Skip to main content

Posts

Showing posts from March, 2023

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा,कबड्डी संघाचा प्रथम

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा,कबड्डी संघाचा प्रथम क्रमांक* ============ मेढा 23 मार्च 2023 जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा, नेहरू युवा मंडळ सातारा व यशवंतराव चव्हाण स्कुल ऑफ सोशल वर्क जाकातवाडी सातारा, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला. या कबड्डी स्पर्धा सातारा येथील शाहू स्टेडियम येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण दहा संघानी सहभाग घेतला होता.त्यावेळी अटीटतीच्या व रोमहर्षक झालेल्या या स्पर्धेत,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून,प्रथम क्रमांक प्राप्त केला.महाविद्यालयातील रोहित जाधव, राजेश देशमुख, कार्तिक कासार, ओमकार शेलार, प्रमोद जाधव,अभिषेक शिंदे व पुनीत पवार या खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळी करून हे यश संपादित केले.या सर्व विध्यार्थी खेळाडूंना जिमखाना प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.या यशाबद्दल सर्व खेळाडुंचे संस्था अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, सचिव सौ. वैशाली शिंदे, सर्व विश्वस्त तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य मे

' *सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी' - प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*

' *सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी' - प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*  आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सावित्रीबाई फुले यांचा पुण्यदिन साजरी करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी व उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी असे प्रतिपादन केले की, सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या समाजाला नवीन दिशा देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांशी समरस होऊन त्या शिक्षित झाल्या. पहिली स्त्री शिक्षिका म्हणून आज त्या ओळखल्या जातात. शिक्षण घेतल्यानंतर समाज जागृत झाला पाहिजे यासाठी त्यांनी मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली. वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करला परंतु त्या आपल्या ध्येयापासून वंचित झाल्या नाहीत. त्यांनी शिक्षणाबरोबर सामाजिक जागृती करण्याचा देखील प्रयत्न केला. पुणे येथील भिडे वाड्यात सुरू केलेली पहिली मुलींची शाळा आज एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून उभा आहे. ह

संघर्षातून स्वतःला सिद्ध करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करणे आपले कर्तव्य

संघर्षातून स्वतःला सिद्ध करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करणे आपले कर्तव्य! प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी. ===================== " जगभरात आठ मार्च या दिवशी महिलांच्या कार्याचा,त्यांच्या विचारांचा,त्यांच्या शक्तीचा ,आणि त्यांच्या अस्मितेचा एकूणच त्यांच्या अस्तित्वाचाच गौरव केला जातो.असे असताना आपले महाविद्यालय ज्या मातीवर उभे आहे त्याच जावळीच्या मातीत रुजून फुलून इतरांना फुलविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान करणे महाविद्यालयाची सामाजिक बांधिलकी असून त्याच बांधिलकीला जपताना आज हा सत्कार समारंभ साजरा करत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.संघर्षातून स्वतःला सिद्ध करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करणे आपले कर्तव्य!" असे मत प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी व्यक्त केले. जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन व या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त करताना वरील विचार म

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे ,राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेनेमराठी भाषा गौरव दिन साजरा

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे , राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेने 1मराठी भाषा गौरव दिन साजरा ========≠======== जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील मराठी विभाग,ग्रंथालय व ज्ञानस्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक 27 फेब्रुवारी रोजी,कवी कुसुमाग्रज जन्मदिन व मराठीभाषा गौरव दिनानिमित्त,राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्तरावरील विध्यार्थ्यांच्या ऑनलाईन स्वरचित काव्यवाचन स्पर्धा आयोजित करून, मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.यावेळी स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.अशोक व्ही.गिरी होते.तर उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यावेळी उपस्थित होते. उदघाटनानंतर या दोन्ही मान्यवरांनी, स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.यावेळी प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी सर म्हणाले " भारतात साजऱ्या केल्या जाणार्‍या विविध विशेष दिवसां पैकी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे प्रसिद्ध मराठी लेखक - कुसुमाग्रज यांची जयंती. दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र, भारत आणि जगभरात “मराठी राजभाषा दिन” किंवा “मराठी भाषा गौरव दिन ” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेच्या जडण घडणीत या महान व्यक्त