Saturday, 27 September 2025

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे शारदीय नवरात्र उत्सवा निमित्ताने विद्यार्थ्यांना साठी आनंद सोहळ्याचे आयोजन*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे शारदीय नवरात्र उत्सवा निमित्ताने विद्यार्थ्यांना साठी आनंद सोहळ्याचे आयोजन*

मेढा . दि . २५ सप्टेंबर रोजी मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य मा . मेजर डॉ अशोक व्हि गिरी यांच्या पुढाकाराने तीन वर्षां पासून विद्यार्थ्यांना आपल्या प्राचीन सण, समारंभ व *विद्यार्थ्यांच्या विविध कला, गुणांना योग्य व्यासपीठ मिळावे* यासाठी सुरू केलेली नवरात्र उत्सवाची परंपरा कायम आहे .विद्यार्थीच्या सहभागातून सुरु असलेल्या या अनोख्या परंपरेत विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात . यावेळी घटस्थापनेच्या मुहूर्तावर आकर्षक सजावट व विजेच्या रोषणाई मध्ये आई अंबाबाईच्या प्रतिमेचे पूजन करून नियमित सर्व विद्यार्थी व विविध मान्यवरांच्या हस्ते आरती केली जाते .यानंतर चार दिवसांमधे विविध महाराष्ट्रीयन संस्कृतीची परंपरा जोपासणे व मुलांच्या विविध कला गुण कौशल्यांचा विकास करण्याच्या हेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते .यावेळी मुली नववारी साडी परिधान करून *मंगळागौर ,भोंडला, झिम्मा - फुगडी याचबरोबर अनेक पारंपारिक लोकनृत्य व गीते यावर नाच करत आपल्या कला संस्कृतींचे दर्शन घडवतात* . याबरोबर *मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व विविध स्पर्धामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. यावेळी रोज कार्यकमां साठी विविध मान्यवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक करतात . याचबरोबर मुले विविध प्रकारच्या फनी गेम मध्ये सहभागी होतात याचबरोबर *रोज कार्यक्रमाच्या समारोपाला रास दांडीयाचे आयोजन करून मुले व मुली स्वतंत्र गोल राऊंड करून दांडीया खेळतात*.
शेवटच्या दिवशी सर्व विविध प्रकारच्या स्पर्धांमधून व खेळांमधून प्रथम तीन क्रमांक काढून त्यांना ट्रॉफी व मेडल देऊन त्यांचे महाविद्यालय व संस्थेच्या वतीने कौतुक केले जाते . हा विविध प्रकारच्या स्पर्धांचा व भरगच्च अशा विविध गुण दर्शन कार्यकमाच्या आनंदसोहळाचा समारोप गुरुवारी संपन्न झाला .
या समारोपाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ अशोक व्हि गिरी उपस्थित होते त्यांनी यावेळी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख व संस्कृतीचे रक्षण, आपल्या प्राचीन परंपरा, लोककला, धार्मिक परंपरा यांचे जतन व्हावे . नवीन पिढीला याबाबत माहिती व्हावी .हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे असे आवर्जून प्रतिपादन केले त्याचबरोबर आपण आपल्या संस्कृतीतील या परंपरा पुढच्या पिढीला सांगावयाच्या असतील तर असे कार्यक्रम संपूर्ण राज्यभर व देशभर आयोजीत केले गेले पाहिजेत, अशी इच्छा व्यक्त केली . यावेळी विजेत्या सर्व स्पर्धकांना प्राचार्य यांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनिअर विभागाचे मुख्य समन्वयक प्रा . संतोष कदम यांनी केले. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ प्रमोद घाटगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्रीमती संध्या पोळ यांनी केले . तर आभार श्रीमती अनुराधा जाधव मॅडम यांनी माणले . या कार्यक्रमाला आर्थिक सहकार्य बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मेढा यांचे वतीने करण्यात आले तसेच हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संस्था अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे साहेब संस्था सचिव मा. वैशाली शिंदे मॅडम यांनी आयोजित महोत्सवास आवर्जून शुभेच्छा दिल्या. याशिवाय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील उप समन्वयक प्राध्यापिका सौ . सुषमा काळे व सर्व प्राध्यापक वर्ग तसेच एन एस एस विभाग प्रमुख डॉ . संजय धोंडे, प्राध्यापक श्री विनोद पवार ,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. श्री अतुल तिडके सर व सर्व सदस्य, तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी संपूर्ण कालावधीत देवीची आकर्षक रोशणाई व सजावट केली . याशिवाय महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले .

Wednesday, 24 September 2025

राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमातून विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार व जबाबदारी चे उत्तरदायित्व घेण्याचे शिक्षण मिळते*

*राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमातून विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार व जबाबदारी चे उत्तरदायित्व घेण्याचे शिक्षण मिळते* 
*बाळासाहेब शिंदे - समन्वयक, नाम फाउंडेशन, पश्चिम महाराष्ट्र* 
मेढा - दि.२४, सप्टेंबर रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाम फाउंडेशनचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, श्री.बाळासाहेब शिंदे यांना निमंत्रित केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयीन शिक्षणातील योगदान या विषयावरील आपले विचार मांडले. समाजाशी खरे नाते जोडण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होते. समाजाची खरी पारख होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक असणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शिक्षणातून ज्ञान मिळते आणि राष्ट्रीय सेवा उपक्रमातून जीवनाच्या वास्तवतेची जाणीव होते. एक जबाबदार व्यक्तिमत्व आणि उत्तम नेतृत्व निर्माण करून बलशाली राष्ट्राची उभारणी करण्याची खरी ताकद राष्ट्रीय सेवा योजनेे सारख्या उपक्रमात आहे.म्हणूनच स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत आखलेल्या देशाच्या सर्व शैक्षिणक धोरणांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाचा समावेश अनिवार्य केलेला आहे. असे आपल्या मनोगतातून त्यांनी विचार व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक.व्ही.गिरी यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना सांगितले की,विद्यार्थ्यांनी शिकत असताना आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी तसेच आपण समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहोत व समाजाप्रती आपल्या काही जबाबदाऱ्या असतात कर्तव्ये असतात या गोष्टीचे संस्कार विद्यार्थी दशेत जाणीवपूर्वक होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.यावेळी ठाणे येथील प्रश्न फाउंडेशनचे सातारा जिल्हा समन्वयक श्री.रजत नवले आणि महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.प्रमोद घाटगे तसेच नवसंजीवन जलसंवर्धन सामाजिक संस्था आलेवाडीचे सदस्य श्री.नवनाथ बिरामणे आणि श्री.विठ्ठल पवार हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय धोंडे यांनी केले. प्रा.प्रकाश जवळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. विनोद पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले तसेच प्रा. सौ. धनश्री देशमुख आणि प्रा. शुभांगी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व एन.एस.एस. समिती सदस्य,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Thursday, 11 September 2025

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन कार्यक्रम संपन्न*


*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन कार्यक्रम संपन्न*


मेढा दि . ९ सप्टेंबर रोजी डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ विद्यार्थी - शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते .दरवर्षीप्रमाणे पाच सप्टेंबर या दिनाचे औचित्य साधून कॉलेजचे प्राचार्य मेजर डॉ .अशोक गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते .या दिवशी मुले संपूर्ण एक दिवसीय वर्ग तासिका - कार्यभार, आपल्या शिक्षकांप्रमाणे सांभाळत असतात .प्रत्येक वर्गातील मुले व मुली योग्य वेश परिधान करून टाईम टेबल प्रमाणे वर्गामध्ये तास घेत असतात .या अनोख्या उपक्रमासाठी संपूर्ण शिक्षक वृंद त्यांना सहकार्य करत असतात . कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थी -शिक्षक व शिक्षक यांच्या सत्कार समारंभाने झाला . यावेळी विद्यार्थी शिक्षकांनी मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभाग घेतला होता . यावेळी त्यांना पेन देऊन त्यांचा व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला . यावेळी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ संजय धोंडे यांनी प्रास्ताविक केले . अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षकाची ओळख कर्तव्य व विद्यार्थ्यांप्रती असणारे आपले प्रामाणिक कर्तव्य याची आठवण करून दिली . बदलत असलेल्या या आधुनिक सोशल मीडियाच्या जगात शिक्षकांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असून त्यांनी हे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले जावे बदलत्या काळाप्रमाणे आपल्याला सुद्धा विविध आव्हानासाठी तयार असले पाहिजे व विविध कौशले प्राप्त करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले, यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व सर्व शिक्षकांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन एस एस विभाग प्रमुख डॉ संजय धोंडे, व डॉ विनोद पवार तर कनिष्ठ महाविद्यालयातील समन्वयक - प्रा. संतोष कदम सहा . समन्वयक प्रा. सौ.काळे एस एन . व सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले . यावेळी उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रा डॉ प्रमोद घाटगे यांनी आवर्जून शुभेच्छा दिल्या.कार्यकमाचे सूत्रसंचालन कुमारी सानिका सुतार व साक्षी ढेबे यांनी केले तर आभार कुमारी तानिया सपकाळ यांनी मानले .

Sunday, 7 September 2025

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे “रानभाज्या महोत्सव” २०२५ उत्साहात साजरा* पावसाळ्यात निसर्गाच्या कुशीत नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या रानभाज्यांचे महत्त्व विद्यार्थ्याच्या आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने रानभाज्या महोत्सवांचे आयोजन करण्यात आले. आजकालच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये माणसाकडे आरोग्य व समतोल आहार घेण्यासाठी अजिबात वेळ नाही. याचाच परिणाम म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या बाबतीत समस्या वाढत आहेत. याचा फायदा घेऊन विदेशी कंपन्या आपली निरनिराळी उत्पादने बाजारात विकत आहेत आणि युवा पिढी याचा अंधाधुंदपणे वापर करत आहेत. वेगवेगळी आकर्षक जंक आणि फास्ट-फूड मुळे भविष्यात आरोग्याच्या बाबतीत उद्भवणाऱ्या नव्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता निसर्गाशी नाते जोडून जंक फूड ला बगल देऊन आपला परंपरागत वारसा जपण्याचा प्रयत्न आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा वनस्पतीशास्त्र विभाग व तालुका कृषी विभाग जावली (मेढा) (अग्रणी महाविद्यालय योजना व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन योजना आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने “रानभाज्या महोत्सव” २०२५ आयोजित करण्यात आला होता.जावळी हा भाग डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेला व निसर्गाशी नाळ जोडलेला असल्याने तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी सुद्धा डोंगराळ भागातील असल्याने या उपक्रमासाठी जवळपास ४२ प्रकारच्या रान भाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची रेलचेल येथे दिसून आली. यात शेवगा, कुर्डू, केना, कार्टुली, उंबर, ढेसा, भालगा, भारंगी, चीचुरटे, शेंडवाल, मोहर, टाकाळा, माट, केळ फुले, कडीपत्ता, आळू, भोकर, मोरचौडा, उडीद पाने, ओवा, चुका, घोळ, बरका, पात्री या सारख्या अनेक रानभाज्याची रेसिपी विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणली होती. याच बरोबर त्यांची माहिती म्हणजेच त्यांचे शास्त्रीय नावं, कुळ तसेच पदार्थ बनविण्याच्या कृतींचीही माहिती देण्यात आली. तसेच कृषी विभाग जावली यांच्या वतीने रानभाज्यांची विक्री करण्यासाठी शेतकरी बचत गटांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. या मध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्यांची सुद्धा खरेदी विक्री झाली. खरेदी बरोबरच रानभाज्यांची माहिती फलकांच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी ग्राहकांना दिली. या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. श्री. अजय शेंडे (जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सातारा) यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रदर्शनातून शेतकऱ्यांनी रानभाज्यांचे महत्त्व व गुणधर्म समजून घ्यावेत असे आवाहन केले. त्याचबरोबर कृषी विभागा मार्फत चालू असणाऱ्या योजनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. उदय पवार (वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख) यांनी रानभाज्यांचे महत्व विषद केले. प्रमुख व्याख्यात्या डॉ. प्राची क्षीरसागर (असिस्टंट प्रोफेसर इन बॉटनी मॉर्डन कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स जीके, पुणे) यांनी त्यांच्या अनुभवातून मिळालेल्या विविध रानभाज्यांचे महत्व त्यांच्या अनुभवी शैलीत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना स्व: अनुभवातून रोजगाराच्या संधी कश्या आत्मसात कराव्यात तसेच रानभाज्यांचे संशोधन व संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक भर द्यावा असे मार्गदर्शन केले. याच बरोबर त्यांनी ग्रामीण भागातील विविध उत्पादने व सेवांसाठी उद्योजक म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले तसेच सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी रानभाज्यांचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व असल्याचे आवर्जून प्रतिपादन केले.या प्रदर्शनासाठी डॉ. प्रमोद घाटगे महाविद्यालय विकास समिती सदस्य मा. श्री. बापूसाहेब रूपनवर (मांडल कृषी अशधकारी, मेढा) श्री. किरण बर्गे, श्री. एम. डी. माने, श्री.अजय पवार, श्री. फडतरे व जावळी तालुक्यातील सर्वच सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते सदर रानभाजी महोत्सवाचे सर्व आयोजनात सहाय्यक कृषी अधिकारी श्री. भानुदास चोरगे व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. सचिन नेवसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याचबरोबर अग्रणी महाविद्यालय योजना समन्वयक डॉ. संजय भोसले यांचीही प्रमुख उपस्थिति होती. महाविद्यालयाच्या लिंकेज अंतर्गत डॉ. स्वप्नजा देशपांडे (विभागप्रमुख बी. हॉक. डी. पी. भोसले कॉलेज, कोरेगांव), श्रीमती गायत्री जाधव आणि श्रीमती सई रसाळ यांनी पाककृतींचे परीक्षण केले. सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती धनश्री देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन आणि कार्यक्रमाचे आभार श्री. प्रवीण जाधव (वनस्पतीशास्त्र विभाग) यांनी केले.प्रदर्शनात विद्यार्थ्यानी बनविलेल्या रानभाज्यांच्या पाककृतींचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतला तसेच, शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणलेल्या भाज्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाली. सदर पाककृती स्पर्धेमध्ये ४८ विद्यार्थ्यांनी ४२ वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्यांची पाककृती तयार करून आणली होती. त्यामधून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे नंबर काढण्यात आले आणि विजेत्यांना सन्मान चिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र याचे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. त्याचबरोबर रानभाज्या विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. या उपक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, महाविद्यालयाचे विद्यार्थी, पत्रकार यांनी उपस्थित राहून संपूर्ण सहकार्य केले.







Wednesday, 3 September 2025

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये गणेशोत्सवा निमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये गणेशोत्सवा निमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन*

मेढा दि . 31 ऑगष्ट रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयांमध्ये सालाबादा प्रमाणे गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . सकाळी आरती झाल्यानंतर सर्व मुलीसाठी मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तदनंतर लिंबू चमचा, बास्केटबॉल, संगीत खुर्ची व गरबा इत्यादी विविध कार्यक्रमा बरोबर विविध कलागुण दर्शन व पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मंगळागौरी आधारित अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य मुलींनी आपला उत्स्फुर्त सहभाग नोंदवला होता .
याचबरोबर मुलांसाठी ही बास्केटबॉल हाफपीच क्रिकेट व इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी प्रत्येक विभागातून प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले असून पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे ही दिली जाणार आहेत.
या स्पर्धा २८ ऑगष्ट ते ३०,ऑगष्ट 2025 पर्यत आयोजित करण्यात आल्या होत्या .
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनीही आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 
या विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व समन्वयक श्री.संतोष कदम सर सहाय्यक समन्वयक सौ.शिर्के एस एम मॅडम तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय धोंडे सर त्यांचे सर्व सहकारी तसेच विद्यार्थी प्रतिनिधी श्री रवींद्र ओंबळे, धनश्री शेलार, आर्पिता चव्हाण ,आकांक्षा चव्हाण, तृप्ती पवार व मधुरा शेलार तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेमध्ये सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब व सचिव सन्माननीय वैशाली शिंदे यांनी केले. गणेशोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम इ. यशस्वी पद्धतीने पूर्ण होण्यासाठी महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रा डॉ.प्रमोद घाटगे व महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्हि गिरी यांनी "विद्यार्थ्यांनी सर्व गुण संपन्न राहिले पाहिजे तसेच आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या उज्ज्वल विविध सामाजिक व सांस्कृतिक रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती यांचा परिचय व्हावा व त्यांचा विकास व्हावा असे मोलाचे मार्गदर्शन केले. अशाप्रकारे गणेशोत्सव महोत्सवानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा !!

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा मेढा/ दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा कर...