विद्यार्थी दशेत चरित्र संवर्धन करावे व रॅगिंग सारख्या वाईट प्रवृत्तीना थारा देऊ नये*
* विद्यार्थी दशेत चरित्र संवर्धन करावे व रॅगिंग सारख्या वाईट प्रवृत्तीना थारा देऊ नये* *विधिज्ञ .अनुप लकडे* आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा या महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध समिती आणि लैंगिक छळ प्रतिबंध समिती यांच् या संयुक्त विद्यमाने 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या कालावधीत अँटी रॅगिंग सप्ताह साजरा करण्यात आला, 14 ऑगस्ट 2023 रोजी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना Ragging म्हणजे काय? जर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात Ragging सदृश्य कृत्य केले तर त्याचे होणारे दुष्परिणाम,प्रसंगी तुरुंगवासही होऊ शकतो.अशी माहिती समितीचे समन्वयक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी स्पष्ट केले,तर महाविद्यालयाचे प्राचार्य,मेजर डॉ.अशोक गिरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ,विद्यार्थ्यांना विविध चित्रपट,समाज माध्यमातून घडणाऱ्या विविध घटना व त्याचे अनुचित परिणाम याबद्दल माहिती सांगून ragging चे किती गंभीर परिणाम होतात,असे प्रसंग आपल्या महाविद्यालय घडू नयेत यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी दक्ष राहावे,असे आव्हान केले तसेच उपस्थित सर्वाना रॅगिंग न करण्याची शपथ दिली व रॅगिंग विषयांची संपूर्ण माहिती विशद क