आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा!!!

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा!!!

मेढा दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी लीड कॉलेज कार्यक्रम अंतर्गत ग्रंथालय व ज्ञान स्त्रोत केंद्र यांच्या वतीने ग्रंथालय शास्त्राचे प्रणेते डॉ. एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. संजय ढेरे साहेब तांत्रिक सहाय्यक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सातारा हे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी उपस्थित होते.
     मा.ढेरे यांनी आपल्या मनोगतात वाचनाचे महत्त्व,नेमके काय वाचावे,
विद्यार्थ्यांनी कोणत्या पुस्तकातून कसे संदर्भ काढावेत तसेच आत्मचरित्र पर पुस्तके कशी वाचावीत हे सांगितले.
बुद्धीला सशक्त बनवण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले. तर अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही. गिरी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन हे महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करून आपले आयुष्य बदलावे असा संदेश दिला. उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी ग्रंथपाल दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि ग्रंथालयाच्या विकासासाठी सर्व परीने मदत केली जाईल याची ग्वाही दिली.
     कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथालयामध्ये सुरू केलेल्या क्यू आर कोड गॅलरीचे उद्घाटन प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी व प्रमुख पाहुणे श्री संजयजी ढेरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लीड कॉलेजचे समन्वयक प्रा. शंकर गेजगे यांनी केले.तर सूत्रसंचालन व स्वागत डॉ.सुधीर नगरकर यांनी केले.तसेच पाहुण्यांचा परिचय प्रा.प्रमोद चव्हाण यांनी करून दिला.या कार्यक्रमासाठी श्री .वसंत धनवडे व अविनाश मदने यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वृंद विद्यार्थी उपस्थित होते.प्रा. डॉ. संग्राम शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

*तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष व महिला गटात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय अव्वल स्थानावर*सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत दि .३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे ज्युनियर कॉलेजचे १९ वर्षाखालील गटात खो - खो स्पर्धेत मुली व मुले यांनी प्रथम क्रमांक मिळविला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघाची निवड झाली .मामुर्डी ता.जावली या ठिकाणी सदर स्पर्धा पार पडल्या असून स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री. तेजेस जाधव व शारीरिक शिक्षण संचालक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले . महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी तसेच उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांना जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.