मेढा दि . ६ ऑगष्ट रोजी येथील आमदार शशिकांत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता अकरावीच्या नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम संपन्न झाला .दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही प्रत्येक विद्यार्थ्यांस गुलाब पुष्प देऊन त्यांचे महाविद्यालया चे वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले .
यावेळी सर्व कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन मा. प्राचार्य मेजर डॉ अशोक व्हि गिरी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच इ १२ वीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली .
सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपली विषय शिक्षक म्हणून ओळख करून दिली व पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या . यावेळी महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रा डॉ प्रमोद घाटगे सर यांची प्रमुख उपस्थिती होती . त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शिस्तीचे महत्व पटवून दिले व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा संतोष कदम यांनी केले . तर अध्यक्षीय मनोगत मा प्राचार्य यांनी व्यक्त करताना सर्व विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेज जीवनातील प्रथम दिवसात अनुभवलेल्या अनेक आठवणी सांगितल्या व वर्षभरातील अनेक शैक्षणीक उपक्रमांची माहिती दिली, विविध स्पर्धांमध्ये भाग घेणे आपल्या व्यक्तिमत्व विकासात कसे महत्वाचे आहे याचे तपशीलवार विवेचन केले.आपणच आपल्या आयुष्याला आकार देऊन आपल्या भविष्यातील ध्येये साध्य करूयात . यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्याचे काम आम्ही सर्व जण करू असे आश्वासन देऊन सर्व .
विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा डॉ सुधीर नगरकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना ई लर्निंग लायब्ररी ची ओळख करून दिली .
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता १२ वीच्या विद्यार्थीनी कुमारी सानिका सुतार व साक्षी ढेबे यांनी केले .
तर आभार प्रदर्शन कुमारी तानीया सपकाळ यांनी केले . यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .
No comments:
Post a Comment