*तालुकास्तरीय विविध मैदानी स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे कॉलेजचे घवघवीत यश*सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय विविध मैदानी स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात १०० मीटर धावणे मध्ये आदित्य मर्ढेकर याने प्रथम क्रमांक पटकावला तर ८०० मीटर धावणे मध्ये विजय बेलोशे याने प्रथम क्रमांक मिळवला . २०० धावणे मीटर मध्ये संस्कार धनावडे याने द्वितीय क्रमांक मिळवला १५०० मीटर धावण्याच्या मध्ये प्रणव सपकाळ याने तृतीय क्रमांक मिळवला .४०० मीटर धावणे मध्ये सौरभ मोरे याने प्रथम क्रमांक मिळविला तर ५ किलो मिटर धावणे द्वितीय क्रमांक आदित्य मर्ढेकर याने द्वितीय क्रमांक तर ऋषीकेष गोळे यानेतृतीय क़मांक मिळवला .लांब उडी प्रथम क्रमांक निलेश दातीर तर विजय बेलोशे द्वितीय क्रमांक मिळविला . गोळा फेक मध्ये निलेश दातीर याने द्वितीय क्रमांक मिळवला . यश जनता माध्यमिक विद्यालय करंदी या ठिकाणी सदर स्पर्धा पार पडल्या . स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री . जाधव टी .ए .व शारीरिक शिक्षक संचालक प्रा . प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले . सदर विद्यार्थ्यांचे कॉलेजचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी तसेच उपप्राचार्य डॉ .प्रमोद घाटगे यांनी अभिनंदन केले .
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसिंह नाना पाटील पुण्यतिथी उत्साहात साजरी.
मेढा - जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसिंह नाना पाटील पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील या महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांनी असे प्रतिपादन केले की भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात. त्याचप्रमाणे नाना पाटील यांच्या विषयी बोलताना त्यांनी असे म्हटले कि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या वरती प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता. पुढील काळात ब्रिटिशांच्या अन्याय कारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला. साताऱ्यातील प्रतिसरकारच्या स्थापनेत त्यांचा वाटा महत्त्वाचा होता. नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला मोठे योगदान दिले. भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. प्रतिसरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण भागात ब्रिटिशांचे अस्तित्व नाममात्र राहिले. नाना पाटील यांनी युवकांची संघटना स्थापन करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केले. प्रती सरकारचे नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले. महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये नाना पाटलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. या काळामध्ये महाराष्ट्रातील सातारा, सांगली या परिसरात नाना पाटलांची ब्रिटिशांवर एक मोठी दहशद निर्माण झाली होती. प्रतिसरकार अथवा 'पत्री सरकार' म्हणून या काळात ते ओळखले गेले.
Comments
Post a Comment