*आमदार शशिकांत शिंदे महविद्यालयात नवीन मतदार नोंदणी मेळयाव्याचे आयोजन* आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा व तहसील कार्यालय, जावली (मेढा) यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन मतदार नोंदणी मेळाव्याचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. मतदानाच्या हक्का पासून वंचित राहू नये यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी जावलीचे नायब तहसिलदार श्री.प्रशांत शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी नवीन मतदारांना मतदान नोंदणी अर्ज भरण्यासंबंधी मार्गदर्शन करुन मतदार हा लोकशाहीचा आधास्तंभ असतो देशाची लोकशाही प्रगल्भ आणि बळकट करण्यात मतदार महत्वाची भूमिका बजावतात त्यासाठी अधिकाधिक मतदारांची नोंदणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.कार्यकर्माचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आणि हक्क असून त्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे तसेच मतदान ओळखपत्राचा शासनाच्या विविध योजनेसाठी होत असलेला वापर आणि त्याचे महत्व या बाबतीत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमस उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय भोसले आणि डॉ. उदय पवार यांनी केले होते. यावेळी महाविद्यालयातील ७२ विद्यार्थ्याना नवीन मतदार नोंदणी अर्जांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. संजय भोसले यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ. धनश्री देशमुख यांनी केले.

*आमदार शशिकांत शिंदे महविद्यालयात नवीन मतदार नोंदणी मेळयाव्याचे आयोजन*

 आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा व तहसील कार्यालय, जावली (मेढा)  यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन मतदार नोंदणी मेळाव्याचे आयोजन महाविद्यालयात  करण्यात आले. मतदानाच्या हक्का पासून वंचित राहू नये यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी जावलीचे  नायब तहसिलदार श्री.प्रशांत शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी नवीन मतदारांना मतदान नोंदणी अर्ज भरण्यासंबंधी मार्गदर्शन करुन मतदार हा लोकशाहीचा आधास्तंभ असतो  देशाची लोकशाही प्रगल्भ आणि बळकट करण्यात मतदार महत्वाची भूमिका बजावतात त्यासाठी अधिकाधिक मतदारांची नोंदणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.कार्यकर्माचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आणि हक्क असून त्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे तसेच मतदान ओळखपत्राचा शासनाच्या विविध योजनेसाठी होत असलेला वापर आणि त्याचे महत्व या बाबतीत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमस उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे   कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय भोसले आणि डॉ. उदय पवार यांनी केले होते. यावेळी महाविद्यालयातील  ७२ विद्यार्थ्याना नवीन मतदार नोंदणी अर्जांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. संजय भोसले यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ. धनश्री देशमुख यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

*तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष व महिला गटात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय अव्वल स्थानावर*सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत दि .३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे ज्युनियर कॉलेजचे १९ वर्षाखालील गटात खो - खो स्पर्धेत मुली व मुले यांनी प्रथम क्रमांक मिळविला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघाची निवड झाली .मामुर्डी ता.जावली या ठिकाणी सदर स्पर्धा पार पडल्या असून स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री. तेजेस जाधव व शारीरिक शिक्षण संचालक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले . महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी तसेच उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांना जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.