मेढा महाविद्यालयात “रानभाज्या महोत्सव २०२३ " उत्साहात साजरा*

*मेढा महाविद्यालयात “रानभाज्या महोत्सव २०२३ " उत्साहात साजरा*
========================
मेढा : 21 ऑगस्ट 2023
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा  वनस्पतीशास्त्र विभाग व तालुका कृषी विभाग जावली,मेढा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन योजना (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने,अग्रणी महाविद्यालय योजना अंतर्गत  “रानभाज्या महोत्सव ” २०२३ आयोजित करण्यात आला होता.          या महोत्सवाचे उदघाट्न या उद्घाटन मा.श्रीमती भाग्यश्री पवार – फरांदे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सातारा यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी हे होते.या प्रदर्शनासाठी उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे, कृषी सहाय्यक श्री. भानुदास चोरगे,आत्मा जावळीचे श्री.सचिन नेवसे,
विभागीय संघटिका श्रीमती सुनिता राजे-घाटगे,ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे, मा. आर के. जाधव, श्री.नंदकुमार काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.आपल्या भाषणात श्रीमती भाग्यश्री पवार म्हणाल्या " आजकालच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये माणसाकडे आरोग्य व समतोल आहार घेण्यासाठी अजिबात वेळ नाही. याचाच परिणाम म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या बाबतीत समस्या वाढत आहेत. याचा फायदा  घेऊन विदेशी कंपन्या आपली निरनिराळी उत्पादने बाजारात विकत आहेत आणि युवा पिढी याचा अंधाधुंदपणे वापर करत आहेत. वेगवेगळी आकर्षक जंक आणि फास्ट-फूड मुळे भविष्यात आरोग्याच्या बाबतीत उद्भवणाऱ्या नव्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता निसर्गाशी नाते जोडून जंक फूड ला बगल देऊन आपला परंपरागत वारसा जपण्याचा प्रयत्न करायला हवा " अशा शब्दात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनीही मनोगत व्यक्त केले.त्यावेळी ते म्हणाले " या महाविद्यालयातील विध्यार्थी ग्रामीण भागातील रहिवासी कौशल्याचा वापर करून रानभाजी उत्सवाचे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून व्यावसायिक व  रोजगाराच्या संधी निर्माण करता येईल. स्व: अनुभवातून रोजगाराच्या संधी कश्या आत्मसात कराव्यात तसेच संशोधन करण्यात विद्यार्थ्यांनी अधिक भर द्यावा " असे आवाहन त्यांनी केले.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी  या उपक्रमासाठी जवळपास ४२ प्रकारच्या रान भाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थ तयार करून आणले होते.यात शेवगा, कुर्डू, केना, कार्टुली, उंबर, ढेसा, भालगा, भारंगी चीचुरटे, शेंडवाल, मोहर, टाकाळा, माट, केळ फुले, कडीपत्ता, आळू, भोकर, मोरचौडा, उडीद पाने, ओवा, चुका, घोळ, बरका, पात्री या सारख्या अनेक वनस्पतीनं पासून बनविलेले पदार्थ विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणले होते. याच बरोबर त्यांची माहिती म्हणजेच त्यांचे शास्त्रीय नावं, कुळ तसेच पदार्थ बनविण्याच्या कृतींचीही माहिती त्यांनी दिली.याशिवाय  कृषी विभाग जावली यांच्या वतीने रानभाज्यांची विक्री करण्यासाठी शेतकरी बचत गटांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. या मध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्यांची सुद्धा खरेदी- विक्री झाली. खरेदी बरोबरच रानभाज्यांची माहिती फलकांच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी ग्राहकांना दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मा. श्री. संजय घोरपडे (तालुका कृषि अधिकारी, जावली) यांनी रानभाज्यांचे महत्व विषद केले. मा. श्री. श्रीरंग शिंदे सेवा निवृत्त वनक्षेत्रपाल कास पठार यांनी त्यांच्या अनुभवातून मिळालेल्या विविध रानभाज्यांचे महत्व सांगितले.प्रदर्शनात विद्यार्थ्यानी बनविलेल्या रानभाज्यांच्या पाककृतींचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतला तसेच, शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणलेल्या भाज्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाली. प्रदर्शनात आणलेल्या रानभाज्यांच्या पाककृती साठी विद्यार्थ्यांना तसेच, प्रगतीशील शेतकरी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिप्रत देऊन गौरव करण्यात आले.अग्रणी महाविद्यालय योजना समन्वयक प्रा.शंकर गेजगे आणि प्रा.धनश्री देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.या उपक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर  कर्मचारी   तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, महाविद्यालयाचे विद्यार्थी, पत्रकार यांनी उपस्थित राहून संपूर्ण सहकार्य केले. कार्यक्रमाचे शेवटी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उदय पवार यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे नेट व सेट परीक्षेत यश