Saturday, 9 August 2025

आलेवाडी डोंगर परिसरात विद्यार्थ्यानी टाकले १५००० जंगली वृक्षांचे बीज गोळे*

*आलेवाडी डोंगर परिसरात विद्यार्थ्यानी टाकले १५००० जंगली वृक्षांचे बीज गोळे*
  *आमदार शशिकांत  शिंदे महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम*
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आलेवाडी ता.जावली या गावातील डोंगर परिसरात विविध प्रकारच्या जंगली वृक्षांचे सुमारे १५००० बीज गोळे विद्यार्थ्यानी तयार करून ते गावालगत असलेल्या डोंगर परिसरात टाकण्यात आले आहेत. आलेवाडी गावामध्ये गेल्या दोन वर्षापासून नवसंजीवन जलसंवर्धन सामाजिक संस्था आलेवाडी यांच्या पुढाकारातून जलसंधारणाची विविध कामे सुरु आहेत.नजीकच्या काळात आलेवाडी गाव हे एक पाणीदार गाव म्हणून जावली तालुक्यात आपली ओळख निर्माण करण्याचा ध्यास या गावाने घेतला आहे.या गावाने हाती घेतलेल्या या जलसंधारण मोहिमेत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय सुद्धा उस्फुर्तपणे सहभागी झाले आहे.याचाच एक भाग म्हणून जलसंधारण कार्याला हातभार आणि गावाला या कार्यात प्रेरणा  देण्याच्या प्रमुख उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयामार्फत करण्यात आले असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य,मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांनी सांगितले.महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ.प्रमोद घाटगे, ठाणे येथील प्रश्न फाऊडेशन या संस्थेचे सातारा जिल्हा समन्वयक श्री.रजत नवले आणि नवसंजीवन जलसंधारण संस्थेचे सदस्य श्री.विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील ५० विद्यार्थी आणि ०५ शिक्षक व आलेवाडी गावातील ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी झाले होते.
  महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय धोंडे यांनी या उपक्रमाचे प्रास्ताविक केले राष्ट्रीय सेवा योजना समिती सदस्य प्रा.प्रकाश जवळ यांनी सहभागी विद्यार्थी व ग्रामस्थांचे आभार मानले. तसेच डॉ.प्रमोद चव्हाण डॉ.विनोद पवार,डॉ.बाळासाहेब उघडे या राष्ट्रीय सेवा योजना समिती सदस्यांनी उस्फुर्त सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment