स्वातंत्र्य, समता व बंधुता वृद्धिंगत करण्याची जबाबदारी युवा पिढीची आहे " ॲड.वर्षा देशपांडे*

" *स्वातंत्र्य, समता व बंधुता  वृद्धिंगत करण्याची जबाबदारी युवा पिढीची आहे "
                       ॲड.वर्षा देशपांडे*
.                        —---------------
मेढा : 14 ऑगस्ट 2023
======================

" या देशात छत्रपती शिवरायांपासून महात्मा गांधी यांच्या पर्यंतच्या सर्वच महापुरुषांनी आपल्या युवा अवस्थेतच
सामाजिक कार्यास सुरुवात केली.
म्हणूनच आपल्याला स्वराज्य व स्वातंत्र्य प्राप्त झाले.महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा सुरु केली म्हणूनच मुली शिकून आज सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत सर्वांना समान संधी व अधिकार दिले. म्हणूनच हे स्वातंत्र्य आज आपण उपभोगत आहोत.परंतु अलीकडच्या काळात या देशाला धर्मांधता व स्त्री अत्याचाराचे ग्रहण लागले आहे.त्यातून भारतमातेला मुक्त करण्याची व   " स्वातंत्र्य, समता व बंधुता  वृद्धिंगत करण्याची जबाबदारी युवा पिढीची आहे " " असे प्रतिपादन सातारा येथील जेष्ठ सामाजीक कार्यकर्त्या ॲड.वर्षा देशपांडे यांनी केले.लेक लाडकी अभियान,महाराष्ट्र राज्य,दलित महिला विकास मंडळ,सातारा आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय
मेढा, यांच्या अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने,राष्ट्रीयता जागर अभियान,सातारा "आरोग्यदायी युवकांसाठी " या उपक्रमा अंतर्गत "व्याख्यान व मानवी साखळीचे " आयोजन करण्यात आले होते.
त्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते तर प्रा.संजीव बोंडे,ॲड.चैत्रा व्ही. एस. व उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे, मिनाज सय्यद,ॲड.शैलजा जाधव,केतन मोहिते व कैलास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड.वर्षा देशपांडे पुढे म्हणाल्या " ९ ऑगस्ट हा क्रांती दिन,१२ ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिन आणि १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन.
९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट "राष्ट्रीयता जागर अभियान" अंतर्गत आरोग्यदायी युवकांसाठी आपण विविध उपक्रम घेत आहोत.त्याचाच भाग म्हणजे हा आजचा उपक्रम आहे.आपण देशाचा ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना,सध्यस्थिती ही फार भयावह आहे.आज आपल्या देशातील स्त्रिया या सुरक्षित नाहीत.पुरुषसत्ताक संस्कृतीचे रक्षक त्यांच्यावर दिवसा ढवळ्या अन्याय अत्याचार करत आहेत. धर्माच्या नावाखाली इथल्या दलित व अल्पसंख्यांक समाजाला वेठीस धरले जात आहे.यातून या सर्वांची मुक्ती झाली तरच आपल्या स्वातंत्र्याला अर्थ उरणार आहे.हे स्वातंत्र्य जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर आता युवकांनीच आपलं पाऊल पुढं टाकायला हवं " असं त्यांनी आवाहन करून स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या 
        त्यानंतर प्रा.संजीव बोंडे यांनी "राष्ट्रीयता जागर अभियान कशासाठी? " या विषयावर मांडणी केली. त्यावेळी त्यांनी लोकशाहीची व्याख्या सांगून,स्वातंत्र्य,
समता,शासन,प्रशासन,न्यायपालिका,
व पत्रकारिता या मूल्यांचा विस्तृत अर्थ सांगितला.तसेच सध्य परिस्थितीत ही मूल्ये कशाप्रकारे पायदळी तुडवली जात आहेत हे सांगून युवकांनी आपली लोकशाही वाचवण्यासाठी काय काय करावे याविषयींची अनमोल माहीती दिली.
  तर द्वितीय सत्रात ॲड.चैत्रा व्ही एस.
यांनी " स्वस्थ तरुण भारतासाठी तंबाखूपासून मुक्ती " याविषयावर सखोल मार्गदर्शन केले.आजच्या सिनेमा,टीव्ही व समजमाध्यमातून येणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती या युवापिढीचे किती नुकसान करत आहेत,या सर्वच पदार्थांमुळे कँसर सारख्या जर्जर आजाराला आमंत्रण मिळत असून, युवकांनी या व्यसनांच्या आहारी न जाता.आपले आरोग्य आजारमुक्त ठेवावे.देशाचा युवक जर सशक्त असेल तर देश सशक्त व बलशाली बनेल. अशा स्वस्थ तरुण भारतासाठी तंबाखू मुक्ती करावी.युवकांनी स्वतः निर्व्यसनी राहून समाजात व आपल्या कुटुंबात व्यसनमुक्तीचा प्रचार करावा.असे आवाहन केले.
    अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी सर यांनीही अनमोल मार्गदर्शन केले.ते आपल्या भाषणात म्हणाले की, " स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी
आपल्या प्राणाची आहुती दिली,त्या सर्वांच्या आचार-विचार व बलीदानाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपला देश व येथील लोकशाही टिकवण्याची जबाबदारी युवकांवर आहे.त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम व्यसनमुक्त राहून,आपल्या महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाबरोबरच या सर्व महापुरुषांनी आपल्यासाठी जो जाज्वल्यपूर्ण इतिहास निर्माण करून ठेवला आहे. त्याचा वारसा पुढे चालवावा.युवकांनी कोणत्याही व्यसनांच्या आहारी न जाता.आपले तन व मन सशक्त व मजबूत राखावे व या बलशाली देशाचा मान राखावा " असा उपदेश केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मराठी विभाग प्रमुख प्रा.आनंद साठे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अग्रणी महाविद्यालयांचे समन्व्यक प्रा.डॉ.संजय धोंडे यांनी सूत्रसंचालन केले.या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.विनोद पवार प्रा.संजय पाटील,प्रा.संध्या निकम,प्रा.शिंदे-कदम
मॅडम तसेच विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मराठी विभागातील विध्यार्थी तसेच आबासाहेब देशमुख, युवराज विभुते व अविनाश मदने यांनी खूपच परिश्रम घेतले.शेवटी समन्वयक प्रा. एस. एन. गेजगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.या मुख्य कार्यक्रमानंतर मानवी साखळी करण्यात आली.
यामध्ये सर्व विद्यार्थी व जवळवाडी येथील महिलामंडळाच्या सर्व सदस्य महिला,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या जनजागार मानवी साखळीत सहभागी झाले होते..
===============

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे नेट व सेट परीक्षेत यश