*मेढा महाविद्यालयात “रानभाज्या महोत्सव २०२३ " उत्साहात साजरा* ======================== मेढा : 21 ऑगस्ट 2023 आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा वनस्पतीशास्त्र विभाग व तालुका कृषी विभाग जावली,मेढा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन योजना (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने,अग्रणी महाविद्यालय योजना अंतर्गत “रानभाज्या महोत्सव ” २०२३ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचे उदघाट्न या उद्घाटन मा.श्रीमती भाग्यश्री पवार – फरांदे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सातारा यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी हे होते.या प्रदर्शनासाठी उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे, कृषी सहाय्यक श्री. भानुदास चोरगे,आत्मा जावळीचे श्री.सचिन नेवसे, विभागीय संघटिका श्रीमती सुनिता राजे-घाटगे,ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे, मा. आर के. जाधव, श्री.नंदकुमार काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.आपल्या भाषणात श्रीमती भाग्यश्री पवार म्हणाल्या " आजकालच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये माणसाकडे आरोग्य व समतोल आहार घेण्यासाठी अजिबात वेळ नाही. ...