Sunday, 10 August 2025
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा ✨🌸
🌸✨ रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा ✨🌸
बंधाची, मायेची, विश्वासाची आणि प्रेमाची
ही अमूल्य गाठ – रक्षाबंधन ❤
भाऊ-बहिणीच्या नात्यातील जिव्हाळा,
हास्य, आठवणी आणि साथ यांचा सुंदर उत्सव!
या पवित्र धाग्यात आहे
आयुष्यभर जपण्याचं वचन,
आणि न संपणाऱ्या नात्याचं सोनं… 💛
“भावा-बहिणीच्या प्रेमाला हजारो सलाम,
रक्षाबंधनच्या शुभ दिवशी तुम्हा सर्वांना
खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद!” 🎉🎁
🌼💫 रक्षाबंधन मंगलमय होवो💫🌼 💐💐💐💐💐
FROM: Dr. Sudhir Nagarkar
Saturday, 9 August 2025
आलेवाडी डोंगर परिसरात विद्यार्थ्यानी टाकले १५००० जंगली वृक्षांचे बीज गोळे*
*आलेवाडी डोंगर परिसरात विद्यार्थ्यानी टाकले १५००० जंगली वृक्षांचे बीज गोळे*
*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम*
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आलेवाडी ता.जावली या गावातील डोंगर परिसरात विविध प्रकारच्या जंगली वृक्षांचे सुमारे १५००० बीज गोळे विद्यार्थ्यानी तयार करून ते गावालगत असलेल्या डोंगर परिसरात टाकण्यात आले आहेत. आलेवाडी गावामध्ये गेल्या दोन वर्षापासून नवसंजीवन जलसंवर्धन सामाजिक संस्था आलेवाडी यांच्या पुढाकारातून जलसंधारणाची विविध कामे सुरु आहेत.नजीकच्या काळात आलेवाडी गाव हे एक पाणीदार गाव म्हणून जावली तालुक्यात आपली ओळख निर्माण करण्याचा ध्यास या गावाने घेतला आहे.या गावाने हाती घेतलेल्या या जलसंधारण मोहिमेत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय सुद्धा उस्फुर्तपणे सहभागी झाले आहे.याचाच एक भाग म्हणून जलसंधारण कार्याला हातभार आणि गावाला या कार्यात प्रेरणा देण्याच्या प्रमुख उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयामार्फत करण्यात आले असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य,मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांनी सांगितले.महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ.प्रमोद घाटगे, ठाणे येथील प्रश्न फाऊडेशन या संस्थेचे सातारा जिल्हा समन्वयक श्री.रजत नवले आणि नवसंजीवन जलसंधारण संस्थेचे सदस्य श्री.विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील ५० विद्यार्थी आणि ०५ शिक्षक व आलेवाडी गावातील ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी झाले होते.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय धोंडे यांनी या उपक्रमाचे प्रास्ताविक केले राष्ट्रीय सेवा योजना समिती सदस्य प्रा.प्रकाश जवळ यांनी सहभागी विद्यार्थी व ग्रामस्थांचे आभार मानले. तसेच डॉ.प्रमोद चव्हाण डॉ.विनोद पवार,डॉ.बाळासाहेब उघडे या राष्ट्रीय सेवा योजना समिती सदस्यांनी उस्फुर्त सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
आमदार शशिकांत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात नवोदित विद्यार्थ्यांनाचे स्वागत*
*आमदार शशिकांत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात नवोदित विद्यार्थ्यांनाचे स्वागत*
मेढा दि . ६ ऑगष्ट रोजी येथील आमदार शशिकांत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता अकरावीच्या नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम संपन्न झाला .दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही प्रत्येक विद्यार्थ्यांस गुलाब पुष्प देऊन त्यांचे महाविद्यालया चे वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले .
यावेळी सर्व कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन मा. प्राचार्य मेजर डॉ अशोक व्हि गिरी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच इ १२ वीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली .
सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपली विषय शिक्षक म्हणून ओळख करून दिली व पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या . यावेळी महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रा डॉ प्रमोद घाटगे सर यांची प्रमुख उपस्थिती होती . त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शिस्तीचे महत्व पटवून दिले व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा संतोष कदम यांनी केले . तर अध्यक्षीय मनोगत मा प्राचार्य यांनी व्यक्त करताना सर्व विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेज जीवनातील प्रथम दिवसात अनुभवलेल्या अनेक आठवणी सांगितल्या व वर्षभरातील अनेक शैक्षणीक उपक्रमांची माहिती दिली, विविध स्पर्धांमध्ये भाग घेणे आपल्या व्यक्तिमत्व विकासात कसे महत्वाचे आहे याचे तपशीलवार विवेचन केले.आपणच आपल्या आयुष्याला आकार देऊन आपल्या भविष्यातील ध्येये साध्य करूयात . यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्याचे काम आम्ही सर्व जण करू असे आश्वासन देऊन सर्व .
विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा डॉ सुधीर नगरकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना ई लर्निंग लायब्ररी ची ओळख करून दिली .
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता १२ वीच्या विद्यार्थीनी कुमारी सानिका सुतार व साक्षी ढेबे यांनी केले .
तर आभार प्रदर्शन कुमारी तानीया सपकाळ यांनी केले . यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .
Friday, 11 July 2025
news
नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र उद्योजक सुशांत भिलारे | https://sp-news7.blogspot.com/2025/07/blog-post_11.html?m=1
Monday, 7 July 2025
*नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र**उद्योजक श्री. सुशांत भिलारे*
*नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र*
*उद्योजक श्री. सुशांत भिलारे*
विध्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संघर्ष अटळ आहे आणि सातत्य पूर्ण प्रामाणिक प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र आहे असे मत मा. श्री सुशांत भिलारे यांनी व्यक्त केले. ते
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात "आजच्या युवकासमोरील आव्हाने आणि विविध संधी" या विषयावर विध्यर्थ्यांच्यासाठी आयोजित व्याख्यान आणि मार्गदर्शन या कार्यक्रमात बोलत होते.
सदर कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या जीवन प्रवास विध्यार्थीच्या समोर मांडला.
जावली सारख्या ग्रामीण भागातील युवक सुद्धा कसा यशस्वी होऊ शकतो हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून पटवून दिले.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्ध, चिकाटी आणि आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा आहे असे मत त्यानी व्यक्त केले.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा डॉ प्रमोद घाटगे यांनी सुशांत भिलारे यांचा आदर्श युवकांनी घ्यावा असे आवाहन केले. तसेच शिक्षणामुळे भविष्यात अनेक संधी उपलब्ध होतील असे मत मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविदयालयचे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी यांनी शिस्त, संयम, सातत्यपूर्ण प्रामाणिक संघर्ष आणि एकनिष्ठा किती महत्वाची आहे हे पटवून दिले. तसेच जावली तालुक्यातील उद्योजक यांनी तालुक्यातील विध्यार्थीना प्रेरणा देऊन त्यांचे उज्वल भविष्य यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. श्री शंकर देशमुख सर यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रकाश जवळ यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा डॉ सारंगपाणी शिंदे यांनी केले आणि आभार प्रा डॉ संजय धोंडे यांनी मानले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विविध अभ्यास क्रमाचे विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
*सहकार क्षेत्रामधील योग्य शिक्षण, प्रशिक्षण व कौशले प्राप्त करून विविध व्यवसायसह अनेक नोकरीच्या संधीसाठी युवकांनी स्वतःला सिद्धकरावे-* *सहाय्यक निबंधक श्री. सुनिल जगताप*
*सहकार क्षेत्रामधील योग्य शिक्षण, प्रशिक्षण व कौशले प्राप्त करून विविध व्यवसायसह अनेक नोकरीच्या संधीसाठी युवकांनी स्वतःला सिद्धकरावे-*
*सहाय्यक निबंधक श्री. सुनिल जगताप*
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथे सहकार संवर्धन आणि सहकारी चळवळीत युवकांचा सहभाग या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहकार निबंधक कार्यालय,मेढा येथील सहाय्यक निबंधक श्री. सुनिल जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सहकार हा मानवी जीवनाचा मूलाधार आहे. दुर्बल घटकांचा आधार म्हणून सहकाराकडे पाहिले जाते.देशाच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनात सहकारी संस्थांनी महत्वाचे योगदान दिले आहे. जागतिकीकरणानंतर सहकारी संस्थांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. असे असले तरीही ग्रामीण समाजातील अर्थिक दृष्टया दुर्बल घटकांचे हित जोपासण्याचे कार्य सहकारी संस्था पार पाडत आहेत. देशाचा सर्वसमावेशक विकास घडवून आणण्यासाठी सहकाराशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणुनच युवकांनी सहकारी चळवळीच्या विकासासाठी आणि सहकाराचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेऊन समाजात सहकार विषयक जागृती निर्माण करावी.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य,मेजर डॉ.अशोक गिरी यांनी या चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका सांगून विद्यार्थ्यानी सहकाराचे प्रशिक्षण घेऊन आपले नेतृत्व विकसित करावे आणि सामजिक परिवर्तनाबरोबरच सहकारी संस्थामधून उपलब्ध होत असलेल्या अनेक रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी केले. या चर्चासत्रासाठी महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.प्रमोद घाटगे, सहकार तज्ञ श्री. वैभव शिंदे, श्री. अक्षय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या चर्चासत्राचे संयोजन महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागामार्फत करण्यात आले.प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय धोंडे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. सुजित कसबे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.डॉ. मृणालिनी वाईकर यांनी केले.महाविद्यालयातील शिक्षक आणि १२० विद्यार्थी या चर्चासत्रात सहभागी झाले होते. चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विषेश परिश्रम घेतले.
Subscribe to:
Posts (Atom)
-
*शिक्षणातून आर्थिक उन्नती साधणे हा प्रत्येकाचा अधिकार - प्राचार्य मेजर डॉ . अशोक गिरी* आ .शशिंकात शिंदे कनिष्ठ महाविद्यालय मेढा अंतर्गत ...
-
*तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष व महिला गटात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय अव्वल स्थानावर* सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्...
-
शिवजयंती शिवचरित्रातून काय शिकावे सुरूवात करण्यावर भर द्या, कमतरतेवर लक्ष देऊ नका. रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बालशिवबा सोबत फक्त आठ द...