Tuesday, 8 March 2022
जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व लैंगिक छळ प्रतिबंधक समिती च्या वतीने दिनांक 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.
जागतिक महिला दिनाच्या खुप शुभेच्छा
"ज्याला स्त्री 'आई' म्हणून कळली,
तो जिजाऊचा शिवबा झाला,
ज्याला स्त्री 'बहिण म्हणून कळली
तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला,
ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणून कळली,
तो राधेचा श्याम झाला, आणि
ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली,
तो सीतेचा राम झाला !'
प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या स्त्रीशक्तीला प्रथम माझा मानाचा मुजरा !
जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खुप शुभेच्छा !!!!!
शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्या मागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणा साठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करतो.
स्त्री म्हणजे वात्सल्य,
स्त्री म्हणजे मांगल्या
स्त्री म्हणजे मातृत्व,
स्त्री म्हणजे कर्तृत्व
8 मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे. आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा अन् आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच.... कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला जातो, असा हा महिला दिन दरवर्षी आनंदात, उत्साहात साजरा केला जातो.
इतिहासाची पाने चाळली तर... मार्च १९०८ रोजी न्युयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रूटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या.
१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी किलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ (मार्च हा 'जागतिक महिला दिन' म्हणून स्विकाराव असा ठराव क्लारा झेटकिन यांनी मांडला, तो पास झाला आणि तेव्हापासून (मार्च यादिवशी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येऊ लागला.
जागतिक महिला दिन 2022 ची थीम मराठी
या वर्षासाठीच्या 'आंतरराष्ट्रीय महिला ( जागतिक महिला) दिन 2022 ची थीम मराठी मध्ये ही आहे, "Gender equality today for a sustainable tomorrow" म्हणजेच "येणाऱ्या उज्वल भविष्यासाठी स्त्री पुरुष समानता"
COVID- 19 साथीच्या काळात आरोग्यसेवा कामगार, इनोव्हेटर इत्यादी म्हणून जगभरातील मुली आणि स्त्रियांचे योगदान अधोरेखित करते.महिलांनी COLLCD-19च्या या संकटातसुद्धा किलेले कार्य नक्कीच गौरवास्पद आहे, म्हणूनच म्हणावेसे वाटते,
'तुझ्या उत्तुंग भरारी पुढे,
गंगनही ठेंगणे असावे.
तुझ्या विशाल पंखाखाली,
विश्व ते सारे विसावे!"
आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे होय.
आज पुरुषांबरोबर स्त्रियादेखील सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत, परंतु आजदेखील स्त्री सुरक्षित नाही, हे खेदाने बोलावेच लागेन. लैंगिक शोषण, अत्याचार, हुंडाबळी, भृणहत्या या गोष्टींमुळे स्त्रियांच्या मुलींच्या मनात भीतीची, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मुलीचा जन्म झाल्या वर तिचा तिरस्कार केला जातो, स्त्रीयांचा अपमान किला जातो. स्त्री-पुरुष समानता ही आचरणात आणायला हवी, शेवटी एवढेच म्हणेन की,
"तुझ्या प्रयत्नांना मिळू दे, यशाची सोनेरी किनार
"तुझ्या प्रयत्नांना मिळू दे, यशाची सोनेरी किनार,
लक्ष दिव्यांनी उजळू दे, तुझा संसार : कर्तत्व आणि
सामर्थ्याची ओढून ये नवी झालर,
स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर !!"
Saturday, 26 February 2022
DR.N.B. KHOT मॅडम यांचा ग्रंथ गौरव समिती बाबत
Monday, 21 February 2022
Sunday, 20 February 2022
विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे नेट व सेट परीक्षेत यश
Saturday, 19 February 2022
assm library website
-
शिवजयंती शिवचरित्रातून काय शिकावे सुरूवात करण्यावर भर द्या, कमतरतेवर लक्ष देऊ नका. रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बालशिवबा सोबत फक्त आठ द...
-
photos रहे ना रहे हम भारतरत्न लता मंगेशकर यांच्याशी संबंधित निवडक विडीओज, मुलाखत, मराठी गाणी, हिंदी गाणी, इतर माहिती स्त्रोत साठ...