Skip to main content

Posts

Showing posts from December, 2022

सेवागिरी युवा महोत्सवातमेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय व जयवंत प्रतिष्ठान हुमगाव या दोन्ही संघाचा पथनाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक...

सेवागिरी युवा महोत्सवात मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय व जयवंत प्रतिष्ठान हुमगाव या दोन्ही संघाचा पथनाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक... ================= मेढा - प. पू. सेवागिरी महाराज पुसेगाव,यांच्या अमृतमहोत्सवी यात्रानिमित्त,श्री सेवागिरी ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेला नववा जिल्हास्तरीय युवा महोत्सव नुकताच उत्सवात पार पडला.या महोत्सवात घेण्यात आलेल्या पथनाट्य स्पर्धेत, येथील जयवंत प्रतिष्ठान आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या,विध्यार्थी कलाकारांनी सादर केलेल्या पथनाट्यांचे विभागून द्वितीय क्रमांक आले. जयवंत प्रतिष्ठान हुमगाव आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केल्या बद्दल दोन्ही विजेत्या संघांना रोख रक्कम,चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.विध्यार्थी कलाकारांनी तसेच जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संघाने,मिळवलेल्या या यशाबद्दल,संस्थेचे अध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, सचिव सौ. वैशालीताई शिंदे,सर्व विश्वस्त आणि महाविद्यालयाचे प्राचार्य,मेजर डॉ.अशोक गिरी,उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे तसेच सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व म

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी साकारला भव्य वनराई बंधारा*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी साकारला भव्य वनराई बंधारा* आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर नुकतेच मौजे गवडी ता. जावली येथे 'युवकांचा ध्यास ग्राम- शहर विकास'  हे ब्रीदवाक्य घेऊन संपन्न झाले. या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या 100 स्वयंसेवक -स्वयंसेविका यांनी मौजे गवडी येथील वेण्णा नदीवर वनराई बंधारा बांधला. हा बंधारा जवळपास 50 फूट लांब 5 फूट रुंदीचा असून त्याची उंची सहा फुटापर्यंत आहे. सदर बंधारा बांधकाम करण्यासाठी गवडी गावचे सरपंच श्री. राजाराम खुडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थानीही सहभाग घेतला तसेच तालुका कृषी अधिकारी, मेढा यांचे या वनराई बंधारा उभरणीत विशेष तांत्रिक सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. सदर बंधारा बांधकामासाठी 1200 सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या , तसेच पाच ट्रॉली काळी माती, वाळू इ.साहित्य वापरण्यात आले आहे. या बंधारामध्ये 300 मीटर लांब आणि चार फुटापर्यंत पाण्याची पातळी वाढली असून त्यामुळे गवडी गावाला या उन्हाळ्यात पाण्याचा विपुल साठा होणार आहे. या बं

https://youtu.be/RYqKTmSRMq0l

ब्लॉग https://youtu.be/RYqKTmSRMq0

*जिल्हास्तरीय शालेय क्रिडा बॉक्सिंग स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे जू . कॉलेजचे यश*सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत १९ वर्षाखालील वयोगटात *पार्थ रमेश शिंगटे* याने प्रथम क्रमांक मिळविला व त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली .आज १० ऑक्टोबर रोजी झालेल्या स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडीयम सातारा या ठिकाणी सुरळीत पार पडल्या . स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री . जाधव टी .ए .व शारीरिक शिक्षक संचालक प्रा . प्रमोद चव्हाण हे होते .सदर विद्यार्थ्यांचे कॉलेजचे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी अभिनंदन केले व त्यांना विभागीय स्पर्धेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

*जिल्हास्तरीय शालेय क्रिडा बॉक्सिंग स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे जू . कॉलेजचे यश* सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत १९ वर्षाखालील वयोगटात *पार्थ रमेश शिंगटे* याने प्रथम क्रमांक मिळविला व त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली .आज १० ऑक्टोबर रोजी झालेल्या स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडीयम सातारा या ठिकाणी सुरळीत पार पडल्या .  स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री . जाधव टी .ए .व शारीरिक शिक्षक संचालक प्रा . प्रमोद चव्हाण हे होते .सदर विद्यार्थ्यांचे कॉलेजचे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी अभिनंदन केले व त्यांना विभागीय स्पर्धेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

मित्रपुस्तकांसारखे मित्र नाही. पुर्वी आपल्याकडचे पुस्तक दुसर्‍याला वाचायला दिले की परत यायची शक्यता कमी होती. पण आता ही PDF ebook पुस्तके तुम्ही सर्वा मित्र आणि नातेवाईकांना मेल किंवा व्हाट्सऍपवर देऊनही तुमच्याचकडे रहातात. अगदी ज्ञानासारखीच. ज्ञान वाटल्याने वाढते. दुःख वाटल्याने कमी होते. दुःख कमी करण्याचा दुसरा उपाय म्हणजे ज्ञान होय. दुःखाचे कारण आणि उपाय समजला की दुःख कमी होते. जीवनात आनंद येतो.पुर्वी आनंद नावाचा सिनेमा फ़ार गाजला होता. त्यात हिरो राजेश खन्नाला कॅन्सर होतो आणि तो मरणार हे नक्की होते. सिनेमा फ़ार चांगला होता खरे, पण त्यातून एक चुकीचा संदेश जनमनात कोरला गेला. कॅन्सर म्हणजे मरण. पण हे खरे नाही. कॅन्सर बरा होतो. याबद्दलच्या चुकीच्या समजुती काढून टाकणारे एक पुतक आम्ही आपणाला देत आहोत. इंग्लंडमधील प्रसिद्ध कॅन्सरतज्ञ लेखकांनी ते लिहिलेले आहे. हे पुस्तक वाचा आणि सर्वांना वाचायला द्या. दुसरे एक पुस्तक आहे, विरहिणी. नववीमधे शिकणार्‍या एका मुलीने संस्कृतमधे लिहिलेले हे दीर्घकाव्य आहे. अतिशय सुंदर आहे.लहान मुलांसाठी एक मजेदार पुस्तक आहे. लाडोबा. बाबा आणि मुलगा यांच्यातील नात्यावर हे छान छान पुस्तक वाचा आणि वाचायला द्या.इंग्लिशमधील सुप्रसिद्ध लेखक समरसेट मॉम यांच्या सहा कथांचा उत्कृष्ट अनुवाद वाचायला विसरू नका. तसेच एका स्त्रीच्या अधोगतीची कहाणी सांगणारी कादंबरी वारांगना वाचनीय आहे. वारांगना अंकुश शिंगाडे कादंबरीhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/varangana_ankush_shingade.pdfविरहिणी निकिता पाटील संस्कृत काव्यhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/virahini_nikita_patil.pdfकॅन्सरचा परिचय नील सरोज सहस्रबुधे माहितीhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/cancer__neil_saroj_sahasrabuddhe.pdfलाडोबा नितीन मोरे बालसाहित्यhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/ladobaa_nitin_more.pdfसुखी जोडपे आणि इतर कथा वृषाली जोशी सॉमरसेट मॉम कथासंग्रहhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/sommerset2_stories__vrishali_joshi.pdfदिवाळी अंकांसाठी लिंकhttp://www.esahity.com/2312-235023732327233323682344.htmlमराठीतून चारही वेदांसाठी लिंकhttp://www.esahity.com/23092343238123512366234023812350.htmlडोहाचे अंतरंग1 अरविंद बुधकर कथासंग्रह http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/dohache_antarang_1_arvind_budhkar.pdfऐंद्रजाल सुप्रिया जोशी कादंबरीhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/aindrajal_supriya_joshi.pdfअथातो धर्मजिज्ञासा -4- अथर्ववेद निकिता पाटील अध्यात्मhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/dharmjidnyasa_4_nikita_patil.pdfमूळ संस्कृत वाल्मिकी रामायण आणि त्याचा मराठीत श्लोकानुवाद श्याम कुलकर्णीhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/ramayan_1_shyam_kulkarni.pdfअर्धप्रकाशित खिडकी सौरभ वागळे डिटेक्टिव्ह अल्फा कादंबरीhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/khidkee_saurabh_wagle.pdfचक्रमादित्य दरबार भाग ४ डॉ. नितीन मोरे विनोदी नाटकhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/chakramaditya_4_nitin_more.pdfपोरसपुराण सुरेखा तडकळकर इतिहासhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/porus_puran_surekha_terdalkar.pdfरास्वसंघ मुग्धा धनंजय वैचारिकhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/rss_devanuru_mugdha_.pdfशिवशाहीचे आधारस्तंभ (शिवरायांच्या मावळ्यांच्या कथा) अंकुश शिंगाडेhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shivshahi_ankush_shingade.pdf१०००० पानी महाभारत संपूर्ण – अशोक कोठारे- अध्यात्मइतके डिटेल महाभारत मराठीत इतरत्र कोठेही मिळत नाही. हे विनामूल्य आहे.http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/mahabharata_esahity.pdfअधिक माहितीसाठी www.esahity.comसंपर्क: esahity@gmail.comWhatsapp: 9987737237सुनीळ सामंतटीम ई साहित्यअशी पुस्तके नियमित मिळण्यासाठी काही खर्च नाही. फ़क्त आपले नाव व जिल्हा 9987737237 ला Whatsapp करा.हा मेसेज कृपा करून आपल्या मराठी मित्रांना *forward* करा.l

मित्र पुस्तकांसारखे मित्र नाही. पुर्वी आपल्याकडचे पुस्तक दुसर्‍याला वाचायला दिले की परत यायची शक्यता कमी होती. पण आता ही PDF ebook पुस्तके तुम्ही सर्वा मित्र आणि नातेवाईकांना मेल किंवा व्हाट्सऍपवर देऊनही तुमच्याचकडे रहातात. अगदी ज्ञानासारखीच. ज्ञान वाटल्याने वाढते. दुःख वाटल्याने कमी होते. दुःख कमी करण्याचा दुसरा उपाय म्हणजे ज्ञान होय. दुःखाचे कारण आणि उपाय समजला की दुःख कमी होते. जीवनात आनंद येतो. पुर्वी आनंद नावाचा सिनेमा फ़ार गाजला होता. त्यात हिरो राजेश खन्नाला कॅन्सर होतो आणि तो मरणार हे नक्की होते. सिनेमा फ़ार चांगला होता खरे, पण त्यातून एक चुकीचा संदेश जनमनात कोरला गेला. कॅन्सर म्हणजे मरण. पण हे खरे नाही. कॅन्सर बरा होतो. याबद्दलच्या चुकीच्या समजुती काढून टाकणारे एक पुतक आम्ही आपणाला देत आहोत. इंग्लंडमधील प्रसिद्ध कॅन्सरतज्ञ लेखकांनी ते लिहिलेले आहे. हे पुस्तक वाचा आणि सर्वांना वाचायला द्या.  दुसरे एक पुस्तक आहे, विरहिणी. नववीमधे शिकणार्‍या एका मुलीने संस्कृतमधे लिहिलेले हे दीर्घकाव्य आहे. अतिशय सुंदर आहे. लहान मुलांसाठी एक मजेदार पुस्तक आहे. लाडोबा. बाबा आणि मुलगा यांच्यातील नात्

*तालुकास्तरीय विविध मैदानी स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे कॉलेजचे घवघवीत यश*सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय विविध मैदानी स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात १०० मीटर धावणे मध्ये आदित्य मर्ढेकर याने प्रथम क्रमांक पटकावला तर ८०० मीटर धावणे मध्ये विजय बेलोशे याने प्रथम क्रमांक मिळवला . २०० धावणे मीटर मध्ये संस्कार धनावडे याने द्वितीय क्रमांक मिळवला १५०० मीटर धावण्याच्या मध्ये प्रणव सपकाळ याने तृतीय क्रमांक मिळवला .४०० मीटर धावणे मध्ये सौरभ मोरे याने प्रथम क्रमांक मिळविला तर ५ किलो मिटर धावणे द्वितीय क्रमांक आदित्य मर्ढेकर याने द्वितीय क्रमांक तर ऋषीकेष गोळे यानेतृतीय क़मांक मिळवला .लांब उडी प्रथम क्रमांक निलेश दातीर तर विजय बेलोशे द्वितीय क्रमांक मिळविला . गोळा फेक मध्ये निलेश दातीर याने द्वितीय क्रमांक मिळवला . यश जनता माध्यमिक विद्यालय करंदी या ठिकाणी सदर स्पर्धा पार पडल्या . स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री . जाधव टी .ए .व शारीरिक शिक्षक संचालक प्रा . प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले . सदर विद्यार्थ्यांचे कॉलेजचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी तसेच उपप्राचार्य डॉ .प्रमोद घाटगे यांनी अभिनंदन केले .

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसिंह नाना पाटील पुण्यतिथी उत्साहात साजरी. मेढा - जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांचा महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसिंह नाना पाटील पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील या महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांनी असे प्रतिपादन केले की भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायद

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसिंह नाना पाटील पुण्यतिथी उत्साहात साजरी.मेढा - जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसिंह नाना पाटील पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील या महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांनी असे प्रतिपादन केले की भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात. त्याचप्रमाणे नाना पाटील यांच्या विषयी बोलताना त्यांनी असे म्हटले कि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या वरती प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता. पुढील काळात ब्रिटिशांच्या अन्याय कारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला. साताऱ्यातील प्रतिसरकारच्या स्थापनेत त्यांचा वाटा महत्त्वाचा होता. नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला मोठे योगदान दिले. भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. प्रतिसरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण भागात ब्रिटिशांचे अस्तित्व नाममात्र राहिले. नाना पाटील यांनी युवकांची संघटना स्थापन करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केले. प्रती सरकारचे नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले. महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये नाना पाटलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. या काळामध्ये महाराष्ट्रातील सातारा, सांगली या परिसरात नाना पाटलांची ब्रिटिशांवर एक मोठी दहशद निर्माण झाली होती. प्रतिसरकार अथवा 'पत्री सरकार' म्हणून या काळात ते ओळखले गेले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख श्री.शंकर गेजगे यांनी केले.

*शिक्षणातून आर्थिक उन्नती साधणे हा प्रत्येकाचा अधिकार - प्राचार्य मेजर डॉ . अशोक गिरी*आ .शशिंकात शिंदे कनिष्ठ महाविद्यालय मेढा अंतर्गत 'करिअर ओरिएटल' कोर्स मधील इयत्ता १२ वी सायन्स मधील करिअर या विषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . जेई, सीईटी ,एन . डी . ए . इत्यादी मधील स्पर्धा व करिअर संधी या विषयी ची माहीती देण्यात आली . दिशा करिअर अकॅडमी वाई चे संस्थापक प्रा . डॉ नितीन कदम यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले . अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपस्थित प्राचार्य मेजर डॉ . अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाने सर्वांगीण विकास झाला पाहिजे प्रत्येकाने शिक्षणातून आपली आर्थिक प्रगती साधली पाहिजे . याविषयी आपले विचार व्यक्त केले . कार्यक्रमास उपस्थित प्रा . महेश ढेबे, प्रा संतोष कदम, प्रा . सौ . कदम मॅडम, दाभाडे मॅडम, पाटील मॅडम व सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने हजर होता . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री . संतोष कदम यांनी केले तर आभार श्रीमती ज्योती कदम यांनी मानले .

*शिक्षणातून आर्थिक उन्नती साधणे हा प्रत्येकाचा अधिकार - प्राचार्य मेजर डॉ . अशोक गिरी* आ .शशिंकात शिंदे कनिष्ठ  महाविद्यालय मेढा अंतर्गत 'करिअर ओरिएटल' कोर्स मधील इयत्ता १२ वी सायन्स मधील करिअर या विषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . जेई, सीईटी ,एन . डी . ए . इत्यादी मधील स्पर्धा व करिअर संधी  या विषयी  ची माहीती देण्यात आली . दिशा करिअर अकॅडमी वाई चे संस्थापक प्रा . डॉ नितीन कदम यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले . अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपस्थित प्राचार्य मेजर डॉ . अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाने सर्वांगीण विकास झाला पाहिजे प्रत्येकाने शिक्षणातून आपली आर्थिक प्रगती साधली पाहिजे . याविषयी आपले विचार व्यक्त केले . कार्यक्रमास उपस्थित प्रा . महेश ढेबे, प्रा संतोष कदम, प्रा . सौ . कदम मॅडम, दाभाडे मॅडम, पाटील मॅडम व सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने हजर होता . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री . संतोष कदम यांनी केले तर आभार श्रीमती ज्योती कदम यांनी मानले .

*आमदार शशिकांत शिंदे महविद्यालयात नवीन मतदार नोंदणी मेळयाव्याचे आयोजन* आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा व तहसील कार्यालय, जावली (मेढा) यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन मतदार नोंदणी मेळाव्याचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. मतदानाच्या हक्का पासून वंचित राहू नये यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी जावलीचे नायब तहसिलदार श्री.प्रशांत शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी नवीन मतदारांना मतदान नोंदणी अर्ज भरण्यासंबंधी मार्गदर्शन करुन मतदार हा लोकशाहीचा आधास्तंभ असतो देशाची लोकशाही प्रगल्भ आणि बळकट करण्यात मतदार महत्वाची भूमिका बजावतात त्यासाठी अधिकाधिक मतदारांची नोंदणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.कार्यकर्माचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आणि हक्क असून त्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे तसेच मतदान ओळखपत्राचा शासनाच्या विविध योजनेसाठी होत असलेला वापर आणि त्याचे महत्व या बाबतीत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमस उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय भोसले आणि डॉ. उदय पवार यांनी केले होते. यावेळी महाविद्यालयातील ७२ विद्यार्थ्याना नवीन मतदार नोंदणी अर्जांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. संजय भोसले यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ. धनश्री देशमुख यांनी केले.

*आमदार शशिकांत शिंदे महविद्यालयात नवीन मतदार नोंदणी मेळयाव्याचे आयोजन*  आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा व तहसील कार्यालय, जावली (मेढा)  यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन मतदार नोंदणी मेळाव्याचे आयोजन महाविद्यालयात  करण्यात आले. मतदानाच्या हक्का पासून वंचित राहू नये यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी जावलीचे  नायब तहसिलदार श्री.प्रशांत शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी नवीन मतदारांना मतदान नोंदणी अर्ज भरण्यासंबंधी मार्गदर्शन करुन मतदार हा लोकशाहीचा आधास्तंभ असतो  देशाची लोकशाही प्रगल्भ आणि बळकट करण्यात मतदार महत्वाची भूमिका बजावतात त्यासाठी अधिकाधिक मतदारांची नोंदणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.कार्यकर्माचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आणि हक्क असून त्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे तसेच मतदान ओळखपत्राचा शासनाच्या विविध योजनेसाठी होत असलेला वापर आणि त्याचे महत्व या बाबतीत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमस उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे तसेच

*तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष व महिला गटात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय अव्वल स्थानावर*सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत दि .३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे ज्युनियर कॉलेजचे १९ वर्षाखालील गटात खो - खो स्पर्धेत मुली व मुले यांनी प्रथम क्रमांक मिळविला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघाची निवड झाली .मामुर्डी ता.जावली या ठिकाणी सदर स्पर्धा पार पडल्या असून स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री. तेजेस जाधव व शारीरिक शिक्षण संचालक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले . महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी तसेच उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांना जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

*तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष व महिला गटात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय अव्वल स्थानावर* सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत दि .३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या शालेय  तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे ज्युनियर कॉलेजचे  १९ वर्षाखालील गटात खो - खो स्पर्धेत मुली व मुले यांनी  प्रथम क्रमांक मिळविला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघाची निवड झाली . मामुर्डी ता.जावली या ठिकाणी सदर स्पर्धा पार पडल्या असून  स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री. तेजेस जाधव व शारीरिक शिक्षण  संचालक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले .           महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी तसेच  उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांना जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी  शुभेच्छा दिल्या.

आम्ही सातारकर

आज सातारा जिल्हा व त्याचे महत्त्व सांगताना उर भरुन येत आहे.जे सातारकर आहेत त्याना स्वाभिमान वाटेल.व जे मराठी आहेत त्यांना सातारा जिल्हा महाराष्ट्रात आहे याचा अभिमान वाटेल  . * * * * * * *सातारा* * * * * *  🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔  🏰सातारा जिल्ह्याची ७ रंजक माहिती      🚩 *आम्ही सातारकर*🚩    "शिव-पद-स्पर्श-भूमी" 🏰 अजिंक्यतारा *सातारा* 🏰  छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज् - *छत्रपती श्री उदयनराजे भोसले* 👉 *सातारा* छत्रपती शिवरायांच्या पत्नी, शंभूराजांच्या आई   - सईबाई निंबाळकर  👉 फलटण, *सातारा* श्री समर्थ रामदास स्वामींचा सहवास - सज्जनगड 👉 *सातारा* अफजल खानाचा वध  - प्रतापगड किल्ला 👉 *महाबळेश्वर,सातारा* महाराष्ट्र चे पहिले मुख्यमंत्री - यशवंतराव चव्हाण  👉 *कराड, सातारा* महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  - पृथ्वीराज चव्हाण  👉 *कराड, सातारा* राजकारणातील धुरंधर चाण्यक्य  - शरद पवार  👉 *नांदवळ, सातारा* झाशीच्या रणरागिणी  - महाराणी लक्ष्मीबाई 👉 *धावडशी, सातारा* भारतातील पाहिल्या महिला शिक्षिका  - सावित्रीबाई फुले  👉 *नायगाव, सातारा* मराठ्याचे सरसेनापती  - हंबीररावजी मोहीते  👉 *