आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे महाराष्ट्र दिन साजरा

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे महाराष्ट्र दिन साजरा…
=====================
मेढा : १ मे 2023

येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये एक मे महाराष्ट्र दिन उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही.गिरी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्याप्रसंगी प्राचार्य डॉ.गिरी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले " 1 मे म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना दिवस आज सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. ” मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ,प्रणाम घ्यावा माझा ,हा श्री महाराष्ट्र देशा, राकट देशा ,कणखर देशा ,दगडांच्या देशा ,नाजुक देशा ,कोमल देशा ,फुलांच्याहि देशा ” असे महाराष्ट्राचे सुंदर वर्णन राम गणेश गडकरी यांनी केले आहे .अशा या महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत ,कलावंत ,साहित्यिक ,कलाकार ,गायक ,वादक असे अष्टपैलू जन्मले नि वाढले .हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या मातीतच लढले आणि त्यांनी मराठ्यांचे तोरण उभारले . असे अनेक थोर व्यक्तिमत्व या मराठी मातीत घडले. ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे "असे सांगून ते पुढे म्हणाले " 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली . हा दिन मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात . त्या दिवशी 1960 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली.
महाराष्ट्राचा सांस्कृतिक सामाजिक वाटा फार मोठा आहे.महाराष्ट्राच्या संस्कृतीत अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहाने पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात .प्रत्येक सण हा मराठी माणसाला एक संदेश देऊन जातो . अनेक नेत्यांनी महापुरुषांनी महाराष्ट्राचे विविध उपाधी देऊन कौतुक केले आहे. महाराष्ट्र मध्ये भारताच्या सिंहद्वाराच्या प्रहरी आहे या शब्दात गौरव केला आहे.महाराष्ट्र मध्ये कार्यकर्त्यांचे मोहोळ त्या शब्दात महात्मा गांधींनी महाराष्ट्राचे प्रशंसा केली आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर ,वासुदेव बळवंत फडके यांसारख्या अनेक देशभक्त इंग्रजांविरुद्ध लढले . या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांचेही मोठे योगदान आहे . अशा या वैभवशाली महाराष्ट्रात मराठी मातीत जन्माला आल्याचा मला फार मोठा अभिमान आहे .आपण महाराष्ट्रीय असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे."असा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी आणि विध्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
सुरुवातीस कनिष्ठ विभागाच्या मुलींनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्रगीत सादर केले.जिमखाना विभाग प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले….

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे नेट व सेट परीक्षेत यश