सावित्रीबाईंना त्यांच्या १९१ व्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !

१८व्या शतकात महाराष्ट्रात स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज, ३ जानेवारी जयंतीदिन. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा जोतीराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या १९१ व्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !

त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे ३ जानेवारी, इ.स. १८३१ रोजी झाला. आईचं नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील होते. अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले. ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली. सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य जोतीराव व सावित्रीबाई यांनी केले. १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून या दाम्पत्याने प्रथम शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे , स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. 
       
३ जानेवारी, २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमीत्त गूगलने त्यांच्या महान कार्याची दाखल घेत डूडल प्रसिद्ध करुन अभिवादन केले होते.

सावित्रीबाई फुले यांचे कार्य
१. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली.
२. इ.स. १८४८ ते १८५२पर्यंत त्यांनी एकूण १८ शाळा काढल्या.
३. इ.स. १८५४ साली त्यांचा ‘काव्यफुले’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.
४. इ.स. १८६३ साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसूतिगृहही सुरू केले.
५. १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले.
६. इ.स. १८९३ साली सासवड येथे झालेल्या ‘सत्यशोधक परिषदे’चे अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषविले.
७. इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई , गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.

सावित्रीबाई फुले यांची प्रकाशित पुस्तके
– काव्यफुले (काव्यसंग्रह)
– सावित्रीबाईंची गाणी (१८९१)
– सुबोध रत्नाकर
– बावनकशी

Krantijyoti Savitribai Phule related selected Books, Ph.D Theses, Film- Videos, Other Information Sources

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याशी संबंधित निवडक ग्रंथ, पीएच. डी प्रबंध, चित्रपट- विडीओज, इतर माहिती स्त्रोत

https://www.dnyansagar.in/2021/01/Krantijyoti-Savitribai-Phule.html

अश्या महान व्यक्तीला मानाचा मुजरा. 

 🙏 आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद! 🙏                                                 
                                                                                                                                                                         
💐💐💐💐💐💐💐                                                                                                                                                                                                                                                              
🙏🙏🙏😊💐

   *🙏 घरी रहा !! सुरक्षित रहा 🙏*

 *🍂🍁🍂🍁 🍁🍂🍁🍂*

Comments

  1. खूप छान कामास सर आपण सुरुवात केली आहे. मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस आपणांस शुभेच्छा!!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे नेट व सेट परीक्षेत यश