Friday, 3 March 2023

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे ,राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेनेमराठी भाषा गौरव दिन साजरा

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे ,
राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेने
1मराठी भाषा गौरव दिन साजरा
========≠========

जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील मराठी विभाग,ग्रंथालय व ज्ञानस्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने,
दिनांक 27 फेब्रुवारी रोजी,कवी कुसुमाग्रज जन्मदिन व मराठीभाषा गौरव
दिनानिमित्त,राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्तरावरील विध्यार्थ्यांच्या ऑनलाईन स्वरचित काव्यवाचन स्पर्धा आयोजित करून, मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.यावेळी स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.अशोक व्ही.गिरी होते.तर उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यावेळी उपस्थित होते.
उदघाटनानंतर या दोन्ही मान्यवरांनी, स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.यावेळी प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी सर म्हणाले " भारतात साजऱ्या केल्या जाणार्‍या विविध विशेष दिवसां पैकी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे प्रसिद्ध मराठी लेखक - कुसुमाग्रज यांची जयंती. दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र, भारत आणि जगभरात “मराठी राजभाषा दिन” किंवा “मराठी भाषा गौरव दिन ” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेच्या जडण घडणीत या महान व्यक्तीमत्वाचा मोठा हातभार होता. आपल्या हयातीत त्यांनी विविध कविता, कथा, नाटके, कादंबरी,निबंध आणि बरेच काही साहित्य लिहिले. त्यांच्या या उत्कृष्ट लेखनाचा उचित गौरव व्हावा म्हणूनच आजचा हा दिवस आपण सर्वत्र साजरा करतो. "

असे या मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व सांगून ते पुढे म्हणाले "तसे पहिले तर आपल्या मराठी भाषेला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे.संत ज्ञानदेव महाराजांपासून संत तुकाराम महाराज यांच्या पर्यंतच्या,सर्वच संतानी आपल्या अभंग रचना मराठी भाषेतच रचल्या.तर 
छत्रपती शिवरायांनी देखील मराठीभाषेला
महत्व देवून,स्वराज्याची राजभाषा म्हणून
वापरली.महात्मा फुले,श्री.म.माटे,वि.स. खांडेकर,शांता
शेळके,पु.ल.देशपांडे,
नारायण सुर्वे, कुसुमाग्रज,वसंत बापट व इतर सहित्यिकांनी मराठी भाषेत समृद्ध साहित्य लिहिले.आपणही आपल्या या मातृभाषेचा मान,शान व अभिमान बाळगला पाहिजे."
असे सांगून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाडगे यांनीही मराठी विभाग व ग्रंथालय विभागाची स्तुती करून,स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेतली गेली.यामध्ये राज्यातील 37 स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून,22विद्यार्थी स्पर्धकांनी आपल्या विविध विषयांवरील स्वरचित कविता सादर केल्या.विद्यार्थी
स्पर्धा झाल्यानंतर,काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षक प्रा.डॉ.प्रदीप शिंदे आणि पत्रकार व साहित्यिक रोहित आवळे यांनी याप्रसंगी आपापल्या कविता सादर करून सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले.सदर काव्यवाचन स्पर्धेत,
*विशाल चौगुले,( कोतोली - पन्हाळा - प्रथम क्रमांक )
*अजय भोईर ( पेण - रायगड ) व कु. कोमल म्हांगडे ( सातारा) विभागून - द्वितीय क्रमांक )
*कु. दिपाली बाचल ( कराड - तृतीय क्रमांक
* कु. साक्षी तिवाटणे ( फलटण ) व कु. अनिता बर्गे ( सातारा ) उत्तेजनार्थ असे क्रमांक प्राप्त केले.बक्षीसाचे स्वरूप असे
प्रथम - 2000/- रुपये, द्वितीय - 1500/-
तृतीय - 1000/- व उत्तेजनार्थ प्रत्येकी 750/- रोख, चषक,प्रमाणपत्र असे ठेवण्यात आले होते.
सदर स्पर्धेसाठी बँक ऑफ महाराष्ट्र,मेढाचे शाखाधिकारी अविनाश सुतार तसेच समाजसेवक संजय जुनघरे,सरपंच राजू खुडे व लक्ष्मण जाधव या व्यवसायिकांनी हा कार्यक्रम पार पडण्यासाठी प्रायोजक म्हणून जबाबदारी स्वीकारली.
स्पर्धेचे समन्वयक व मराठी विभाग प्रमुख प्रा.आनंद साठे यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.
प्रा.डॉ.नगरकर, प्रा.डॉ.ओमकार यादव,प्रा.पी.डी.पाटील यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.या ऑनलाईन स्पर्धेत काव्यरसिक व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी सहसमन्वयक व ग्रंथपाल प्रा.डॉ.एस.आर. नगरकर यांनी आभार मानले.

Thursday, 23 February 2023

आमदार शशिकांत शिंदे, महाविद्यालय मेढा, येथेआंतरराष्ट्रीय मातृभाषादिनसंपन्न.

आमदार शशिकांत शिंदे, महाविद्यालय मेढा, येथे
आंतरराष्ट्रीय मातृभाषादिन
संपन्न.
----------------
मेढा
दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा,येथे ग्रंथालय ज्ञान स्त्रोत केंद्र व मराठी विभाग यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय मातृभाषादिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून,ग्रंथालयातील अभ्यासिकेत,कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाचन व पुस्तक परीक्षण स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेसाठी एकूण 21 स्पर्धकांनी सहभाग घेतला.सुरुवातीस त्यांनी त्यांना आवडतील त्या पुस्तकांची निवड केली.त्यामध्ये कविता संग्रह,कथासंग्रह,
लेखसंग्रह व इतर पुस्तकांचा समावेश करण्यात आला होता.
आर्धा तास वाचन व नंतर आर्धा तास परीक्षण लेखन करण्याची संधी या सर्व स्पर्धक विध्यार्थ्यांना देण्यात आली.
समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी व उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे उपस्थित होते.यावेळी सहभागी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉक्टर अशोक गिरी यांनी अनमोल मार्गदर्शन केले.त्याप्रसंगी ते म्हणाले, " मनुष्य कितीही सर्वोच्च पदावर पोहचला तर आपल्या नात्यांना,
मातीला व मातृभाषेला कधीच विसरू शकत नाही.कारण तो जेंव्हा बोलायला सुरुवात करतो तेंव्हा आपल्या मातेने शिकवलेल्या मातृभाषेतच बोलायला सुरुवात करतो. त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मातृभाषेला अनन्यसाधारण महत्व दिले पाहिजे.जगभर आज हा दिन साजरा केला जात आहे. आणि तुम्ही सर्वांनी आपल्या मराठी भाषेतील विविध पुस्तकांचे वाचन करून,त्याचे परीक्षण केलेत.ही बाब उल्लेखनीय आहे. " असे सांगून त्यांनी 
आपण सर्वांनी आपली मातृभाषा जपली पाहिजे. तिचे संरक्षण करून, मराठी भाषेचा विकास साधला पाहिजे असे आवाहन केले व मातृभाषादिनाच्या शुभेच्छा दिल्या.
 कार्यक्रमाच्या सुरुवातीस मराठी विभाग प्रमुख प्रा. आनंद साठे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.शेवटी ग्रंथपाल डॉ. सुधीर नगरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Thursday, 9 February 2023

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढाचे चार विद्यार्थी सैन्यात भरती....==============मेढा : दिनांक 8 फेब्रुवारी 23कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या सैन्य भरतीत,येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदेमहाविद्यालयातील विविध वर्ग व शाखेतील चार विध्यार्थी एकाच दिवशी भरती होवून आपले गाव,तालुका व महाविद्यालयाचे नावलौकिकात भर घातली.त्यांच्या या सैन्य भरतीतील उज्वल यशाने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. या सैन्य भरतीत भरती झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत.दर्शन राजेंद्र जाधव, बी.ए.भाग तीन, (जी.डी.आर्मी )आशुतोष राजेंद्र गावडे बी.एस. सी.भाग तीन (जी.डी.आर्मी )ऋषिकेश राकेश जाधव बी.ए. भाग.दोन ( टेक्निकल आर्मी )इंगळे दीपक संदीप बी.एस.सी भाग.तीन ( टेक्निकल आर्मी )या विविध विभागात भरती झाले.या त्यांच्या यशा मागे त्यांची अपार मेहनत,बुद्धिमत्ता आई वडील व महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे अशी प्रतिक्रिया या चारही विध्यार्थ्यांनी दिली.त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब,सचिव सौ. वैशाली शिंदे,संस्थेचे सर्व विश्वस्त,महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी,उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थ्यांनी या चारही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढाचे चार विद्यार्थी सैन्यात भरती....
==============
मेढा : दिनांक 8 फेब्रुवारी 23

कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या सैन्य भरतीत,येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदे
महाविद्यालयातील विविध वर्ग व शाखेतील चार विध्यार्थी एकाच दिवशी भरती होवून आपले गाव,तालुका व महाविद्यालयाचे नावलौकिकात भर घातली.त्यांच्या या सैन्य भरतीतील उज्वल यशाने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. या सैन्य भरतीत भरती झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत.
दर्शन राजेंद्र जाधव, बी.ए.भाग तीन, (जी.डी.आर्मी )
आशुतोष राजेंद्र गावडे बी.एस. सी.भाग तीन (जी.डी.आर्मी )
ऋषिकेश राकेश जाधव बी.ए. भाग.दोन ( टेक्निकल आर्मी )
इंगळे दीपक संदीप बी.एस.सी भाग.तीन ( टेक्निकल आर्मी )
या विविध विभागात भरती झाले.या त्यांच्या यशा मागे त्यांची अपार मेहनत,बुद्धिमत्ता आई वडील व महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे अशी प्रतिक्रिया या चारही विध्यार्थ्यांनी दिली.त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब,सचिव सौ. वैशाली शिंदे,संस्थेचे सर्व विश्वस्त,महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी,उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थ्यांनी या चारही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Friday, 27 January 2023

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना ( ISO) चे 9001-2015 जागतीक मानांकन प्राप्त*=

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास   आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना ( ISO) चे 9001-2015 जागतीक मानांकन प्राप्त*
================
दिनांक 26 जानेवारी :
जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन तथा    आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना,या संस्थेकडून आय.एस.ओ.9001-2015 जागतीक मानांकन आज प्राप्त झाले आहे.त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा,हे सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने प्रमाणित केलेले पहिले महाविद्यालय  ठरले आहे.
आज दिनांक 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक
दिनाच्या मंगल प्रसंगी या महाविद्यालयास 
"आय. एस.ओ.9001-2015" प्रमाणपत्र वितरण समारंभ पार पडला.यावेळी पुणे येथील आय एस.ओ .संस्थेचे सल्लागार श्री. अनिल येवले यांच्या हस्ते महाविद्यालयाला  आय.एस.ओ.नामांकन प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते.तर विचारपीठावर उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे, आय.एस.ओ चे लेखाधिकारी माननीय संदिप कोठुळे उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी म्हणाले की, " आमदार शशिकांत शिंदे साहेब यांनी जावली तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन या महाविद्यालयाची उभारणी केली आहे.तर उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे व आपण सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन,या  महाविद्यालयाचा अल्पावधीतच शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात,गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात आपला ठसा उमटवला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण
देण्याबरोबरच दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यासाठी महाविद्यालय सातत्याने पाठपुरावा करत आहे ही अभिमानाची बाब आहे.आगामी काळात महाविद्यालयात विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कौशल्य आत्मसात करणारे कोर्सेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.आपण सर्वांनी या महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासाचा पाया रोवला आहे. इथून पुढेही हे ज्ञानदानाबरोबर विध्यार्थी हा घटक केंद्रिभूत मानून,महाविद्यालय व संस्थेचा नवलौकिक वृद्धिंगत करावा "
अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ.संजय धोंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तर आय. एस. ओ.समितीचे समन्वयक प्रा.डॉ.विनोद पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी या कार्यक्रमास सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.शेवटी प्रा.शंकर गेजगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात संपन्न

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात संपन्न
=================
 जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत
शिंदे महाविद्यालय मेढा येथे, भारताचा 74 व्या प्रजासत्ताक दिन उत्साही व आनंदी वातावरणात संपन्न झाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.याप्रसंगी उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे व उद्योजक मा. संजय जुनघरे उपस्थित होते.
ध्वजारोहण,राष्ट्रगीत,ध्वजगीत व  ध्वजवदंन झाल्यानंतर प्राचार्य डॉ.अशोक गिरी यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले की,
 " विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील नागरिकांना,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहून 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशास अर्पण केली व आजच्या दिनी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी,या राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु झाला. तो दिन म्हणजे हा प्रजासत्ताक दिन आज आपण साजरा करत आहोत. संविधानाने आपल्याला समान हक्क दिले आहेत.
आपल्या लाभलेले हक्क व कर्तव्यांचा वापर देशहितासाठी करून शांतता,समता व बंधुता ही मूल्ये जोपासावी व आपल्या हक्कांचा वापर करत असतांना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवावी " असा मौलिक संदेश दिला.
त्याचबरोबर महाविद्यालयाच्या मागील कारकिर्दीचा आढावा घेताना ते पुढे म्हणाले,
" संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या दूरदृष्टी व कार्यकुशलतेमुळे विस वर्षांपूर्वी हे महाविद्यालय स्थापन झाले. आपल्या जावळी तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील शेतकरी,शेतमजूर व माथाडी कामगार यांच्या मुला - मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून हा निर्णय घेतला आणि आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नाने आज त्यास मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.इथून पुढेही  यशाची ही चढती कमान अशीच सुरु ठेवून,आपण सर्वांनीच आमदार साहेबांच्या स्वप्न व ध्येयपूर्तीसाठी आपण सर्वांनी शैक्षणिक, क्रीडा व कला क्षेत्रात यश संपादन करून आपल्या महाविद्यालाचा नावलौकिक वाढवावा " असे आवाहन करून त्यांनी प्रजासत्ताकदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रध्वजास  सर्व उपस्थितांनी मानवंदना दिली. तसेच विध्यार्थीनी विविध देशभक्तीपर गीते सादर केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिमखाना विभाग प्रमुख प्रा.प्रमोद चव्हाण यांनी केले.यावेळी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या विध्यार्थ्यांकडून मतदार जागृतीची प्रतिज्ञा वदवून घेण्यात आली.प्रा.गायत्री जाधव यांनी प्रतिज्ञा वाचन केले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे कॉमर्स विभाग प्रमुख प्रा.अमेय देसाई यांनी,त्यांच्या आई कै.प्रा.शकुंतला आत्माराम देसाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महाविद्यालयातील पन्नास हुशार व गरीब विध्यार्थी-विध्यार्थिनींना दरवर्षी मोफत एस. टी.पास.शिष्यवृत्ती घोषित केली व प्रतिनिधिक स्वरूपात,
कु.प्रिया गोळे व कु. अक्षदा जाधव या दोन विध्यार्थिनींना,
प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी सर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी एन. एस. एस. प्रमुख प्रा.डॉ.संजय भोसले यांनी आभार मानले.अशा प्रकारे हा प्रजासत्ताकदिन उत्साहात संपन्न झाला.

सकाळ बातमी