Skip to main content

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न* ===========

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न* 
======================
मेढा : 19 मे 2023

" कोणत्याही स्पर्धेत यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते, त्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी असावी लागते त्याशिवाय यश संपादन करता येत नाही " असे मत प्रसिद्ध उद्योजक उदयसिंह चौघुले यांनी व्यक्त केले.
जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे  महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उद्योजक मा. उदयसींह चौघुले हे  उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते.यावेळी उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.
      याप्रसंगी प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी यांनीही आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.त्यावेळी ते म्हणाले " सातत्यपूर्ण व सुनियोजित प्रयत्न, शिस्त,प्रखर निर्णयक्षमता व जिद्द अंगी बाळगली तर आपले आयुष्य अत्यंत अनुकरणीय व दैदिप्यमान बनविण्यास मदत मिळते " असे सांगून त्यांनी महाविद्यालयाची वाटचाल व विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व इथून पुढे विध्यार्थ्यानी शैक्षणिक गुणवत्ता वाढ,क्रीडा,सांस्कृतिक,एन.एस.एस व साहित्य क्षेत्रात सहभागी होऊन उत्तुंग भरारी घ्यावी असे आवाहन केले.
प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या भाषणानंतर महाविद्यालयातील विविध विभागात 2022-2023 या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विध्यार्थी-विध्यार्थीनीचा गौरव करण्यात आला.
क्रीडा विभागातील कु.सिद्धी धनावडे ( स्वीमिंग चंदीगड येथे निवड ) अस्मिता सावंत (अर्चरी ) व अमर सावंत ( रग्बी )या प्रकारात ओरिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तर मयूर सपकाळ (800मिटर ) व ऋषभ शिंदे (5000मिटर )धावणे, पियुष शिवथारे ( दहा मिटर पिस्तुल शूटिंग ) फ्री नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल आणि जिल्हास्तरीय व महाविद्यालयीन स्तरावर झालेल्या विविध क्रीडा प्रकारातील स्पर्धेत यश संपादन केलेले खेळाडू तसेच सांस्कृतिक विभागातील विध्यार्थी कलाकारांनी जिल्हास्तरीय युवा मोहोत्सव( लघुनाटिका तृतीय )
सनबीन शिक्षण संस्था कराड आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा( पथनाट्य व लघुनाटिका ( द्वितीय ) आणि यशवंतराव चव्हाण स्कुल ऑफ सोशलवर्क जाकातवाडी व नेहरू युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पथनाट्य व लघुनाटिका स्पर्धेत ( प्रथम) क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्रमाणपत्र,चषक व पदक देवून गौरविण्यात आले.याशिवाय राष्ट्रीय सेवा योजनेतील जग्गनाथ शिंदे व अनिकेत ओंबळे जळगाव येथे निवड झाल्याबद्दल,तर पन्हाळा ते पवनखिंड शिव पावन प्रेरणा मोहिमेत नरेश जवळ व सोमनाथ जवळ सहभाग घेतल्याबद्दल,ऋषिकेश शेलार व संदिप जाधव यांनी धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय, सातारा आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला म्हणून तर कु.कीर्ती बेंद्रे,जग्गनाथ शिंदे, अनिकेत निकम व नितीन शेडगे यांना उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून गौरविण्यात आले.
ग्रंथालय विभागातील - करण शितोळे व कु.पूजा सुर्वे यांना ग्रंथालय बेस्ट युजर पूरस्कार देण्यात आले.याशिवाय बी.ए,बिकॉम व सायन्स विभागात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय शिवाजी विद्यापीठ भूगोल शिष्यवृत्ती प्राप्त अविनाश करंजेकर याचाही उचित गौरव करण्यात आला.
    याच कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विध्यार्थी व विध्यार्थिनी पोलीस विभागात भरती झाले व कु.अश्विनी तांबे ही विध्यार्थिनी सरपंच झाल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला.
  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच प्रा. डॉ.संग्राम शिंदे यांची शिवाजी विद्यापीठ ( हिंदी)प्रा.डॉ.संजय धोंडे ( अर्थशास्त्र ) विषय समितीवर निवड झाल्याबद्दल आणि प्रा.डॉ.ज्ञानदेव काळे यांची सिनेट मेंबर म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.अशा प्रकारे हा वार्षिक पारितोषिक व गुणगौरव सोहळा आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिमखाना विभाग प्रमुख प्रा.प्रमोद चव्हाण यांनी अहवाल वाचन व प्रास्ताविक केले, प्रा. अमेय देसाई यांनी प्रमुख पाहुण्यांचा पारीचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आनंद साठे,प्रा.डॉ.
संजय धोंडे व प्रा.शंकर गेजगे यांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.ओमकार यादव यांनी आभार मानले….

=====================

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

शिवजयंती शिवचरित्रातून काय शिकावे सुरूवात करण्यावर भर द्या, कमतरतेवर लक्ष देऊ नका. रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बालशिवबा सोबत फक्त आठ दहा मावळे होते. स्पर्धक मोठा आहे म्हणून घाबरायचं नसतं. मुगल, निजाम, आदिलशहा असे मोठमोठे विरोधक असतानाही महाराजांनी स्वराज्य स्थापन केलंच. संकटाला घाबरू नका, संकटकाळी स्वतः नेतृत्व करा. अफजलखानाचे संकट महाराजांनी स्वतः हाताळले होते. शांत राहून प्रत्येक निर्णय योग्य पद्धतीने अमंलात आणला होता. माघार घेणे हे सुद्धा काहीवेळा आवश्यक असते. महाराज कित्येक वेळा परिस्थिती पाहून माघार घेत त्यामुळे होणारे नुकसान टळत असे आणि नव्याने तयारी करण्याची संधीही मिळत असे. सहकारी चांगले निवडा. महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे सहकारी हीच महाराजांची खरी ताकद होती.  जय भवानी !जय शिवाजी !! शिवराय मनामनात!!  शिवजयंती घराघरात!! From Dr. Sudhir Nagarkar

बातमी

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे नेट व सेट परीक्षेत यश

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे  नेट व सेट परीक्षेत यश मेढा /सातारा : विद्यानिकेतन सेट नेट गाईडन्स सेंटर, सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी कराड यांनी नेट आणि सेट या दोन्ही परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले तसेच श्रीमती अश्विनी शिंदे पुणे आणि रूपाली पाटील कोल्हापूर यांनीही सेट परीक्षेमध्ये यश संपादन केले. गायडन्स सेंटरचे समन्वयक प्रा. वंदना शिंदे तसेच प्रा.तेजस्विनी बाबर यांनी त्यांचे अभिनंदन केले.  त्यांना  प्रा.अतुल नगरकर व डॉ.सुधीर नगरकर  ग्रंथपाल आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या श्री सिद्धार्थ कुलकर्णी हे एम.ई.सी. बी.मध्ये कार्यरत आहेत. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. सर्वांना भविष्यकाळातील कार्यासाठी विद्यानिकेतन च्या सचिव डॉ. विद्याताई शेखर पाटील यांनी  शुभेच्छा दिल्या.