Tuesday, 1 October 2024

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय “बेस्ट कॉलेज विथ इंनोवेशन" ने सन्मानित*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय “बेस्ट कॉलेज विथ इंनोवेशन" ने सन्मानित*
==================================
मेढा 
२७ सप्टेंबर २०२४
येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास "*बेस्ट कॉलेज विथ इंनोवेशन"* दि एज्युकेशन  ओव्हरव्व्हिवज" या शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील नामवंत संस्थेने 
“ नॅशनल एज्युकेशन अवॉर्ड्स २०२४, बेस्ट कॉलेज विथ इनोव्हेटिव्ह अवॉर्ड म्हणजे “ नावीन्यपूर्ण उपक्रमशील महाविद्यालय पुरस्कार नुकताच प्राप्त  झाला आहे. अशी माहीती महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी दिली.
२००२साली जावली तालुक्याचे तत्कालीन आमदार मा.शशिकांत शिंदे साहेब यांच्या अथक परिश्रमातून या महाविद्यालयाची स्थापना झाली.दुर्गम आणि डोंगराळ भागातील विध्यार्थ्यांची विशेषतः मुलींच्या शिक्षणाची सोय झाली.अवघ्या शंभर विद्यार्थ्यांवर सुरु झालेल्या कायम विनाअनुदानित तत्वावर सुरु झालेल्या व तालुक्यातील एकमेव महाविद्यालय म्हणून अनुदान प्राप्त झालेल्या या महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून या महाविद्याल्याने भरारी घेतली.सुरुवातीस कला व वाणिज्य या दोनच शाखा असलेल्या महाविद्यालयात विज्ञान विभाग सुरु केला.या तिन्ही विभागा बरोबरच सुसज्ज ग्रंथालय,संगणक व विज्ञान कार्यशाळा,जिमखाना विभाग, एन एस. एस. विभाग व सांस्कृतिक विभागा मार्फत महाविद्यालयात राबवले जाणारे विध्यार्थी केंद्रित उपक्रम या जोरावर या महाविद्यालयास नुकतेच आय एस ओ9001:2015 नामांकन प्राप्त झाले आहे.२०१२ साली या महाविद्यालयाला नॅक समितीने सी ग्रेड दिली, त्यानंतर २०१७ साली बी प्लस ही ग्रेड प्राप्त झाली, तर २०२३ मध्ये “ ए “ग्रेड प्राप्त झाली आहे .अशा या महाविद्यालयात आज कनिष्ठ व वरिष्ठ विभागात दोन हजार विध्यार्थी शिक्षण घेत आहेत.मागील २० वर्षात हजारो विध्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले तर अनेक विध्यार्थी सरकारी, निमसरकारी व खाजगी नोकऱ्या करीत असून अनेकांनी स्वतंत्र व्यवसाय सुरु केले आहेत.म्हणूनच या महाविद्यालयास “नावीन्यपूर्व उपक्रमशील महाविद्यालय पुरस्कार” प्राप्त झाला.या पुरस्काराबद्दल जयवंत प्रतिष्ठान हुमगाव या  संस्थेचे *सन्माननीय अध्यक्ष ,आमदार शशिकांतजी शिंदे साहेब* व *संस्थेच्या सन्माननीय सचिव सौ वैशाली शशिकांतजी शिंदे* यांनी,महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी, उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी यांचे या यशाबद्दल  मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच आपल्या या महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख व यशस्वी कमान अशीच चढती ठेवा  अशी अपेक्षा व्यक्त करून भविष्यातील आणखीन उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Monday, 2 September 2024

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे गुगल क्लासरूम या विषयावर कार्यशाळा संपन्न*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे गुगल क्लासरूम या विषयावर कार्यशाळा संपन्न* मेढा (ता.जावळी) - जयवंत प्रतिष्ठान संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑगस्ट २०२४ रोजी "डिजिटल क्लासरूम क्रांती: गुगल क्लासरूम हँड्स-ऑन" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. ए. व्ही. गिरी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. कार्यक्रमात उपप्रचार्य प्रा डॉ प्रमोद घाटगे हे प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे आणि मुख्य मार्गदर्शक म्हणून वायसीआयएस कॉलेज , सातारा येथील डॉ. विश्वनाथ घनवट उपस्थित होते त्यांनी कार्यशाळेमध्ये विशेष मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे आयोजन IQAC चे समन्वयक डॉ. सरंगपाणी आर. शिंदे आणि प्रणिशास्त्र विभागप्रमुख प्रा डॉ ओंकार यादव यांनी केले होते. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश शिक्षकांना गुगल क्लासरूम सारख्या अत्याधुनिक शिक्षण व्यवस्थापन प्रणालीची माहिती देणे व त्यांचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत प्रात्यक्षिके देणे हा होता. कार्यशाळेच्या उद्‌घाटन सत्रात प्रमुख पाहुण्यांनी डिजिटल शिक्षण साधनांचा वापर व त्यांची गरज यावर भाष्य केले. कार्यशाळेतील तांत्रिक सत्रात डॉ. घनवट यांनी गुगल क्लासरूम चे तांत्रिक पैलू, त्याचे वैशिष्ट्ये व त्याचा प्रभावी वापर कसा करावा याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रात, प्रमुख मार्गदर्शक डॉ. विश्वनाथ घनवट यांनी उपस्थितांना प्रत्यक्ष गुगल क्लासरूम तयार करणे आणि त्याच्या मूलभूत वैशिष्ट्यांची माहिती दिली. सर्व सहभागी शिक्षकांनी तांत्रिक सत्रात आपल्या लॅपटॉपसह सहभाग घेतला आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक अनुभव घेतला. कार्यशाळेतील प्रश्नोत्तर सत्रात शिक्षकांनी गुगल क्लासरूम च्या वापरातील संभाव्य अडचणी व शंका उपस्थित केल्या. डॉ. घनवट यांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण करताना उपयुक्त टिप्स दिल्या. प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या आगामी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून गुगल क्लासरूम हे एक गुणवत्ता उपक्रम म्हणून पुढील पाच वर्षांसाठी अंगिकारण्यात येणार असल्याचे घोषित केले. कार्यशाळेत ३५ प्राध्यापकांनी उत्साही सहभाग घेतला. कार्यशाळेचा समारोप प्राचार्य डॉ. गिरी यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला.कार्यक्रमाचे आभार प्रा.श्री. प्रकाश जवळ यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा सुनिल गायकवाड यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातील सर्व सदस्य, प्राचार्य डॉ. गिरी सर, आणि उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.

Wednesday, 14 August 2024

वैविध्यपूर्ण वाचनासाठी आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाचकांनी करणे काळाची गरज : प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी

वैविध्यपूर्ण वाचनासाठी आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाचकांनी करणे काळाची गरज : प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी मेढा/दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालात डॉ.एस आर रंगनाथान यांच्या जयंती प्रीत्यर्थ वन डे वर्कशॉप ओन इम्पोर्टन्स ऑफ रीडिंग घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गीरी यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड जोपासावी हा संदेश दिला तसेच विद्यार्थी दसेत विद्यार्थ्यांनी संदर्भ पुस्तकाचे वाचन केले पाहिजे तसेच सध्याच्या आधुनिक युगात ऑडीओ बुक्स एकले पाहिजेत तसेच माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यानी आपले ज्ञान वाढविले पाहिजे असा बहुमूल्य संदेश दिला तसेच ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मा. प्राचार्याच्या हस्ते करण्यात आले. मा. प्राचार्य यांनी आपल्या मनोगतात वाचन केले तरच आपल्या करिअर ला दिशा मिळेल “वाचाल तर वाचाल” हा संदेश दिला व ग्रंथपाल दिनाच्या शुभेछ्या दिल्या. कार्यक्रमासाठी मा.उप प्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे उपस्थित होते त्यानी आपल्या मनोगतात वाचन सवयी चे महत्त्व सांगितले आणि वाचनातील सातत्य हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली हा संदेश दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.एस आर नगरकर यांनी केले त्यांनी सध्याच्या काळात डॉ. एस. आर रंगनाथन यांच्या जीवनपट सांगितला व ग्रंथपाल दिनाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांनी ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले व त्यांनीच आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. ग्रंथालय परिचारक श्री वसंत धनावडे , श्री. आबासाहेब देशमुख व श्री अविनाश मदने यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यशाळेचा व ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी घेतला.

Saturday, 6 April 2024

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न* मेढा : 22 फेब्रुवारी 2024 " विध्यार्थांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करण्याचा विचार करावा. ध्येय निश्चित असेल तर व्यवसायात देखील नक्कीच यश मिळू शकेल. व्यवसाय करताना सर्वे करा. मार्केटची मागणी विचारात घ्या. दुसरा करतोय म्हणून आपण तोच व्यवसाय न करता त्यामध्ये काही तरी नवीन्य आणा. नोकरीच्या मागे न लागता इतरांना काम आणि नोकरी तुम्ही द्या असा व्यवसाय करा. स्पर्धेत यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते, त्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी असावी लागते त्याशिवाय यश संपादन करता येत नाही " असे मत प्रसिद्ध उद्योजक सन्मानीय वसंत फडतरे यांनी व्यक्त केले. जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उद्योजक मा. श्री वसंत फडतरे हे उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त दादासाहेब शिंदे होते त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थाना विविध उपक्रम शील गोष्टी सांगून क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले तसेच प्रास्तविक करताना प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांनी शैक्षणिक वर्षात केलेल्या विविध कामगिरीचाआढावा मांडला तसेच त्यावेळी त्यांनी महाविद्यालयाची वाटचाल व विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या भाषणानंतर महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2023-2024 यावर्षी क्रीडा , सांस्कृतिक , राष्ट्रीय सेवा योजना व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विध्यार्थी-विध्यार्थीनीचा गौरव करण्यात आला. तसेच क्रीडा विभागातील शिवाजी विद्यापीठ संघात निवड झालेल्या व ऑलइंडिया इंटरइनव्हर्सिटी स्पर्धेत व खेलो इंडिया स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रमुख पाहुण्याच्या असते सन्मानचिन्ह रोख रक्कम देण्यात आली तसेच महाविद्यालयातील प्राचार्य ,उपप्राचार्य प्राध्यापक यांनी केलेल्या कामगिरी बद्धल प्रमुख पाहुण्याच्या असते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला याच कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील भारतीय सैन्यदलात भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला सत्कार करण्यात आला. अशा प्रकारे हा वार्षिक पारितोषिक व गुणगौरव सोहळा आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिमखाना विभाग प्रमुख प्रा.प्रमोद चव्हाण यांनी अहवाल वाचन केले, प्रा. अमेय देसाई यांनी प्रमुख पाहुण्यांचा पारीचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ गायत्री जाधव ,कु .शुभांगी पाटील यांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.प्रमोद घाटगे यांनी आभार मानले….

Monday, 11 March 2024

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मेढा येथील आमदार शशीकांत शिंदे महाविद्यालयातील कु.वैभवी सुर्वे हीचे यश

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मेढा येथील आमदार शशीकांत शिंदे महाविद्यालयातील कु.वैभवी सुर्वे हीचे यश —---------------------- मेढा: दिनांक ९ मार्च २०२४ सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने सातारा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत,येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशीकांत शिंदे महाविद्यालयातील बी. एस्सी. भाग १ ची विद्यार्थिनी कु. वैभवी भरत सुर्वे हिने विभागून तृतीय क्रमांक मिळवला. तिने ‘जल हेच जीवन’ या विषयावर तिचे मत अतिशय उत्कृष्ट मांडणी केली.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सातारा अंतर्गत विविध जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धा ही निबंध, चित्रकला, वक्तृत्व आणि लघुपट निर्मिती अश्या प्रकारांमध्ये कनिष्ठ व आणि वरिष्ठ गटांमध्ये घेण्यात आली.कु.वैभवी सुर्वे हिच्या या यशाबद्दल महाविद्यालायचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी, उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे तसेच सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी तिचे कौतुक व अभिनंदन केले. सुर्वे हिला रोख रक्कम,प्रशस्तीपत्र व शिल्ड देवून गौरविण्यात आले.महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.आनंद साठे, प्रा.डॉ. ओमकार यादव व प्रा. रोहिणी खंदारे यांचे मार्गदर्शन लाभले.कु.वैभवी सुर्वे हिला रोख रक्कम,प्रशस्तीपत्र व शिल्ड देवून गौरविण्यात आले.

सकाळ बातमी