आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय “बेस्ट कॉलेज विथ इंनोवेशन" ने सन्मानित*
*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय “बेस्ट कॉलेज विथ इंनोवेशन" ने सन्मानित* ================================== मेढा २७ सप्टेंबर २०२४ येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास "*बेस्ट कॉलेज विथ इंनोवेशन"* दि एज्युकेशन ओव्हरव्व्हिवज" या शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील नामवंत संस्थेने “ नॅशनल एज्युकेशन अवॉर्ड्स २०२४, बेस्ट कॉलेज विथ इनोव्हेटिव्ह अवॉर्ड म्हणजे “ नावीन्यपूर्ण उपक्रमशील महाविद्यालय पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे. अशी माहीती महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी दिली. २००२साली जावली तालुक्याचे तत्कालीन आमदार मा.शशिकांत शिंदे साहेब यांच्या अथक परिश्रमातून या महाविद्यालयाची स्थापना झाली.दुर्गम आणि डोंगराळ भागातील विध्यार्थ्यांची विशेषतः मुलींच्या शिक्षणाची सोय झाली.अवघ्या शंभर विद्यार्थ्यांवर सुरु झालेल्या कायम विनाअनुदानित तत्वावर सुरु झालेल्या व तालुक्यातील एकमेव महाविद्यालय म्हणून अनुदान प्राप्त झालेल्या या महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून या महाविद्याल्याने भरार...