Commerce DAY 2023

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे कॉमर्स डे साजरा*
=====================
मेढा : १२/०५/२०२३

येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या वाणिज्य विभागामार्फत “कॉमर्स डे” चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गिरिस्थान महाविद्यालय महाबळेश्वर येथील वाणिज्य विभागप्रमुख डॉ. शरद गोळे  होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही.गिरी होते.तर या प्रसंगी महाबळेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.कदम सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
 कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते वाणिज्य विभागाच्या विध्यार्थ्यानी तयार केलेल्या, पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे उदघाट्न करण्यात आले. यामध्ये ५६ विद्यार्थ्यांनी आपली विविध विषयांवरील पोस्टर तयार केली होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. अमेय देसाई यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक केले.त्यानंतर प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. शरद गोळे यांनी " 
विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यानंतर जयवंत  हॉल या ठिकाणी “कॉमर्स डे” या कार्यक्रमाअंतर्गत कन्सेप्ट ऑफ कॉमर्स हा उपक्रम घेण्यात आला. त्यात १३ विद्यार्थ्यांनी वणिज्यातील मुलभूत संकल्पनाचे सादरीकरण केले.त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. शरद गोळे यांनी, " करिअर विकासासाठी व्यवस्थापन कौशल्ये"या विषयावर विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. त्यानंतर गिरिस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. कदम सर यांनी अनेक उदाहरणे देवून विद्यार्थांना करिअर कसे घडवावे याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर डॉ.अशोक गिरी यांनी बक्षिस विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून,आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षमता विकसित करण्यावर भर दिला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.या मुख्य कार्यक्रमानंतर “कॉमर्स डे” च्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण व ऑफलाईन शिक्षण या विषयावर वादविवाद स्पर्धा, फनी गेम्स आणि रोल प्ले चे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संग्रामसिंग नलवडे यांनी  केले. कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागाचे सर्व विध्यार्थी व विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शेवटी प्रा.डॉ.संजय धोंडे सर यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

*तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष व महिला गटात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय अव्वल स्थानावर*सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत दि .३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे ज्युनियर कॉलेजचे १९ वर्षाखालील गटात खो - खो स्पर्धेत मुली व मुले यांनी प्रथम क्रमांक मिळविला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघाची निवड झाली .मामुर्डी ता.जावली या ठिकाणी सदर स्पर्धा पार पडल्या असून स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री. तेजेस जाधव व शारीरिक शिक्षण संचालक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले . महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी तसेच उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांना जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.