Posts

*ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनि आपल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या व कौशल्याच्या मदतीने यशोशिखरे पादाक्रांत करावीत:* *उद्योजक श्री. सुरेश पार्टे*मेढा: आमदार शशिकांत शिंदे महाविदयालयातील मुलांनी विविध परीक्षेत मिळवलेले यश आदर्शवत आहे असे मत वेणामाई पतसंस्था मर्यादित, मेढाचे चेअरमन श्री. सुरेश पार्टे यांनी व्यक्त केले. ते जयवंत प्रतिष्ठान संचालित आमदार शशिकांत शिंदे महाविदयालय मेढा येथे वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. दादासाहेब शिंदे, (आबा), विश्वस्त जयवंत प्रतिष्ठान हे होते.या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून संस्था प्रतिनिधी आणि महाविद्यालय विकास समिती सदस्य, उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी हे उपस्थित होते.जावली सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनि आपल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या व कौशल्याच्या मदतीने यशोशिखरे पादाक्रांत करावीत असे विचार प्रसिद्ध उद्योजक श्री. सुरेश पार्टे यांनी या प्रसंगी व्यक्त केले. महाविदयालयातील इतर विध्यार्थांनी याचा आदर्श घेऊन जीवनात वाटचाल करावी असे मत मांडले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दादासाहेब शिंदे यांनी ग्रामीण भागातील मुलांकडे प्रचंड बुद्धिमता आहे त्याचा त्यानी योग्य वापर करून भविष्य उज्वल करावे असे आवाहन केले.प्रा. डॉ. प्रमोद घाटगे, यांनी सर्व विध्यार्थांनी शुभेच्छा देत आयुष्यात आपले ध्येयप्राप्ती साठी प्रयत्न करावे असे नमूद केले.महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी कष्ट, सकारात्मक विचार आणि जिद्ध या गोष्टी मुलांना यशाकडे घेऊन जातील असे मत व्यक्त केले. याप्रसंगी सर्व गुणवंत खेळाडू आणि विविध क्षेत्रांमध्ये नोकरी साठी निवड झालेल्या विध्यार्थांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अहवाल वाचन जिमखाना विभाग प्रमुख प्रा प्रमोद चव्हाण यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रकाश जवळ यांनी करून दिला, आभार प्रा. संजय धोंडे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. गायत्री जाधव यांनी केले.सदर कार्यक्रमास महाविदलायातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विध्यार्थी बहुसंख्येने  उपस्थित होते.

Image