्ट्र दिन उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही.गिरी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्याप्रसंगी प्राचार्य डॉ.गिरी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले " 1 मे म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना दिवस आज सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. ” मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ,प्रणाम घ्यावा माझा ,हा श्री महाराष्ट्र देशा, राकट देशा ,कणखर देशा ,दगडांच्या देशा ,नाजुक देशा ,कोमल देशा ,फुलांच्याहि देशा ” असे महाराष्ट्राचे सुंदर वर्णन राम गणेश गडकरी यांनी केले आहे .अशा या महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत ,कलावंत ,साहित्यिक ,कलाकार ,गायक ,वादक असे अष्टपैलू जन्मले नि वाढले .हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या मातीतच लढले आणि त्यांनी मराठ्यांचे तोरण उभारले . असे अनेक थोर व्यक्तिमत्व या मराठी मातीत घडले. ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे "असे सांगून ते पुढे म्हणाले " 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली . हा दिन मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात . त्या दिवशी 1960 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली.
महाराष्ट्राचा सांस्कृतिक सामाजिक वाटा फार मोठा आहे.महाराष्ट्राच्या संस्कृतीत अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहाने पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात .प्रत्येक सण हा मराठी माणसाला एक संदेश देऊन जातो . अनेक नेत्यांनी महापुरुषांनी महाराष्ट्राचे विविध उपाधी देऊन कौतुक केले आहे. महाराष्ट्र मध्ये भारताच्या सिंहद्वाराच्या प्रहरी आहे या शब्दात गौरव केला आहे.महाराष्ट्र मध्ये कार्यकर्त्यांचे मोहोळ त्या शब्दात महात्मा गांधींनी महाराष्ट्राचे प्रशंसा केली आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर ,वासुदेव बळवंत फडके यांसारख्या अनेक देशभक्त इंग्रजांविरुद्ध लढले . या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांचेही मोठे योगदान आहे . अशा या वैभवशाली महाराष्ट्रात मराठी मातीत जन्माला आल्याचा मला फार मोठा अभिमान आहे .आपण महाराष्ट्रीय असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे."असा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी आणि विध्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
सुरुवातीस कनिष्ठ विभागाच्या मुलींनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्रगीत सादर केले.जिमखाना विभाग प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले….

शशिकांत शिंदे महाविद्यालय स्टेट लेवल बेबीनार संपन्न...

video
" स्पर्धेच्या युगामध्ये यश संपादन करण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही "

प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी.

मेढा दिनांक 28/ 4/ 2023

" सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे स्पर्धेच्या युगामध्ये यश संपादन करण्यासाठी,
अभ्यासाशिवाय पर्याय नाही. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि अभ्यासातील सातत्य असेल तर आपणास यश मिळण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही.बँकिंग क्षेत्रातील अनेक करिअरच्या संधी विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्न करीत राहील " असे मत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही. गिरी यांनी व्यक्त केले.
        जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढाच्या ग्रंथालय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि युनिक अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पुस्तक दिनानिमित्त,आग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत 
"  बँकिंग करिअर करण्यासाठी ग्रंथालयाचा वापर व अभ्यास तंत्रे " या विषयावर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात होते.त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत असताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.
या बेबीनार साठी प्रमुख व्याख्यात्या म्हणून युनिक  अकॅडमी पुणेच्या प्रा.मयुरी सावंत या होत्या.यावेळी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे, युनिक अकादमीचे 
समन्वयक श्री.चंद्रकांत खराटे,अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक प्रा.एस. एन. गेजगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदघाट्न झाल्या नंतर प्रा.मयुरी सावंत यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी बँकिंग क्षेत्रात करिअरच्या संधी प्राप्त करण्यासाठी नेमका कोणकोणत्या परीक्षा असतात? तसेच परीक्षेचे आयोजन कोण करते, अभ्यासक्रमानुसार कसा अभ्यास केला जातो  तसेच नेमकी अभ्यासाची तंत्रे कोणती वापरली पाहिजेत म्हणजे यश मिळते. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासाचे तंत्र , ग्रंथालयातील योग्य पुस्तकांचा वापर व रीडिंग रूमचा वापरातील सातत्य याविषयी असे बहुमूल्य मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजक उपप्राचार्य मा. डॉ. प्रमोद घाटगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी  सर्वपरीने मदत करण्यात येईल असे सांगितले व शुभेच्छा दिल्या. तसेच युनिक अकॅडमी चे समन्वयक श्री चंद्रकांत खराटे यांनी  विद्यार्थ्यांनी युट्युब व टेलिग्राम चा वापर करावा असे  मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र समन्वयक ग्रंथपाल डॉ.सुधीर नगरकर यांनी केले.सूत्रसंचालन लीड कॉलेज चे समन्वयक प्रा.शंकर गेजगे यांनी केले. या बेबीनार साठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि सत्तर विद्यार्थी उपस्थित होते.शेवटी प्रा. पी. डी. पाटील यांनी आभार मानले.

Saturday, 15 April 2023

मेढा - सत्यशोधक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मेढा महाविद्यालयात उत्साहात साजरी

मेढा - सत्यशोधक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मेढा महाविद्यालयात उत्साहात साजरी
जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने सत्यशोधक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य मेजर अशोक व्ही.गिरी यांनी महात्मा फुले यांचा जीवनपट उलगडून दाखविताना असे प्रतिपादन केले की,महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.ज्योतीरावांनी 1848 मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली.खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते.महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे.महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड,सार्वजनिक सत्यधर्म,गुलामगिरी यासारखे अनेक ग्रंथ लिहून समतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख प्रा.शंकर गेजगे यांनी तर आभार डॉ.संजय भोसले यांनी मानले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Monday, 10 April 2023

गीता संदेश

गीता संदेश
केल्याशिवाय मिळत नाही - मोफत घेणार नाही
केलेले फुकट जात नाही - निराश होणार नाही
काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे
- न्यूनगंड ठेवणार नाही
काम करीत जा, हाक मारीत जा,
मदत तयार आहे.
- विश्वास घालवणार नाही
( पांडुरंगशास्त्री आठवले

Sunday, 2 April 2023

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात सायन्स फेस्टिवल साजरा

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात सायन्स फेस्टिवल साजरा 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात सायन्स फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रश्नमंजुषा, रांगोळी, फोटोग्राफी, पोस्टर आणि पुष्प रचना यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी किसनवीर महाविद्यालय, वाईच्या वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंजुषा इंगवले ह्या  प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.  त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा चे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. आर. घाटगे, अग्रणी महाविदयालय  योजनेचे समन्वयक श्री. शंकर गेजगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेमध्ये किसनवीर महाविद्यालय, वाई, गिरिस्थान आर्टस् अँड कॉमर्स महाविद्यालय, महाबळेश्वर, लालबहाद्दूर शास्त्री कॉलेज, सातारा, मिनलबेन मेहता महाविद्यालय पाचगणी इत्यादी महाविद्यालयामधून स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. एकूण २५१ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदविला. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अग्रणी महाविदयालय  योजनेंतर्गत करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये स्पर्धकांचे मुल्यांकन करणेकरिता डॉ. बी. ए. कोरे, श्रीमती डी. डी. धुमाळ श्री. ए. एम. लकेरी, श्रीमती. स्नेहल गायकवाड व श्री. सुनील भोईटे या परीक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पी. डी. पाटील यांनी केले. या उपक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. एस. जी. केमदारणे यांनी केले व सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कोमल घाडगे व कु. पूजा माने यांनी केले. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी सायन्स विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी बहुमोल सहकार्य केले तसेच शिक्षेकेत्तर कर्मचारी विद्यार्थ्यांचेही सहकार्य लाभले.

Friday, 24 March 2023

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा,कबड्डी संघाचा प्रथम

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा,कबड्डी संघाचा प्रथम क्रमांक*
============
मेढा 23 मार्च 2023

जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा, नेहरू युवा मंडळ सातारा व यशवंतराव चव्हाण स्कुल ऑफ सोशल वर्क जाकातवाडी सातारा, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला.
या कबड्डी स्पर्धा सातारा येथील शाहू स्टेडियम येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण दहा संघानी सहभाग घेतला होता.त्यावेळी अटीटतीच्या व रोमहर्षक झालेल्या या स्पर्धेत,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून,प्रथम क्रमांक प्राप्त केला.महाविद्यालयातील रोहित जाधव, राजेश देशमुख, कार्तिक कासार, ओमकार शेलार, प्रमोद जाधव,अभिषेक शिंदे व पुनीत पवार या खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळी करून हे यश संपादित केले.या सर्व विध्यार्थी खेळाडूंना जिमखाना प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.या यशाबद्दल सर्व खेळाडुंचे संस्था अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, सचिव सौ. वैशाली शिंदे, सर्व विश्वस्त तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही.गिरी,उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.