Tuesday, 19 August 2025
Thursday, 14 August 2025
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे “रानभाज्या महोत्सव” २०२५ उत्साहात साजरा*
*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे “रानभाज्या महोत्सव” २०२५ उत्साहात साजरा*
पावसाळ्यात निसर्गाच्या कुशीत नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या रानभाज्यांचे महत्त्व विद्यार्थ्याच्या आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने रानभाज्या महोत्सवांचे आयोजन करण्यात आले. आजकालच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये माणसाकडे आरोग्य व समतोल आहार घेण्यासाठी अजिबात वेळ नाही. याचाच परिणाम म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या बाबतीत समस्या वाढत आहेत. याचा फायदा घेऊन विदेशी कंपन्या आपली निरनिराळी उत्पादने बाजारात विकत आहेत आणि युवा पिढी याचा अंधाधुंदपणे वापर करत आहेत. वेगवेगळी आकर्षक जंक आणि फास्ट-फूड मुळे भविष्यात आरोग्याच्या बाबतीत उद्भवणाऱ्या नव्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता निसर्गाशी नाते जोडून जंक फूड ला बगल देऊन आपला परंपरागत वारसा जपण्याचा प्रयत्न आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा वनस्पतीशास्त्र विभाग व तालुका कृषी विभाग जावली (मेढा) (अग्रणी महाविद्यालय योजना व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन योजना आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने “रानभाज्या महोत्सव” २०२५ आयोजित करण्यात आला होता.
जावळी हा भाग डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेला व निसर्गाशी नाळ जोडलेला असल्याने तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी सुद्धा डोंगराळ भागातील असल्याने या उपक्रमासाठी जवळपास ४२ प्रकारच्या रान भाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची रेलचेल येथे दिसून आली. यात शेवगा, कुर्डू, केना, कार्टुली, उंबर, ढेसा, भालगा, भारंगी, चीचुरटे, शेंडवाल, मोहर, टाकाळा, माट, केळ फुले, कडीपत्ता, आळू, भोकर, मोरचौडा, उडीद पाने, ओवा, चुका, घोळ, बरका, पात्री या सारख्या अनेक रानभाज्याची रेसिपी विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणली होती. याच बरोबर त्यांची माहिती म्हणजेच त्यांचे शास्त्रीय नावं, कुळ तसेच पदार्थ बनविण्याच्या कृतींचीही माहिती देण्यात आली. तसेच कृषी विभाग जावली यांच्या वतीने रानभाज्यांची विक्री करण्यासाठी शेतकरी बचत गटांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. या मध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्यांची सुद्धा खरेदी विक्री झाली. खरेदी बरोबरच रानभाज्यांची माहिती फलकांच्या माध्यमातून शेतकर्यांनी ग्राहकांना दिली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. श्री. अजय शेंडे (जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सातारा) यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रदर्शनातून शेतकऱ्यांनी रानभाज्यांचे महत्त्व व गुणधर्म समजून घ्यावेत असे आवाहन केले. त्याचबरोबर कृषी विभागा मार्फत चालू असणाऱ्या योजनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. उदय पवार (वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख) यांनी रानभाज्यांचे महत्व विषद केले. प्रमुख व्याख्यात्या डॉ. प्राची क्षीरसागर (असिस्टंट प्रोफेसर इन बॉटनी मॉर्डन कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स जीके, पुणे) यांनी त्यांच्या अनुभवातून मिळालेल्या विविध रानभाज्यांचे महत्व त्यांच्या अनुभवी शैलीत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना स्व: अनुभवातून रोजगाराच्या संधी कश्या आत्मसात कराव्यात तसेच रानभाज्यांचे संशोधन व संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक भर द्यावा असे मार्गदर्शन केले. याच बरोबर त्यांनी ग्रामीण भागातील विविध उत्पादने व सेवांसाठी उद्योजक म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले तसेच सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी रानभाज्यांचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व असल्याचे आवर्जून प्रतिपादन केले.
या प्रदर्शनासाठी डॉ. प्रमोद घाटगे महाविद्यालय विकास समिती सदस्य मा. श्री. बापूसाहेब रूपनवर (मांडल कृषी अशधकारी, मेढा) श्री. किरण बर्गे, श्री. एम. डी. माने, श्री.अजय पवार, श्री. फडतरे व जावळी तालुक्यातील सर्वच सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते सदर रानभाजी महोत्सवाचे सर्व आयोजनात सहाय्यक कृषी अधिकारी श्री. भानुदास चोरगे व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. सचिन नेवसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याचबरोबर अग्रणी महाविद्यालय योजना समन्वयक डॉ. संजय भोसले यांचीही प्रमुख उपस्थिति होती. महाविद्यालयाच्या लिंकेज अंतर्गत डॉ. स्वप्नजा देशपांडे (विभागप्रमुख बी. हॉक. डी. पी. भोसले कॉलेज, कोरेगांव), श्रीमती गायत्री जाधव आणि श्रीमती सई रसाळ यांनी पाककृतींचे परीक्षण केले. सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती धनश्री देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन आणि कार्यक्रमाचे आभार श्री. प्रवीण जाधव (वनस्पतीशास्त्र विभाग) यांनी केले.
प्रदर्शनात विद्यार्थ्यानी बनविलेल्या रानभाज्यांच्या पाककृतींचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतला तसेच, शेतकर्यांनी विक्रीसाठी आणलेल्या भाज्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाली. सदर पाककृती स्पर्धेमध्ये ४८ विद्यार्थ्यांनी ४२ वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्यांची पाककृती तयार करून आणली होती. त्यामधून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे नंबर काढण्यात आले आणि विजेत्यांना सन्मान चिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र याचे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. त्याचबरोबर रानभाज्या विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. या उपक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, महाविद्यालयाचे विद्यार्थी, पत्रकार यांनी उपस्थित राहून संपूर्ण सहकार्य केले.
*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे “रानभाज्या महोत्सव” २०२५ उत्साहात साजरा* पावसाळ्यात निसर्गाच्या कुशीत नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या रानभाज्यांचे महत्त्व विद्यार्थ्याच्या आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने रानभाज्या महोत्सवांचे आयोजन करण्यात आले. आजकालच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये माणसाकडे आरोग्य व समतोल आहार घेण्यासाठी अजिबात वेळ नाही. याचाच परिणाम म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या बाबतीत समस्या वाढत आहेत. याचा फायदा घेऊन विदेशी कंपन्या आपली निरनिराळी उत्पादने बाजारात विकत आहेत आणि युवा पिढी याचा अंधाधुंदपणे वापर करत आहेत. वेगवेगळी आकर्षक जंक आणि फास्ट-फूड मुळे भविष्यात आरोग्याच्या बाबतीत उद्भवणाऱ्या नव्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता निसर्गाशी नाते जोडून जंक फूड ला बगल देऊन आपला परंपरागत वारसा जपण्याचा प्रयत्न आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा वनस्पतीशास्त्र विभाग व तालुका कृषी विभाग जावली (मेढा) (अग्रणी महाविद्यालय योजना व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन योजना आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने “रानभाज्या महोत्सव” २०२५ आयोजित करण्यात आला होता.जावळी हा भाग डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेला व निसर्गाशी नाळ जोडलेला असल्याने तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी सुद्धा डोंगराळ भागातील असल्याने या उपक्रमासाठी जवळपास ४२ प्रकारच्या रान भाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची रेलचेल येथे दिसून आली. यात शेवगा, कुर्डू, केना, कार्टुली, उंबर, ढेसा, भालगा, भारंगी, चीचुरटे, शेंडवाल, मोहर, टाकाळा, माट, केळ फुले, कडीपत्ता, आळू, भोकर, मोरचौडा, उडीद पाने, ओवा, चुका, घोळ, बरका, पात्री या सारख्या अनेक रानभाज्याची रेसिपी विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणली होती. याच बरोबर त्यांची माहिती म्हणजेच त्यांचे शास्त्रीय नावं, कुळ तसेच पदार्थ बनविण्याच्या कृतींचीही माहिती देण्यात आली. तसेच कृषी विभाग जावली यांच्या वतीने रानभाज्यांची विक्री करण्यासाठी शेतकरी बचत गटांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. या मध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्यांची सुद्धा खरेदी विक्री झाली. खरेदी बरोबरच रानभाज्यांची माहिती फलकांच्या माध्यमातून शेतकर्यांनी ग्राहकांना दिली. या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. श्री. अजय शेंडे (जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सातारा) यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रदर्शनातून शेतकऱ्यांनी रानभाज्यांचे महत्त्व व गुणधर्म समजून घ्यावेत असे आवाहन केले. त्याचबरोबर कृषी विभागा मार्फत चालू असणाऱ्या योजनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. उदय पवार (वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख) यांनी रानभाज्यांचे महत्व विषद केले. प्रमुख व्याख्यात्या डॉ. प्राची क्षीरसागर (असिस्टंट प्रोफेसर इन बॉटनी मॉर्डन कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स जीके, पुणे) यांनी त्यांच्या अनुभवातून मिळालेल्या विविध रानभाज्यांचे महत्व त्यांच्या अनुभवी शैलीत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना स्व: अनुभवातून रोजगाराच्या संधी कश्या आत्मसात कराव्यात तसेच रानभाज्यांचे संशोधन व संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक भर द्यावा असे मार्गदर्शन केले. याच बरोबर त्यांनी ग्रामीण भागातील विविध उत्पादने व सेवांसाठी उद्योजक म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले तसेच सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी रानभाज्यांचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व असल्याचे आवर्जून प्रतिपादन केले.या प्रदर्शनासाठी डॉ. प्रमोद घाटगे महाविद्यालय विकास समिती सदस्य मा. श्री. बापूसाहेब रूपनवर (मांडल कृषी अशधकारी, मेढा) श्री. किरण बर्गे, श्री. एम. डी. माने, श्री.अजय पवार, श्री. फडतरे व जावळी तालुक्यातील सर्वच सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते सदर रानभाजी महोत्सवाचे सर्व आयोजनात सहाय्यक कृषी अधिकारी श्री. भानुदास चोरगे व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. सचिन नेवसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याचबरोबर अग्रणी महाविद्यालय योजना समन्वयक डॉ. संजय भोसले यांचीही प्रमुख उपस्थिति होती. महाविद्यालयाच्या लिंकेज अंतर्गत डॉ. स्वप्नजा देशपांडे (विभागप्रमुख बी. हॉक. डी. पी. भोसले कॉलेज, कोरेगांव), श्रीमती गायत्री जाधव आणि श्रीमती सई रसाळ यांनी पाककृतींचे परीक्षण केले. सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती धनश्री देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन आणि कार्यक्रमाचे आभार श्री. प्रवीण जाधव (वनस्पतीशास्त्र विभाग) यांनी केले.प्रदर्शनात विद्यार्थ्यानी बनविलेल्या रानभाज्यांच्या पाककृतींचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतला तसेच, शेतकर्यांनी विक्रीसाठी आणलेल्या भाज्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाली. सदर पाककृती स्पर्धेमध्ये ४८ विद्यार्थ्यांनी ४२ वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्यांची पाककृती तयार करून आणली होती. त्यामधून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे नंबर काढण्यात आले आणि विजेत्यांना सन्मान चिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र याचे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. त्याचबरोबर रानभाज्या विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. या उपक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, महाविद्यालयाचे विद्यार्थी, पत्रकार यांनी उपस्थित राहून संपूर्ण सहकार्य केले.
Sunday, 10 August 2025
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा ✨🌸
🌸✨ रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा ✨🌸
बंधाची, मायेची, विश्वासाची आणि प्रेमाची
ही अमूल्य गाठ – रक्षाबंधन ❤
भाऊ-बहिणीच्या नात्यातील जिव्हाळा,
हास्य, आठवणी आणि साथ यांचा सुंदर उत्सव!
या पवित्र धाग्यात आहे
आयुष्यभर जपण्याचं वचन,
आणि न संपणाऱ्या नात्याचं सोनं… 💛
“भावा-बहिणीच्या प्रेमाला हजारो सलाम,
रक्षाबंधनच्या शुभ दिवशी तुम्हा सर्वांना
खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद!” 🎉🎁
🌼💫 रक्षाबंधन मंगलमय होवो💫🌼 💐💐💐💐💐
FROM: Dr. Sudhir Nagarkar
Saturday, 9 August 2025
आलेवाडी डोंगर परिसरात विद्यार्थ्यानी टाकले १५००० जंगली वृक्षांचे बीज गोळे*
*आलेवाडी डोंगर परिसरात विद्यार्थ्यानी टाकले १५००० जंगली वृक्षांचे बीज गोळे*
*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम*
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आलेवाडी ता.जावली या गावातील डोंगर परिसरात विविध प्रकारच्या जंगली वृक्षांचे सुमारे १५००० बीज गोळे विद्यार्थ्यानी तयार करून ते गावालगत असलेल्या डोंगर परिसरात टाकण्यात आले आहेत. आलेवाडी गावामध्ये गेल्या दोन वर्षापासून नवसंजीवन जलसंवर्धन सामाजिक संस्था आलेवाडी यांच्या पुढाकारातून जलसंधारणाची विविध कामे सुरु आहेत.नजीकच्या काळात आलेवाडी गाव हे एक पाणीदार गाव म्हणून जावली तालुक्यात आपली ओळख निर्माण करण्याचा ध्यास या गावाने घेतला आहे.या गावाने हाती घेतलेल्या या जलसंधारण मोहिमेत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय सुद्धा उस्फुर्तपणे सहभागी झाले आहे.याचाच एक भाग म्हणून जलसंधारण कार्याला हातभार आणि गावाला या कार्यात प्रेरणा देण्याच्या प्रमुख उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयामार्फत करण्यात आले असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य,मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांनी सांगितले.महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ.प्रमोद घाटगे, ठाणे येथील प्रश्न फाऊडेशन या संस्थेचे सातारा जिल्हा समन्वयक श्री.रजत नवले आणि नवसंजीवन जलसंधारण संस्थेचे सदस्य श्री.विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील ५० विद्यार्थी आणि ०५ शिक्षक व आलेवाडी गावातील ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी झाले होते.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय धोंडे यांनी या उपक्रमाचे प्रास्ताविक केले राष्ट्रीय सेवा योजना समिती सदस्य प्रा.प्रकाश जवळ यांनी सहभागी विद्यार्थी व ग्रामस्थांचे आभार मानले. तसेच डॉ.प्रमोद चव्हाण डॉ.विनोद पवार,डॉ.बाळासाहेब उघडे या राष्ट्रीय सेवा योजना समिती सदस्यांनी उस्फुर्त सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
आमदार शशिकांत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात नवोदित विद्यार्थ्यांनाचे स्वागत*
*आमदार शशिकांत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात नवोदित विद्यार्थ्यांनाचे स्वागत*
मेढा दि . ६ ऑगष्ट रोजी येथील आमदार शशिकांत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता अकरावीच्या नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम संपन्न झाला .दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही प्रत्येक विद्यार्थ्यांस गुलाब पुष्प देऊन त्यांचे महाविद्यालया चे वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले .
यावेळी सर्व कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन मा. प्राचार्य मेजर डॉ अशोक व्हि गिरी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच इ १२ वीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली .
सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपली विषय शिक्षक म्हणून ओळख करून दिली व पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या . यावेळी महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रा डॉ प्रमोद घाटगे सर यांची प्रमुख उपस्थिती होती . त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शिस्तीचे महत्व पटवून दिले व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा संतोष कदम यांनी केले . तर अध्यक्षीय मनोगत मा प्राचार्य यांनी व्यक्त करताना सर्व विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेज जीवनातील प्रथम दिवसात अनुभवलेल्या अनेक आठवणी सांगितल्या व वर्षभरातील अनेक शैक्षणीक उपक्रमांची माहिती दिली, विविध स्पर्धांमध्ये भाग घेणे आपल्या व्यक्तिमत्व विकासात कसे महत्वाचे आहे याचे तपशीलवार विवेचन केले.आपणच आपल्या आयुष्याला आकार देऊन आपल्या भविष्यातील ध्येये साध्य करूयात . यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्याचे काम आम्ही सर्व जण करू असे आश्वासन देऊन सर्व .
विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा डॉ सुधीर नगरकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना ई लर्निंग लायब्ररी ची ओळख करून दिली .
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता १२ वीच्या विद्यार्थीनी कुमारी सानिका सुतार व साक्षी ढेबे यांनी केले .
तर आभार प्रदर्शन कुमारी तानीया सपकाळ यांनी केले . यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .
Friday, 11 July 2025
news
नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र उद्योजक सुशांत भिलारे | https://sp-news7.blogspot.com/2025/07/blog-post_11.html?m=1
Monday, 7 July 2025
*नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र**उद्योजक श्री. सुशांत भिलारे*
*नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र*
*उद्योजक श्री. सुशांत भिलारे*
विध्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संघर्ष अटळ आहे आणि सातत्य पूर्ण प्रामाणिक प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र आहे असे मत मा. श्री सुशांत भिलारे यांनी व्यक्त केले. ते
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात "आजच्या युवकासमोरील आव्हाने आणि विविध संधी" या विषयावर विध्यर्थ्यांच्यासाठी आयोजित व्याख्यान आणि मार्गदर्शन या कार्यक्रमात बोलत होते.
सदर कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या जीवन प्रवास विध्यार्थीच्या समोर मांडला.
जावली सारख्या ग्रामीण भागातील युवक सुद्धा कसा यशस्वी होऊ शकतो हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून पटवून दिले.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्ध, चिकाटी आणि आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा आहे असे मत त्यानी व्यक्त केले.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा डॉ प्रमोद घाटगे यांनी सुशांत भिलारे यांचा आदर्श युवकांनी घ्यावा असे आवाहन केले. तसेच शिक्षणामुळे भविष्यात अनेक संधी उपलब्ध होतील असे मत मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविदयालयचे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी यांनी शिस्त, संयम, सातत्यपूर्ण प्रामाणिक संघर्ष आणि एकनिष्ठा किती महत्वाची आहे हे पटवून दिले. तसेच जावली तालुक्यातील उद्योजक यांनी तालुक्यातील विध्यार्थीना प्रेरणा देऊन त्यांचे उज्वल भविष्य यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. श्री शंकर देशमुख सर यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रकाश जवळ यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा डॉ सारंगपाणी शिंदे यांनी केले आणि आभार प्रा डॉ संजय धोंडे यांनी मानले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विविध अभ्यास क्रमाचे विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
*सहकार क्षेत्रामधील योग्य शिक्षण, प्रशिक्षण व कौशले प्राप्त करून विविध व्यवसायसह अनेक नोकरीच्या संधीसाठी युवकांनी स्वतःला सिद्धकरावे-* *सहाय्यक निबंधक श्री. सुनिल जगताप*
*सहकार क्षेत्रामधील योग्य शिक्षण, प्रशिक्षण व कौशले प्राप्त करून विविध व्यवसायसह अनेक नोकरीच्या संधीसाठी युवकांनी स्वतःला सिद्धकरावे-*
*सहाय्यक निबंधक श्री. सुनिल जगताप*
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथे सहकार संवर्धन आणि सहकारी चळवळीत युवकांचा सहभाग या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहकार निबंधक कार्यालय,मेढा येथील सहाय्यक निबंधक श्री. सुनिल जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सहकार हा मानवी जीवनाचा मूलाधार आहे. दुर्बल घटकांचा आधार म्हणून सहकाराकडे पाहिले जाते.देशाच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनात सहकारी संस्थांनी महत्वाचे योगदान दिले आहे. जागतिकीकरणानंतर सहकारी संस्थांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. असे असले तरीही ग्रामीण समाजातील अर्थिक दृष्टया दुर्बल घटकांचे हित जोपासण्याचे कार्य सहकारी संस्था पार पाडत आहेत. देशाचा सर्वसमावेशक विकास घडवून आणण्यासाठी सहकाराशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणुनच युवकांनी सहकारी चळवळीच्या विकासासाठी आणि सहकाराचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेऊन समाजात सहकार विषयक जागृती निर्माण करावी.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य,मेजर डॉ.अशोक गिरी यांनी या चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका सांगून विद्यार्थ्यानी सहकाराचे प्रशिक्षण घेऊन आपले नेतृत्व विकसित करावे आणि सामजिक परिवर्तनाबरोबरच सहकारी संस्थामधून उपलब्ध होत असलेल्या अनेक रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी केले. या चर्चासत्रासाठी महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.प्रमोद घाटगे, सहकार तज्ञ श्री. वैभव शिंदे, श्री. अक्षय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या चर्चासत्राचे संयोजन महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागामार्फत करण्यात आले.प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय धोंडे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. सुजित कसबे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.डॉ. मृणालिनी वाईकर यांनी केले.महाविद्यालयातील शिक्षक आणि १२० विद्यार्थी या चर्चासत्रात सहभागी झाले होते. चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विषेश परिश्रम घेतले.
Saturday, 28 June 2025
*“अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी – एक गंभीर सामाजिक प्रश्न" - मा. न्यायदंडाधिकारी डॉ.विक्रम आव्हाड”*
*“अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी – एक गंभीर सामाजिक प्रश्न" - मा. न्यायदंडाधिकारी डॉ.विक्रम आव्हाड”*
मेढा/ दिनांक 26 जुलै 2025 रोजी, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली, मा. उच्च न्यायालय, मुंबई, ना.महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, आणि मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे आदेशान्वये, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला.मेढा येथील दिवाणी न्यायाधीश,क.स्तर,तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ.विक्रम आव्हाड, यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.तसेच मेढा पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक श्रीमती अश्विनी पाटील, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.प्रमोद घाटगे, जावली तालुका बार संघाचे अध्यक्ष ॲड. श्री.आर.एस.पोफळे, ॲड.श्रीमती.पी.डी गोरे, ॲड. श्रीमती.एन.एस. पवार,ॲड.श्री अनुप लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना मा. डॉ.विक्रम आव्हाड यांनी सांगितले की,भारतात नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्राफिक सब्सटंन्सेस ऍक्ट- १९८५(एनडीपीएस ) नुसार नशीले पदार्थ वापरणे गुन्हा आहे. यासाठी होणारा दंड अगर शिक्षा ही ड्रग्सचा किती प्रमाणात वापर होतो त्यावर अवलंबून असते.युवा पिढीमध्ये अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी करण्याचे प्रमाण वाढत आहे हा एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला असून युवकांनी अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे असे आवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.
अध्यक्षीय मनोगतातून बोलताना प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी म्हणाले की अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी ही बाब समाजाच्या आणि एकंदर राष्ट्राच्या प्रगतीला मारक ठरत आहे. दिवसेंदिवस आपली युवा पिढी अमली पदार्थ सेवनाच्या जाळ्यात अडकत असल्याचे आढळत आहे.कोणत्याही देशाच्या प्रगतीचा प्रमुख आधारस्तंभ युवक हाच असतो.म्हणून भावी पिढीला अमली पदार्थाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि आरोग्यसंपन्न विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी समाजजागृती करणे ही युवा पिढीची जबाबदारी आहे.
दरवर्षी २६ जून हा दिवस जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी याबाबत विद्यार्थी वर्गात जाणीव जागृती करण्याच्या प्रमुख उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या मार्फत करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस.अधिकारी डॉ.संजय धोंडे यांनी केले.प्रा.प्रकाश जवळ यांनी उपस्थितांचे आभार मानले तर प्रा.सौ.गायत्री जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Saturday, 29 March 2025
Subscribe to:
Posts (Atom)
-
*शिक्षणातून आर्थिक उन्नती साधणे हा प्रत्येकाचा अधिकार - प्राचार्य मेजर डॉ . अशोक गिरी* आ .शशिंकात शिंदे कनिष्ठ महाविद्यालय मेढा अंतर्गत ...
-
*तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष व महिला गटात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय अव्वल स्थानावर* सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्...
-
शिवजयंती शिवचरित्रातून काय शिकावे सुरूवात करण्यावर भर द्या, कमतरतेवर लक्ष देऊ नका. रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बालशिवबा सोबत फक्त आठ द...