*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न* ===========

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न* ====================== मेढा : 19 मे 2023 " कोणत्याही स्पर्धेत यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते, त्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी असावी लागते त्याशिवाय यश संपादन करता येत नाही " असे मत प्रसिद्ध उद्योजक उदयसिंह चौघुले यांनी व्यक्त केले. जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उद्योजक मा. उदयसींह चौघुले हे उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते.यावेळी उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी यांनीही आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.त्यावेळी ते म्हणाले " सातत्यपूर्ण व सुनियोजित प्रयत्न, शिस्त,प्रखर निर्णयक्षमता व जिद्द अंगी बाळगली तर आपले आयुष्य अत्यंत अनुकरणीय व दैदिप्यमान बनविण्यास मदत म...