Thursday, 23 November 2023

*विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचा आदर्श घ्यावा**श्री. नितीन तारळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी**मेढा*: आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा आयोजित शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर अंतर्गत सातारा जिल्हा विभागीय जलतरण (पुरुष आणि महिला) स्पर्धा सातारा येथे जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी पार पडल्या या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नितीन तारळकर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उदघाटन प्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचा आदर्श घ्यावा आणि त्याप्रमाणे वाटचाल करावी असे मत व्यक्त केले.सदर स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना श्री नितीन तारळकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करताना कष्ट, चिकाटी आणि अचूक प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.अध्यक्षस्थानी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा चे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध उदाहरणे देत विध्यार्थी दशेत सुनियोजित सराव व मेहनत करणे अनिवार्य असल्याचे नमूद केले. तसेच या प्रसंगी बोलताना त्यांनी जलतरणपटू अमेरिकन ऑलिंपिक खेळाडू मायकेल फेल्प्स व विरधवल खाडे , यांचे उदाहरण देत त्याप्रमाणे वाटचाल करण्याचे आवाहन केले.सदर स्पर्धेसाठी पंधरा महाविद्यालयातून सुमारे साठ विध्यार्थी विविध जलतरण प्रकारात सहभागी झाले होते.कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे सातारा विभागीय क्रीडा परिषद च्या सचिव श्रीमती वैशाली खाडे जेष्ठ प्रा .डॉ.दीपक डांगे ,प्रा. बाळासाहेब भोसले उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार डॉ संजय भोसले यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन प्रा. प्रकाश जवळ यांनी केले.सदर कार्यक्रमांस विविध महाविद्यालयातील संघ व्यवस्थापक आणि बहुसंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

*विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचा आदर्श घ्यावा*
*श्री. नितीन तारळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी*
*मेढा*: आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा आयोजित शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर अंतर्गत सातारा जिल्हा विभागीय जलतरण (पुरुष आणि महिला) स्पर्धा सातारा येथे जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी पार पडल्या या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नितीन तारळकर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  उदघाटन प्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचा आदर्श घ्यावा आणि त्याप्रमाणे वाटचाल करावी असे मत व्यक्त केले.
सदर स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी  बोलताना श्री नितीन तारळकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करताना कष्ट, चिकाटी आणि अचूक प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

अध्यक्षस्थानी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा चे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध उदाहरणे देत विध्यार्थी दशेत सुनियोजित सराव व मेहनत करणे अनिवार्य असल्याचे नमूद केले. तसेच या प्रसंगी बोलताना त्यांनी जलतरणपटू   अमेरिकन ऑलिंपिक खेळाडू मायकेल फेल्प्स व विरधवल खाडे , यांचे उदाहरण देत त्याप्रमाणे वाटचाल करण्याचे आवाहन केले.
सदर स्पर्धेसाठी पंधरा महाविद्यालयातून सुमारे साठ विध्यार्थी विविध जलतरण प्रकारात सहभागी झाले होते.
कार्यक्रमासाठी  प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे सातारा विभागीय क्रीडा परिषद  च्या सचिव श्रीमती वैशाली   खाडे जेष्ठ प्रा .डॉ.दीपक डांगे ,प्रा. बाळासाहेब भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार डॉ संजय भोसले यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना प्रमुख  प्रा. प्रमोद चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन प्रा. प्रकाश जवळ यांनी केले.सदर कार्यक्रमांस विविध महाविद्यालयातील संघ व्यवस्थापक आणि बहुसंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

Friday, 10 November 2023

प्रा. डॉ. प्रमोद घाटगे जावली गौरव पुरस्काराने सन्मानित जावली तालुक्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये असणारी संस्था मित्रमेळा फाउंडेशन जावली यांच्यावतीने सन 2023 साठी विविध क्षेत्रात भरीव योगदान देऊन सर्वोत्कृष्ट उल्लेखनीय काम करणारे हुमगाव तालुका जावली गावचे सुपुत्र डॉ. प्रमोद रघुनाथराव घाटगे यांना त्यांच्या 31 वर्षाच्या शिक्षण सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जावली शिक्षण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले जावली तालुक्यात जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय उभे करून डॉ. प्रमोद घाडगे सरांनी जावलीतील उच्च शिक्षणाचा खूप मोठा शैक्षणिक प्रश्न सोडवला बारावीचे एच एस सी बोर्ड परीक्षा केंद्र सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची वाटचाल प्राचार्य प्रमोद घाटगे यांच्या नेतृत्वाखाली उत्तमरीत्या सुरू असून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक व शैक्षणिक स्वरूपाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक सर्व सोयी सुविधांची उपलब्धता या महाविद्यालयाने केली आहे या महाविद्यालयात आज तालुक्यातील सुमारे 40 गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत डॉ. प्रमोद घाटगे सरांनी यावेळी माझ्या कार्याची दखल घेऊन आपण दिलेला पुरस्कार माझ्यासाठी लाखमोलाचा असून मी सदैव ऋणी राहील आणि मित्रमेळा फाउंडेशनच्या सामाजिक कार्यास सहकार्य करीत राहील हा सन्मान माझा नसून माझे कुटुंबीय, माझे गुरुवर्य, जयवंत प्रतिष्ठान संस्था आणि हुमगाव गावचा गौरव आहे असे प्रतिपादन केले यावेळी माननीय आमदार सदाशिव भाऊ सपकाळ, सिने अभिनेता विजय निकम, चंद्रकांत कांबी रे, विशाल बांदल, महिगावकर, एकनाथ ओंबळे आदींनी कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या मित्रमेळा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पवार सचिव निलेश धनवडे यांनी स्वागत केले अनुप लकडे यांनी प्रास्ताविक केले अमित लकेरी यांनी आभार मानले

प्रा. डॉ. प्रमोद घाटगे जावली  गौरव पुरस्काराने सन्मानित             जावली तालुक्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये असणारी संस्था मित्रमेळा फाउंडेशन जावली यांच्यावतीने सन 2023 साठी विविध क्षेत्रात भरीव योगदान देऊन सर्वोत्कृष्ट उल्लेखनीय काम करणारे हुमगाव  तालुका जावली गावचे सुपुत्र डॉ. प्रमोद रघुनाथराव घाटगे  यांना त्यांच्या 31 वर्षाच्या शिक्षण सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जावली शिक्षण गौरव पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले   जावली तालुक्यात जयवंत प्रतिष्ठान संचलित  आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय उभे करून  डॉ. प्रमोद घाडगे सरांनी जावलीतील उच्च शिक्षणाचा खूप मोठा शैक्षणिक प्रश्न सोडवला बारावीचे एच एस सी बोर्ड परीक्षा केंद्र सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची वाटचाल प्राचार्य प्रमोद घाटगे यांच्या नेतृत्वाखाली उत्तमरीत्या सुरू असून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक  व शैक्षणिक स्वरूपाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक सर्व सोयी सुविधांची उपलब्धता या महाविद्यालयाने केली आहे या महाविद्यालयात आज तालुक्यातील सुमारे 40 गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत        डॉ. प्रमोद घाटगे सरांनी  यावेळी माझ्या कार्याची दखल घेऊन आपण दिलेला पुरस्कार माझ्यासाठी लाखमोलाचा असून मी सदैव ऋणी राहील आणि मित्रमेळा फाउंडेशनच्या सामाजिक कार्यास सहकार्य करीत राहील                        हा सन्मान माझा नसून माझे कुटुंबीय, माझे गुरुवर्य, जयवंत प्रतिष्ठान संस्था आणि हुमगाव गावचा गौरव आहे असे प्रतिपादन केले             यावेळी माननीय आमदार सदाशिव भाऊ सपकाळ, सिने अभिनेता विजय निकम, चंद्रकांत कांबी रे, विशाल बांदल, महिगावकर, एकनाथ ओंबळे आदींनी कार्यक्रमाचे कौतुक करून  शुभेच्छा दिल्या   मित्रमेळा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पवार सचिव निलेश धनवडे यांनी स्वागत केले अनुप लकडे यांनी प्रास्ताविक केले अमित लकेरी यांनी आभार मानले

Saturday, 21 October 2023

ASSM MEDHA: NAAC A GRADE

ASSM LIBRARY & KNOWLEDGE RESOURCES CENTRE GOT 100% MARKS. !!! From NAAC!!! JAY HO!!
 IT'S PROUDFUL THING FOR LIBRARY 

Thank you all Library Users

Happy Reading!!! 
Happy Learning!!!

From
Librarian
Dr.SR NAGARKAR

Wednesday, 18 October 2023

" *आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही* "प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞" आजच्या युगात ज्ञानाला खूप महत्व आहे,हे ज्ञान गुरुबरोबरच ग्रंथसंपदेत भरून उरले आहे.आपल्याला आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही. " असे मत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी व्यक्त केले.महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या वतीने, माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, "आज ज्या महान व्यक्तीची जयंती आज आपण साजरी करत आहोत,त्यांना लहानपनापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती.डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवनामध्ये शिक्षणाच्या परिस्पर्श झाल्यामुळे तसेच जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, अभ्यासातील सातत्य व सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यासाच्या व्यासंगातून शास्त्रज्ञ झाले आणि राष्ट्रपती पदापर्यंत पोहचले तसेच मेहनत व प्रामाणिकपणा अंगीकारून यशस्वी झेप घेतली.म्हणूनच ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मिती करायची असेल तर, ग्रंथवाचन करून ज्ञान,मनन,चिंतन करून ज्ञान संकलन करावे व अशा महापुरुषांचे अनुकरण विध्यार्थ्यानी करावे आणि आपले भविष्य उज्वल घडवावे " असे आवाहन केले.उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करून आपली वाचन सवयी जोपासावी हा संदेश दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथपाल डॉ. सुधीर नगरकर यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी ग्रंथालयातील नियतकालिकांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. तसेच ग्रंथालयाकडून करंट कंटेंट सर्विस सुरू करण्यात आली. याचा लाभ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतला.कार्यक्रमासाठी विध्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी प्रा.राजेंद्र ननावरे यांनी आभार मानले.

" *आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही* "
प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी
∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞
" आजच्या युगात ज्ञानाला खूप महत्व आहे,हे ज्ञान गुरुबरोबरच ग्रंथसंपदेत भरून उरले आहे.आपल्याला आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही. " असे मत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या वतीने, माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.
प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, "आज ज्या महान व्यक्तीची जयंती आज आपण साजरी करत आहोत,त्यांना लहानपनापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती.डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवनामध्ये शिक्षणाच्या परिस्पर्श झाल्यामुळे  तसेच जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, अभ्यासातील सातत्य व सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यासाच्या व्यासंगातून शास्त्रज्ञ झाले आणि राष्ट्रपती पदापर्यंत  पोहचले तसेच मेहनत व प्रामाणिकपणा अंगीकारून यशस्वी झेप घेतली.म्हणूनच ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मिती करायची असेल तर, ग्रंथवाचन करून ज्ञान,मनन,चिंतन करून ज्ञान संकलन करावे व अशा महापुरुषांचे अनुकरण विध्यार्थ्यानी करावे आणि आपले भविष्य उज्वल घडवावे " असे आवाहन केले.
उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करून आपली वाचन सवयी जोपासावी  हा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथपाल डॉ. सुधीर नगरकर यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी  ग्रंथालयातील नियतकालिकांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. तसेच ग्रंथालयाकडून करंट कंटेंट सर्विस सुरू करण्यात आली. याचा लाभ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतला.
कार्यक्रमासाठी विध्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी प्रा.राजेंद्र ननावरे यांनी आभार मानले.

Monday, 2 October 2023

*थोर व्यक्तींच्या विचारांचा वारसा युवापिढीने पुढे चालवावा*."*प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी*.=========================मेढा 2 ऑक्टोबर 2023 - " थोर व्यक्तींच्या विचारांची युवा पिढीने जपणूक करून, देश विकासासाठी आपला हातभार लावला पाहिजे आणि त्यांच्या विचारांचा वारसा आता युवा पिढीने पुढे चालवावा तीच खरी या महामानवांना खरी आदरांजली ठरेल " असे प्रतिपादन प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी यांनी केले. आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली.त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की," महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यात खडतर प्रवास सहन करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.त्यांना दक्षिण आफ्रिकेत ते रेल्वे मध्ये बसले असता,वर्णभेद मानणाऱ्या गोऱ्या लोकांनी रेल्वेमधून ढकलून दिले होते आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये वर्णभेद निर्मूलन झाले पाहिजे असा विचार आला.या उद्देशाने त्यांनी साऊथ आफ्रिकेत राहून,काळा गोराभेदाच्या विरोधात उठाव केला.भारतात परत आल्यानंतर त्यांनी वकिलीचा व्यवसाय न करता,देश स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात उडी घेतली व देशातील जनतेला जागृत करून,देश स्वतंत्र होईपर्यंत,ते अहिंसा,सत्य व शांततेच्या मार्गाने लढत राहिले.म्हणूनच आपला देश स्वतंत्र झाला. याच स्वतंत्र भारताचे तृतीय भूतपूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचीही आज जयंती आहे हे सुद्धा मूर्ती लहान पण कीर्ती महान असे व्यक्तिमत्व होते . शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि म्हणूनच भारताचा विकास हा भारतातील शेतीच्या विकासावरती आधारित आहे व भारत देशातील युवकांवर ते आधारलेला भारत देश आहे म्हणूनच लालबहादूर शास्त्री यांनी 'जय जवान, जय किसान' हा नारा दिला आणि त्यांनी शेतकरी, जवान व भारतीय जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले.या दोन्ही महापुरुषांचे योगदान आपल्याला कधीच विसरता येणार नाही "असे सांगून, राष्ट्रपिता महात्मा गांधी वं पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जीवनातील मौल्यवान आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.उदय पवार तर आभार डॉ. संजय भोसले यांनी मानले.============

*थोर व्यक्तींच्या विचारांचा वारसा युवापिढीने पुढे चालवावा*."
*प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी*.
=========================
मेढा 2 ऑक्टोबर 2023 - 
" थोर व्यक्तींच्या विचारांची युवा पिढीने जपणूक करून, देश विकासासाठी आपला हातभार लावला पाहिजे आणि  त्यांच्या विचारांचा वारसा आता युवा पिढीने पुढे चालवावा तीच खरी या महामानवांना खरी आदरांजली ठरेल " असे प्रतिपादन प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी यांनी केले.
  आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली.त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की," महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यात खडतर  प्रवास सहन करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.त्यांना दक्षिण आफ्रिकेत ते रेल्वे मध्ये बसले असता,वर्णभेद मानणाऱ्या गोऱ्या लोकांनी रेल्वेमधून ढकलून दिले होते आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये वर्णभेद निर्मूलन झाले पाहिजे असा विचार आला.या उद्देशाने त्यांनी साऊथ आफ्रिकेत राहून,काळा गोराभेदाच्या विरोधात उठाव केला.
भारतात परत आल्यानंतर त्यांनी वकिलीचा व्यवसाय न करता,देश स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात उडी घेतली व देशातील जनतेला जागृत करून,देश स्वतंत्र होईपर्यंत,ते अहिंसा,सत्य व शांततेच्या मार्गाने लढत राहिले.म्हणूनच आपला देश स्वतंत्र झाला. याच स्वतंत्र भारताचे तृतीय भूतपूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचीही आज जयंती आहे हे सुद्धा मूर्ती लहान पण कीर्ती महान  असे व्यक्तिमत्व होते . शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि म्हणूनच भारताचा विकास हा भारतातील शेतीच्या विकासावरती आधारित आहे व भारत देशातील युवकांवर ते आधारलेला भारत देश आहे म्हणूनच लालबहादूर शास्त्री यांनी  'जय जवान, जय किसान' हा नारा दिला आणि त्यांनी शेतकरी, जवान व भारतीय जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले.या दोन्ही महापुरुषांचे योगदान आपल्याला कधीच विसरता येणार नाही "असे सांगून, राष्ट्रपिता महात्मा गांधी वं पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जीवनातील मौल्यवान आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.उदय पवार तर आभार डॉ. संजय भोसले यांनी मानले.
============