Posts

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न*.मेढा : 29 ऑगस्ट 2023जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित ,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्ह्याचे पाहिले आयर्नमन ,मेढा येथील सुप्रसिध्द धन्वंतरी डॉ.सुधीर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयात स्पोर्ट्स बुलेटिन हा उपक्रम मान्यवरांच्या हस्ते सुरू करण्यात आला. त्यानंतर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजनकरण्यात आले.त्यानंतर डॉ.सुधीर पवार यांनी " खेळाडूंचे आरोग्य आणि आहार " या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले,खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, " चांगल्या आरोग्यासाठी आहार महत्वाचा असतो.तुम्ही जर खेळाडू असाल तर तुम्ही आपल्या आहाराबाबत खूप जागरूक असणे आवश्यक आहे.चांगल्या आहारामुळे तुमची खेळातील कामगिरी सुधारण्यास मदत होऊ शकते.कोणत्याही खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी करण्यात सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे आहार.कारण योग्य आहारावरच खेळाडूंचे वजन,शरीरातील चरबीचे,पाण्याचे प्रमाण,स्नायूची,श्वसनाची,आणि हृदयाची कार्यक्षमता आणि ताकत अवलंबून असते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ.मेजर अशोक व्ही.गिरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की," खेळाडूंनी आहारात अचानक बदल करू नये,जो आहार सुरुवातीपासून तुम्ही घेता,तोच कायम ठेवला पाहिजे,प्रत्येक खेळाडूने शारीरिक क्षमते बरोबरच आहाराला महत्व आहे " असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख जिमखाना विभागप्रमुख प्रा.प्रमोद चव्हाण यांनी केले.तर सूत्रसंचालन प्रा.शंकर गेजगे यांनी केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,खेळाडू व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. उल्हास जाधव यांनी मानले.

Image
*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे राष्ट्रीय क्रीडा दिन  संपन्न*. मेढा : 29 ऑगस्ट 2023 जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित ,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे जयंतीनिमित्त  राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्ह्याचे पाहिले आयर्नमन ,मेढा येथील सुप्रसिध्द धन्वंतरी डॉ.सुधीर पवार  यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते.         कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयात स्पोर्ट्स बुलेटिन हा उपक्रम मान्यवरांच्या हस्ते सुरू करण्यात आला. त्यानंतर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर डॉ.सुधीर पवार यांनी " खेळाडूंचे आरोग्य आणि आहार " या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले,खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, " चांगल्या आरोग्यासाठी आहार महत्वाचा असतो.तुम्ही जर खेळाडू असाल तर तुम्ही आपल्या आहाराबाबत खूप जागरूक असणे आवश्यक आहे.चांगल्या आहारामुळे तुमची खेळातील कामगिरी सुधारण्यास मदत होऊ शकते.कोण...

मेढा महाविद्यालयात “रानभाज्या महोत्सव २०२३ " उत्साहात साजरा*

Image
*मेढा महाविद्यालयात “रानभाज्या महोत्सव २०२३ " उत्साहात साजरा* ======================== मेढा : 21 ऑगस्ट 2023 आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा  वनस्पतीशास्त्र विभाग व तालुका कृषी विभाग जावली,मेढा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन योजना (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने,अग्रणी महाविद्यालय योजना अंतर्गत  “रानभाज्या महोत्सव ” २०२३ आयोजित करण्यात आला होता.          या महोत्सवाचे उदघाट्न या उद्घाटन मा.श्रीमती भाग्यश्री पवार – फरांदे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सातारा यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी हे होते.या प्रदर्शनासाठी उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे, कृषी सहाय्यक श्री. भानुदास चोरगे,आत्मा जावळीचे श्री.सचिन नेवसे, विभागीय संघटिका श्रीमती सुनिता राजे-घाटगे,ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे, मा. आर के. जाधव, श्री.नंदकुमार काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.आपल्या भाषणात श्रीमती भाग्यश्री पवार म्हणाल्या " आजकालच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये माणसाकडे आरोग्य व समतोल आहार घेण्यासाठी अजिबात वेळ नाही. ...

विद्यार्थी दशेत चरित्र संवर्धन करावे व रॅगिंग सारख्या वाईट प्रवृत्तीना थारा देऊ नये*

Image
* विद्यार्थी दशेत चरित्र संवर्धन करावे व रॅगिंग सारख्या वाईट प्रवृत्तीना थारा देऊ नये*  *विधिज्ञ .अनुप लकडे* आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा या महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध समिती आणि लैंगिक छळ प्रतिबंध समिती यांच् या संयुक्त विद्यमाने 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या कालावधीत अँटी रॅगिंग सप्ताह साजरा करण्यात आला, 14 ऑगस्ट 2023 रोजी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना Ragging म्हणजे काय? जर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात Ragging सदृश्य कृत्य केले तर त्याचे होणारे दुष्परिणाम,प्रसंगी तुरुंगवासही होऊ शकतो.अशी माहिती समितीचे समन्वयक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी स्पष्ट केले,तर महाविद्यालयाचे प्राचार्य,मेजर डॉ.अशोक गिरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ,विद्यार्थ्यांना विविध चित्रपट,समाज माध्यमातून घडणाऱ्या विविध घटना व त्याचे अनुचित परिणाम याबद्दल माहिती सांगून ragging चे किती गंभीर परिणाम होतात,असे प्रसंग आपल्या महाविद्यालय घडू नयेत यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी दक्ष राहावे,असे आव्हान केले तसेच उपस्थित सर्वाना रॅगिंग न करण्याची शपथ दिली व रॅगिंग विषयांची संपूर्ण माहिती वि...

स्वातंत्र्य, समता व बंधुता वृद्धिंगत करण्याची जबाबदारी युवा पिढीची आहे " ॲड.वर्षा देशपांडे*

Image
" *स्वातंत्र्य, समता व बंधुता  वृद्धिंगत करण्याची जबाबदारी युवा पिढीची आहे "                        ॲड.वर्षा देशपांडे* .                        —--------------- मेढा : 14 ऑगस्ट 2023 ====================== " या देशात छत्रपती शिवरायांपासून महात्मा गांधी यांच्या पर्यंतच्या सर्वच महापुरुषांनी आपल्या युवा अवस्थेतच सामाजिक कार्यास सुरुवात केली. म्हणूनच आपल्याला स्वराज्य व स्वातंत्र्य प्राप्त झाले.महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा सुरु केली म्हणूनच मुली शिकून आज सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत सर्वांना समान संधी व अधिकार दिले. म्हणूनच हे स्वातंत्र्य आज आपण उपभोगत आहोत.परंतु अलीकडच्या काळात या देशाला धर्मांधता व स्त्री अत्याचाराचे ग्रहण लागले आहे.त्यातून भारतमातेला मुक्त करण्याची व   " स्वातंत्र्य, समता व बंधुता  वृद्धिंगत करण्याची जबाबदारी युवा पिढीची आहे " " असे प्रतिपादन सातारा ये...

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा!!!

Image
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा!!! मेढा दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी लीड कॉलेज कार्यक्रम अंतर्गत ग्रंथालय व ज्ञान स्त्रोत केंद्र यांच्या वतीने ग्रंथालय शास्त्राचे प्रणेते डॉ. एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. संजय ढेरे साहेब तांत्रिक सहाय्यक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सातारा हे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी उपस्थित होते.      मा.ढेरे यांनी आपल्या मनोगतात वाचनाचे महत्त्व,नेमके काय वाचावे, विद्यार्थ्यांनी कोणत्या पुस्तकातून कसे संदर्भ काढावेत तसेच आत्मचरित्र पर पुस्तके कशी वाचावीत हे सांगितले. बुद्धीला सशक्त बनवण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले. तर अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही. गिरी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन हे महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करून आपले आयुष्य बदलावे असा संदेश दिला. उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यां...

*पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस यांनी “ युज ऑफ इन्फिबनेट अँड लायब्ररी फॉर कॉम्पेटेटिव्ह एक्झाम” एक दिवशीय राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केलेली आहे.**1. विषय –INFLIBNET चे प्रमुख उपक्रम (INFLIBNET :MAJOR ACTIVITIES)* *वक्त्ते :- डॉ. सुधीर नगरकर ग्रंथपाल आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा**2. विषय –स्पर्धा परीक्षाच्या तयारीसाठी ग्रंथालयाचा वापर (“USE OF LIBRARY FOR PREPARATION OF COMPETITIVE EXAMS”)* *वक्त्ते:- श्री अतुल नगरकर ग्रंथपाल दूधसाखर महाविद्यालय बिद्री* *तारीख 16/6/2023**वेळ: सकाळी 11.00 वाजता**रजिस्ट्रेशन लिंक*https://forms.gle/s81Dar1YPkkabEg38 रजिस्ट्रेशन झाल्यानंतर खालील WhatsApp link ला जॉईन व्हावे.https://chat.whatsapp.com/HII4h2uugRQGtF7hyWzM6k ही कार्यशाळा सर्व प्राध्यापक, ग्रंथपाल व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे तेव्हा आपण आपल्या महाविद्यालयातील सर्वांना रजिस्ट्रेशन करण्यास सांगणे तसेच ही कार्यशाळा मराठी मध्ये घेण्यात येणार आहे त्याचा उपयोग आपणास नक्कीच होईल.

*पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस यांनी “ युज ऑफ इन्फिबनेट अँड लायब्ररी फॉर कॉम्पेटेटिव्ह एक्झाम” एक दिवशीय राज्यस्तरीय  ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केलेली आहे.* *1. विषय –INFLIBNET चे प्रमुख उपक्रम  (INFLIBNET :MAJOR ACTIVITIES)*        *वक्त्ते :- डॉ. सुधीर नगरकर ग्रंथपाल आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा* *2. विषय –स्पर्धा परीक्षाच्या तयारीसाठी ग्रंथालयाचा वापर (“USE OF LIBRARY FOR PREPARATION OF  COMPETITIVE EXAMS”)*        *वक्त्ते:- श्री अतुल नगरकर ग्रंथपाल दूधसाखर महाविद्यालय बिद्री*  *तारीख 16/6/2023* *वेळ: सकाळी 11.00 वाजता* *रजिस्ट्रेशन लिंक* https://forms.gle/s81Dar1YPkkabEg38  रजिस्ट्रेशन झाल्यानंतर खालील WhatsApp link ला जॉईन व्हावे. https://chat.whatsapp.com/HII4h2uugRQGtF7hyWzM6k  ही कार्यशाळा सर्व प्राध्यापक, ग्रंथपाल व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे तेव्हा आपण आपल्या महाविद्यालयातील सर्वांना रजिस्ट्रेशन करण्यास सांगणे तसेच ही कार्यशाळा मराठी मध्ये घेण्यात येणार आहे त्...

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न* ===========

Image
*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न*  ====================== मेढा : 19 मे 2023 " कोणत्याही स्पर्धेत यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते, त्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी असावी लागते त्याशिवाय यश संपादन करता येत नाही " असे मत प्रसिद्ध उद्योजक उदयसिंह चौघुले यांनी व्यक्त केले. जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे  महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उद्योजक मा. उदयसींह चौघुले हे  उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते.यावेळी उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.       याप्रसंगी प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी यांनीही आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.त्यावेळी ते म्हणाले " सातत्यपूर्ण व सुनियोजित प्रयत्न, शिस्त,प्रखर निर्णयक्षमता व जिद्द अंगी बाळगली तर आपले आयुष्य अत्यंत अनुकरणीय व दैदिप्यमान बनविण्यास मदत म...