Skip to main content

Posts

आमदार शशिकांत शिंदे, महाविद्यालय मेढा, येथेआंतरराष्ट्रीय मातृभाषादिनसंपन्न.

आमदार शशिकांत शिंदे, महाविद्यालय मेढा, येथे आंतरराष्ट्रीय मातृभाषादिन संपन्न. ---------------- मेढा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा,येथे ग्रंथालय ज्ञान स्त्रोत केंद्र व मराठी विभाग यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय मातृभाषादिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून,ग्रंथालयातील अभ्यासिकेत,कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाचन व पुस्तक परीक्षण स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेसाठी एकूण 21 स्पर्धकांनी सहभाग घेतला.सुरुवातीस त्यांनी त्यांना आवडतील त्या पुस्तकांची निवड केली.त्यामध्ये कविता संग्रह,कथासंग्रह, लेखसंग्रह व इतर पुस्तकांचा समावेश करण्यात आला होता. आर्धा तास वाचन व नंतर आर्धा तास परीक्षण लेखन करण्याची संधी या सर्व स्पर्धक विध्यार्थ्यांना देण्यात आली. समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी व उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे उपस्थित होते.यावेळी सहभागी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉक्टर अशोक गिरी यांनी अनमोल मार्गदर्शन केले.त्याप्रसंगी ते म्हणाले, " मनुष्य कितीही

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढाचे चार विद्यार्थी सैन्यात भरती....==============मेढा : दिनांक 8 फेब्रुवारी 23कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या सैन्य भरतीत,येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदेमहाविद्यालयातील विविध वर्ग व शाखेतील चार विध्यार्थी एकाच दिवशी भरती होवून आपले गाव,तालुका व महाविद्यालयाचे नावलौकिकात भर घातली.त्यांच्या या सैन्य भरतीतील उज्वल यशाने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. या सैन्य भरतीत भरती झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत.दर्शन राजेंद्र जाधव, बी.ए.भाग तीन, (जी.डी.आर्मी )आशुतोष राजेंद्र गावडे बी.एस. सी.भाग तीन (जी.डी.आर्मी )ऋषिकेश राकेश जाधव बी.ए. भाग.दोन ( टेक्निकल आर्मी )इंगळे दीपक संदीप बी.एस.सी भाग.तीन ( टेक्निकल आर्मी )या विविध विभागात भरती झाले.या त्यांच्या यशा मागे त्यांची अपार मेहनत,बुद्धिमत्ता आई वडील व महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे अशी प्रतिक्रिया या चारही विध्यार्थ्यांनी दिली.त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब,सचिव सौ. वैशाली शिंदे,संस्थेचे सर्व विश्वस्त,महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी,उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थ्यांनी या चारही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढाचे चार विद्यार्थी सैन्यात भरती.... ============== मेढा : दिनांक 8 फेब्रुवारी 23 कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या सैन्य भरतीत,येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील विविध वर्ग व शाखेतील चार विध्यार्थी एकाच दिवशी भरती होवून आपले गाव,तालुका व महाविद्यालयाचे नावलौकिकात भर घातली.त्यांच्या या सैन्य भरतीतील उज्वल यशाने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. या सैन्य भरतीत भरती झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत. दर्शन राजेंद्र जाधव, बी.ए.भाग तीन, (जी.डी.आर्मी ) आशुतोष राजेंद्र गावडे बी.एस. सी.भाग तीन (जी.डी.आर्मी ) ऋषिकेश राकेश जाधव बी.ए. भाग.दोन ( टेक्निकल आर्मी ) इंगळे दीपक संदीप बी.एस.सी भाग.तीन ( टेक्निकल आर्मी ) या विविध विभागात भरती झाले.या त्यांच्या यशा मागे त्यांची अपार मेहनत,बुद्धिमत्ता आई वडील व महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे अशी प्रतिक्रिया या चारही विध्यार्थ्यांनी दिली.त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब,सचिव सौ. वैशाली शिंदे,संस्थेचे सर्व विश्वस्त,महाविद्यालयाच

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना ( ISO) चे 9001-2015 जागतीक मानांकन प्राप्त*=

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास   आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना ( ISO) चे 9001-2015 जागतीक मानांकन प्राप्त* ================ दिनांक 26 जानेवारी : जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन तथा    आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना,या संस्थेकडून आय.एस.ओ.9001-2015 जागतीक मानांकन आज प्राप्त झाले आहे.त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा,हे सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने प्रमाणित केलेले पहिले महाविद्यालय  ठरले आहे. आज दिनांक 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मंगल प्रसंगी या महाविद्यालयास  "आय. एस.ओ.9001-2015" प्रमाणपत्र वितरण समारंभ पार पडला.यावेळी पुणे येथील आय एस.ओ .संस्थेचे सल्लागार श्री. अनिल येवले यांच्या हस्ते महाविद्यालयाला  आय.एस.ओ.नामांकन प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते.तर विचारपीठावर उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे, आय.एस.ओ चे लेखाधिकारी माननीय संदिप कोठुळे उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना महाव

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात संपन्न

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात संपन्न =================  जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे, भारताचा 74 व्या प्रजासत्ताक दिन उत्साही व आनंदी वातावरणात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.याप्रसंगी उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे व उद्योजक मा. संजय जुनघरे उपस्थित होते. ध्वजारोहण,राष्ट्रगीत,ध्वजगीत व  ध्वजवदंन झाल्यानंतर प्राचार्य डॉ.अशोक गिरी यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले की,  " विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील नागरिकांना,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहून 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशास अर्पण केली व आजच्या दिनी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी,या राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु झाला. तो दिन म्हणजे हा प्रजासत्ताक दिन आज आपण साजरा करत आहोत. संविधानाने आपल्याला समान हक्क दिले आहेत. आपल्या लाभलेले हक्क व कर्तव्यांचा वापर देशहितासाठी करून शांतता,समता व बंधुता ही मूल्ये जोपासावी व आपल्या हक्कांचा

कुस्तीचे जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा 'सिकंदर'

कुस्तीचे जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा 'सिकंदर' घरात असणाऱ्या अठराविश्‍वे दारिद्रातून कुस्तीतला प्रवास करत एका हमालाचा पोरगा अखंड कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. दुनियेचे ओझे पाठीवर वाहणाऱ्या आपल्या बापाच्या कष्टाचे ऋण या यशाने फेडणाऱ्या मल्लाचे नाव म्हणजे सिकंदर शेख. सध्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात रंगतेय. या स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करत सिंकदरने सर्वांची मने जिंकली आहेत. महाराष्ट्रसह देशातील प्रत्येक प्रतिस्पर्धी मल्लांला त्याने आस्मान दाखवत देशातील आघाडीचा मल्ल तो बनला आहे. हमाली करून वडीलांनी पुरवला खुराक...  सिकंदर मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा. घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा. पण या वारशावर दारिद्राची गडद छाया कायमची. घरात वडील रशिद शेख पैलवानकी करायचे. निमगावच्या मगरांच्या तालमीत सरावाला असताना तालीमीची स्वच्छता करायची आणि त्या बदल्यात तालमीतील मल्ल जो खुराक देतील, तो खायचा आणि सराव करायचा. असं सुरू असतानाच वडीलांची प्रकृती खालावली म्हणून रशीद घरी परतले आणि लग्नगाठ बांधली गेली. संसाराचा गाडा हाकत असतानाच दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत कायमच

*स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणास्त्रोतातून युवकांनी ध्येयप्राप्ती करावी: प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी*

*स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणास्त्रोतातून युवकांनी ध्येयप्राप्ती करावी: प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी* आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, इतिहास विभाग व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विशेष व्याख्यान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक डॉ. संग्राम शिंदे हे होते त्यांनी असे प्रतिपादन केले की, स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्र हे आहे. त्यांनी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व स्वीकारल्यानंतर स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले. लहानपणापासूनच त्यांनी व्यायाम खेळ अशा विविध उपक्रमात सहभाग घेतला होता. सामाजिक आणि धार्मिक बाबतीत पुरोगामी विचारांचे आणि दयाळू स्वभावाचे होते. ते पाश्चात्य गुढवादाने प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनी पाश्चात्त्य ज