Posts

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे गुगल क्लासरूम या विषयावर कार्यशाळा संपन्न*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे गुगल क्लासरूम या विषयावर कार्यशाळा संपन्न* मेढा (ता.जावळी) - जयवंत प्रतिष्ठान संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑगस्ट २०२४ रोजी "डिजिटल क्लासरूम क्रांती: गुगल क्लासरूम हँड्स-ऑन" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. ए. व्ही. गिरी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. कार्यक्रमात उपप्रचार्य प्रा डॉ प्रमोद घाटगे हे प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे आणि मुख्य मार्गदर्शक म्हणून वायसीआयएस कॉलेज , सातारा येथील डॉ. विश्वनाथ घनवट उपस्थित होते त्यांनी कार्यशाळेमध्ये विशेष मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे आयोजन IQAC चे समन्वयक डॉ. सरंगपाणी आर. शिंदे आणि प्रणिशास्त्र विभागप्रमुख प्रा डॉ ओंकार यादव यांनी केले होते. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश शिक्षकांना गुगल क्लासरूम सारख्या अत्याधुनिक शिक्षण व्यवस्थापन प्रणालीची माहिती देणे व त्यांचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत प्र

News of ASSM Medha

Image

वैविध्यपूर्ण वाचनासाठी आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाचकांनी करणे काळाची गरज : प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी

वैविध्यपूर्ण वाचनासाठी आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाचकांनी करणे काळाची गरज : प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी मेढा/दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालात डॉ.एस आर रंगनाथान यांच्या जयंती प्रीत्यर्थ वन डे वर्कशॉप ओन इम्पोर्टन्स ऑफ रीडिंग घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गीरी यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड जोपासावी हा संदेश दिला तसेच विद्यार्थी दसेत विद्यार्थ्यांनी संदर्भ पुस्तकाचे वाचन केले पाहिजे तसेच सध्याच्या आधुनिक युगात ऑडीओ बुक्स एकले पाहिजेत तसेच माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यानी आपले ज्ञान वाढविले पाहिजे असा बहुमूल्य संदेश दिला तसेच ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मा. प्राचार्याच्या हस्ते करण्यात आले. मा. प्राचार्य यांनी आपल्या मनोगतात वाचन केले तरच आपल्या करिअर ला दिशा मिळेल “वाचाल तर वाचाल” हा संदेश दिला व ग्रंथपाल दिनाच्या शुभेछ्या दिल्या. कार्यक्रमासाठी मा.उप प्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे उपस्थित होते त्यानी आपल्या मनोगतात वाचन सवयी चे महत्त्व सांगितले आणि वाचनातील सातत्य हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ल
*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न* मेढा : 22 फेब्रुवारी 2024 " विध्यार्थांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करण्याचा विचार करावा. ध्येय निश्चित असेल तर व्यवसायात देखील नक्कीच यश मिळू शकेल. व्यवसाय करताना सर्वे करा. मार्केटची मागणी विचारात घ्या. दुसरा करतोय म्हणून आपण तोच व्यवसाय न करता त्यामध्ये काही तरी नवीन्य आणा. नोकरीच्या मागे न लागता इतरांना काम आणि नोकरी तुम्ही द्या असा व्यवसाय करा. स्पर्धेत यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते, त्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी असावी लागते त्याशिवाय यश संपादन करता येत नाही " असे मत प्रसिद्ध उद्योजक सन्मानीय वसंत फडतरे यांनी व्यक्त केले. जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उद्योजक मा. श्री वसंत फडतरे हे उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त दादासाहेब शिंदे होते त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्था

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मेढा येथील आमदार शशीकांत शिंदे महाविद्यालयातील कु.वैभवी सुर्वे हीचे यश

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मेढा येथील आमदार शशीकांत शिंदे महाविद्यालयातील कु.वैभवी सुर्वे हीचे यश —---------------------- मेढा: दिनांक ९ मार्च २०२४ सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने सातारा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत,येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशीकांत शिंदे महाविद्यालयातील बी. एस्सी. भाग १ ची विद्यार्थिनी कु. वैभवी भरत सुर्वे हिने विभागून तृतीय क्रमांक मिळवला. तिने ‘जल हेच जीवन’ या विषयावर तिचे मत अतिशय उत्कृष्ट मांडणी केली.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सातारा अंतर्गत विविध जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धा ही निबंध, चित्रकला, वक्तृत्व आणि लघुपट निर्मिती अश्या प्रकारांमध्ये कनिष्ठ व आणि वरिष्ठ गटांमध्ये घेण्यात आली.कु.वैभवी सुर्वे हिच्या या यशाबद्दल महाविद्यालायचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी, उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे तसेच सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी तिचे कौतुक व अभिनंदन केले. सुर्वे हिला रोख रक्कम,प्रशस्तीपत्र व शिल्ड देवून गौरविण्यात आले.महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.आ

बातमी

Image

*विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचा आदर्श घ्यावा**श्री. नितीन तारळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी**मेढा*: आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा आयोजित शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर अंतर्गत सातारा जिल्हा विभागीय जलतरण (पुरुष आणि महिला) स्पर्धा सातारा येथे जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी पार पडल्या या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नितीन तारळकर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उदघाटन प्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचा आदर्श घ्यावा आणि त्याप्रमाणे वाटचाल करावी असे मत व्यक्त केले.सदर स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना श्री नितीन तारळकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करताना कष्ट, चिकाटी आणि अचूक प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.अध्यक्षस्थानी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा चे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध उदाहरणे देत विध्यार्थी दशेत सुनियोजित सराव व मेहनत करणे अनिवार्य असल्याचे नमूद केले. तसेच या प्रसंगी बोलताना त्यांनी जलतरणपटू अमेरिकन ऑलिंपिक खेळाडू मायकेल फेल्प्स व विरधवल खाडे , यांचे उदाहरण देत त्याप्रमाणे वाटचाल करण्याचे आवाहन केले.सदर स्पर्धेसाठी पंधरा महाविद्यालयातून सुमारे साठ विध्यार्थी विविध जलतरण प्रकारात सहभागी झाले होते.कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे सातारा विभागीय क्रीडा परिषद च्या सचिव श्रीमती वैशाली खाडे जेष्ठ प्रा .डॉ.दीपक डांगे ,प्रा. बाळासाहेब भोसले उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार डॉ संजय भोसले यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन प्रा. प्रकाश जवळ यांनी केले.सदर कार्यक्रमांस विविध महाविद्यालयातील संघ व्यवस्थापक आणि बहुसंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

Image
*विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचा आदर्श घ्यावा* *श्री. नितीन तारळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी* *मेढा*: आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा आयोजित शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर अंतर्गत सातारा जिल्हा विभागीय जलतरण (पुरुष आणि महिला) स्पर्धा सातारा येथे जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी पार पडल्या या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नितीन तारळकर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  उदघाटन प्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचा आदर्श घ्यावा आणि त्याप्रमाणे वाटचाल करावी असे मत व्यक्त केले. सदर स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी  बोलताना श्री नितीन तारळकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करताना कष्ट, चिकाटी आणि अचूक प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. अध्यक्षस्थानी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा चे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध उदाहरणे देत विध्यार्थी दशेत सुनियोजित सराव व मेहनत करणे अनिवार्य असल्याचे नमूद केले. तसेच या प्रसंगी बोलताना त्यांनी जलतरणपटू   अमेरिकन ऑलिंपिक खेळाडू