Friday, 22 September 2023

" *महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विध्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे व अनन्यसाधारण अशा स्वरूपाचे असते*"*प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी*==========================मेढा :

" *महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विध्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे व अनन्यसाधारण अशा स्वरूपाचे असते*"
*प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी*
==========================
मेढा :22/9/2023
" महाविद्यालयाच्या जडण घडणीत माजी विद्यार्थी मंडळाची भूमिका अत्यंत महत्वाची असून,माजी विद्यार्थ्यानी महाविद्यालयाच्या सर्वांगिण विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे. कारण या विध्यार्थ्यांचे योगदान हे महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी अंत्यत महत्वाचे असते " असे प्रतिपादन प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही.गिरी यांनी केले.आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या माजी विध्यार्थी मंडळाच्या वतीने, महाविद्यालयात विध्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते.त्या प्रसंगी प्राचार्य डॉ.अशोक गिरी आपल्या अध्यक्षीय भाषणावेळी बोलत होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे,नॅक समितीचे समन्वयक प्रा.अमेय देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ.गिरी सर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, " महाविद्यालयातून विशेष प्राविण्य प्राप्त करून आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या,तसेच उच्च पदावर कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यानी, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करावे आणि आपल्या महाविद्यालयाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करावा "असे आवाहन त्यांनी यावेळी केले.सदर मेळाव्यास संबोधित करताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महाविद्यालयात  राबविले जात असलेले विविध उपक्रम आणि उपलब्ध भौतिक सुविधा याबाबात माहिती दिली. नजिकच्या काळात महाविद्यालयाचे नॅक समिती  कडून मूल्यांकन होणार असल्याने   माजी विद्यार्थ्यानी महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध रुपात आपले विशेष योगदान द्यावे असे यावेळी आवाहन केले.
माजी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा व त्यांच्याकडील विविध कौशल्यांचा  फायदा भावी पिढीतील विध्यार्थ्यांना व्हावा, तसेच महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण विकासामध्ये माजी विद्यार्थ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान मिळावे या उद्देशाने सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यामध्ये नॅक समितीचे समन्वयक प्रा.अमेय देसाई यांनी नॅक मूल्यांकनला माजी विध्यार्थी मंडळ सदस्यांनी कसे सामोरे जावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.तसेच माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष ॲड. श्री.अनुप लकडे, उपाध्यक्ष श्री. सुर्यकांत पवार, सलीम डांगे, शुभम लोखंडे,प्रशांत लिंगडे या विद्यार्थ्यानी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक डॉ. संजय धोंडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रा. आनंद साठे यांनी सूत्रसंचालन केले.  मेळाव्यास ५० हून अधिक माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी प्रा.शंकर गेजगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Tuesday, 29 August 2023

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न*.मेढा : 29 ऑगस्ट 2023जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित ,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्ह्याचे पाहिले आयर्नमन ,मेढा येथील सुप्रसिध्द धन्वंतरी डॉ.सुधीर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयात स्पोर्ट्स बुलेटिन हा उपक्रम मान्यवरांच्या हस्ते सुरू करण्यात आला. त्यानंतर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजनकरण्यात आले.त्यानंतर डॉ.सुधीर पवार यांनी " खेळाडूंचे आरोग्य आणि आहार " या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले,खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, " चांगल्या आरोग्यासाठी आहार महत्वाचा असतो.तुम्ही जर खेळाडू असाल तर तुम्ही आपल्या आहाराबाबत खूप जागरूक असणे आवश्यक आहे.चांगल्या आहारामुळे तुमची खेळातील कामगिरी सुधारण्यास मदत होऊ शकते.कोणत्याही खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी करण्यात सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे आहार.कारण योग्य आहारावरच खेळाडूंचे वजन,शरीरातील चरबीचे,पाण्याचे प्रमाण,स्नायूची,श्वसनाची,आणि हृदयाची कार्यक्षमता आणि ताकत अवलंबून असते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ.मेजर अशोक व्ही.गिरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की," खेळाडूंनी आहारात अचानक बदल करू नये,जो आहार सुरुवातीपासून तुम्ही घेता,तोच कायम ठेवला पाहिजे,प्रत्येक खेळाडूने शारीरिक क्षमते बरोबरच आहाराला महत्व आहे " असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख जिमखाना विभागप्रमुख प्रा.प्रमोद चव्हाण यांनी केले.तर सूत्रसंचालन प्रा.शंकर गेजगे यांनी केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,खेळाडू व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. उल्हास जाधव यांनी मानले.

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे राष्ट्रीय क्रीडा दिन  संपन्न*.
मेढा : 29 ऑगस्ट 2023
जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित ,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे जयंतीनिमित्त  राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्ह्याचे पाहिले आयर्नमन ,मेढा येथील सुप्रसिध्द धन्वंतरी डॉ.सुधीर पवार  यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते.
        कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयात स्पोर्ट्स बुलेटिन हा उपक्रम मान्यवरांच्या हस्ते सुरू करण्यात आला. त्यानंतर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन
करण्यात आले.त्यानंतर डॉ.सुधीर पवार यांनी " खेळाडूंचे आरोग्य आणि आहार " या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले,खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, " चांगल्या आरोग्यासाठी आहार महत्वाचा असतो.तुम्ही जर खेळाडू असाल तर तुम्ही आपल्या आहाराबाबत खूप जागरूक असणे आवश्यक आहे.चांगल्या आहारामुळे तुमची खेळातील कामगिरी सुधारण्यास मदत होऊ शकते.कोणत्याही खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी करण्यात सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे आहार.कारण योग्य आहारावरच खेळाडूंचे वजन,शरीरातील चरबीचे,पाण्याचे प्रमाण,स्नायूची,
श्वसनाची,आणि हृदयाची कार्यक्षमता आणि ताकत अवलंबून असते.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ.मेजर अशोक व्ही.गिरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की,
" खेळाडूंनी आहारात अचानक बदल करू नये,जो आहार सुरुवातीपासून तुम्ही घेता,तोच कायम ठेवला पाहिजे,प्रत्येक खेळाडूने शारीरिक क्षमते बरोबरच आहाराला महत्व आहे " असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.       
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख जिमखाना विभागप्रमुख प्रा.प्रमोद चव्हाण यांनी केले.तर सूत्रसंचालन प्रा.शंकर गेजगे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,खेळाडू व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. उल्हास जाधव यांनी मानले.

Tuesday, 22 August 2023

मेढा महाविद्यालयात “रानभाज्या महोत्सव २०२३ " उत्साहात साजरा*

*मेढा महाविद्यालयात “रानभाज्या महोत्सव २०२३ " उत्साहात साजरा*
========================
मेढा : 21 ऑगस्ट 2023
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा  वनस्पतीशास्त्र विभाग व तालुका कृषी विभाग जावली,मेढा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन योजना (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने,अग्रणी महाविद्यालय योजना अंतर्गत  “रानभाज्या महोत्सव ” २०२३ आयोजित करण्यात आला होता.          या महोत्सवाचे उदघाट्न या उद्घाटन मा.श्रीमती भाग्यश्री पवार – फरांदे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सातारा यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी हे होते.या प्रदर्शनासाठी उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे, कृषी सहाय्यक श्री. भानुदास चोरगे,आत्मा जावळीचे श्री.सचिन नेवसे,
विभागीय संघटिका श्रीमती सुनिता राजे-घाटगे,ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे, मा. आर के. जाधव, श्री.नंदकुमार काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.आपल्या भाषणात श्रीमती भाग्यश्री पवार म्हणाल्या " आजकालच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये माणसाकडे आरोग्य व समतोल आहार घेण्यासाठी अजिबात वेळ नाही. याचाच परिणाम म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या बाबतीत समस्या वाढत आहेत. याचा फायदा  घेऊन विदेशी कंपन्या आपली निरनिराळी उत्पादने बाजारात विकत आहेत आणि युवा पिढी याचा अंधाधुंदपणे वापर करत आहेत. वेगवेगळी आकर्षक जंक आणि फास्ट-फूड मुळे भविष्यात आरोग्याच्या बाबतीत उद्भवणाऱ्या नव्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता निसर्गाशी नाते जोडून जंक फूड ला बगल देऊन आपला परंपरागत वारसा जपण्याचा प्रयत्न करायला हवा " अशा शब्दात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनीही मनोगत व्यक्त केले.त्यावेळी ते म्हणाले " या महाविद्यालयातील विध्यार्थी ग्रामीण भागातील रहिवासी कौशल्याचा वापर करून रानभाजी उत्सवाचे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून व्यावसायिक व  रोजगाराच्या संधी निर्माण करता येईल. स्व: अनुभवातून रोजगाराच्या संधी कश्या आत्मसात कराव्यात तसेच संशोधन करण्यात विद्यार्थ्यांनी अधिक भर द्यावा " असे आवाहन त्यांनी केले.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी  या उपक्रमासाठी जवळपास ४२ प्रकारच्या रान भाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थ तयार करून आणले होते.यात शेवगा, कुर्डू, केना, कार्टुली, उंबर, ढेसा, भालगा, भारंगी चीचुरटे, शेंडवाल, मोहर, टाकाळा, माट, केळ फुले, कडीपत्ता, आळू, भोकर, मोरचौडा, उडीद पाने, ओवा, चुका, घोळ, बरका, पात्री या सारख्या अनेक वनस्पतीनं पासून बनविलेले पदार्थ विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणले होते. याच बरोबर त्यांची माहिती म्हणजेच त्यांचे शास्त्रीय नावं, कुळ तसेच पदार्थ बनविण्याच्या कृतींचीही माहिती त्यांनी दिली.याशिवाय  कृषी विभाग जावली यांच्या वतीने रानभाज्यांची विक्री करण्यासाठी शेतकरी बचत गटांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. या मध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्यांची सुद्धा खरेदी- विक्री झाली. खरेदी बरोबरच रानभाज्यांची माहिती फलकांच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी ग्राहकांना दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मा. श्री. संजय घोरपडे (तालुका कृषि अधिकारी, जावली) यांनी रानभाज्यांचे महत्व विषद केले. मा. श्री. श्रीरंग शिंदे सेवा निवृत्त वनक्षेत्रपाल कास पठार यांनी त्यांच्या अनुभवातून मिळालेल्या विविध रानभाज्यांचे महत्व सांगितले.प्रदर्शनात विद्यार्थ्यानी बनविलेल्या रानभाज्यांच्या पाककृतींचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतला तसेच, शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणलेल्या भाज्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाली. प्रदर्शनात आणलेल्या रानभाज्यांच्या पाककृती साठी विद्यार्थ्यांना तसेच, प्रगतीशील शेतकरी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिप्रत देऊन गौरव करण्यात आले.अग्रणी महाविद्यालय योजना समन्वयक प्रा.शंकर गेजगे आणि प्रा.धनश्री देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.या उपक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर  कर्मचारी   तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, महाविद्यालयाचे विद्यार्थी, पत्रकार यांनी उपस्थित राहून संपूर्ण सहकार्य केले. कार्यक्रमाचे शेवटी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उदय पवार यांनी आभार मानले.

Saturday, 19 August 2023

विद्यार्थी दशेत चरित्र संवर्धन करावे व रॅगिंग सारख्या वाईट प्रवृत्तीना थारा देऊ नये*

* विद्यार्थी दशेत चरित्र संवर्धन करावे व रॅगिंग सारख्या वाईट प्रवृत्तीना थारा देऊ नये* 

*विधिज्ञ .अनुप लकडे*

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा या महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध समिती आणि लैंगिक छळ प्रतिबंध समिती यांच् या संयुक्त विद्यमाने 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या कालावधीत अँटी रॅगिंग सप्ताह साजरा करण्यात आला, 14 ऑगस्ट 2023 रोजी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना Ragging म्हणजे काय? जर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात Ragging सदृश्य कृत्य केले तर त्याचे होणारे दुष्परिणाम,प्रसंगी तुरुंगवासही होऊ शकतो.अशी माहिती समितीचे समन्वयक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी स्पष्ट केले,तर महाविद्यालयाचे प्राचार्य,मेजर डॉ.अशोक गिरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ,विद्यार्थ्यांना विविध चित्रपट,समाज माध्यमातून घडणाऱ्या विविध घटना व त्याचे अनुचित परिणाम याबद्दल माहिती सांगून ragging चे किती गंभीर परिणाम होतात,असे प्रसंग आपल्या महाविद्यालय घडू नयेत यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी दक्ष राहावे,असे आव्हान केले तसेच उपस्थित सर्वाना रॅगिंग न करण्याची शपथ दिली व रॅगिंग विषयांची संपूर्ण माहिती विशद केली ,दिनांक 18 ऑगस्ट ,2023 रोजी ragging प्रतिबंध संदर्भातील पोस्टर प्रदर्शन महाविद्यालयात आयोजित करण्यात आले,यामध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपला उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला. त्याचप्रमाणे या सप्ताहाची सांगता मेढा न्यायालयातील विधीज्ञ मा. अनुप लकडे यांच्या व्याख्यानाने झाली. मा.अनुप लकडे यांनी ragging संदर्भातील विविध कायद्यांची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मेजर अशोक व्ही.गिरी यांनी भूषविले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.गायत्री जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार इतिहास विभाग प्रमुख प्रा.शंकर गेजगे यांनी मानले.कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.प्रमोदजी घाटगे आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी - विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Monday, 14 August 2023

स्वातंत्र्य, समता व बंधुता वृद्धिंगत करण्याची जबाबदारी युवा पिढीची आहे " ॲड.वर्षा देशपांडे*

" *स्वातंत्र्य, समता व बंधुता  वृद्धिंगत करण्याची जबाबदारी युवा पिढीची आहे "
                       ॲड.वर्षा देशपांडे*
.                        —---------------
मेढा : 14 ऑगस्ट 2023
======================

" या देशात छत्रपती शिवरायांपासून महात्मा गांधी यांच्या पर्यंतच्या सर्वच महापुरुषांनी आपल्या युवा अवस्थेतच
सामाजिक कार्यास सुरुवात केली.
म्हणूनच आपल्याला स्वराज्य व स्वातंत्र्य प्राप्त झाले.महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा सुरु केली म्हणूनच मुली शिकून आज सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत सर्वांना समान संधी व अधिकार दिले. म्हणूनच हे स्वातंत्र्य आज आपण उपभोगत आहोत.परंतु अलीकडच्या काळात या देशाला धर्मांधता व स्त्री अत्याचाराचे ग्रहण लागले आहे.त्यातून भारतमातेला मुक्त करण्याची व   " स्वातंत्र्य, समता व बंधुता  वृद्धिंगत करण्याची जबाबदारी युवा पिढीची आहे " " असे प्रतिपादन सातारा येथील जेष्ठ सामाजीक कार्यकर्त्या ॲड.वर्षा देशपांडे यांनी केले.लेक लाडकी अभियान,महाराष्ट्र राज्य,दलित महिला विकास मंडळ,सातारा आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय
मेढा, यांच्या अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने,राष्ट्रीयता जागर अभियान,सातारा "आरोग्यदायी युवकांसाठी " या उपक्रमा अंतर्गत "व्याख्यान व मानवी साखळीचे " आयोजन करण्यात आले होते.
त्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते तर प्रा.संजीव बोंडे,ॲड.चैत्रा व्ही. एस. व उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे, मिनाज सय्यद,ॲड.शैलजा जाधव,केतन मोहिते व कैलास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड.वर्षा देशपांडे पुढे म्हणाल्या " ९ ऑगस्ट हा क्रांती दिन,१२ ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिन आणि १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन.
९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट "राष्ट्रीयता जागर अभियान" अंतर्गत आरोग्यदायी युवकांसाठी आपण विविध उपक्रम घेत आहोत.त्याचाच भाग म्हणजे हा आजचा उपक्रम आहे.आपण देशाचा ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना,सध्यस्थिती ही फार भयावह आहे.आज आपल्या देशातील स्त्रिया या सुरक्षित नाहीत.पुरुषसत्ताक संस्कृतीचे रक्षक त्यांच्यावर दिवसा ढवळ्या अन्याय अत्याचार करत आहेत. धर्माच्या नावाखाली इथल्या दलित व अल्पसंख्यांक समाजाला वेठीस धरले जात आहे.यातून या सर्वांची मुक्ती झाली तरच आपल्या स्वातंत्र्याला अर्थ उरणार आहे.हे स्वातंत्र्य जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर आता युवकांनीच आपलं पाऊल पुढं टाकायला हवं " असं त्यांनी आवाहन करून स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या 
        त्यानंतर प्रा.संजीव बोंडे यांनी "राष्ट्रीयता जागर अभियान कशासाठी? " या विषयावर मांडणी केली. त्यावेळी त्यांनी लोकशाहीची व्याख्या सांगून,स्वातंत्र्य,
समता,शासन,प्रशासन,न्यायपालिका,
व पत्रकारिता या मूल्यांचा विस्तृत अर्थ सांगितला.तसेच सध्य परिस्थितीत ही मूल्ये कशाप्रकारे पायदळी तुडवली जात आहेत हे सांगून युवकांनी आपली लोकशाही वाचवण्यासाठी काय काय करावे याविषयींची अनमोल माहीती दिली.
  तर द्वितीय सत्रात ॲड.चैत्रा व्ही एस.
यांनी " स्वस्थ तरुण भारतासाठी तंबाखूपासून मुक्ती " याविषयावर सखोल मार्गदर्शन केले.आजच्या सिनेमा,टीव्ही व समजमाध्यमातून येणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती या युवापिढीचे किती नुकसान करत आहेत,या सर्वच पदार्थांमुळे कँसर सारख्या जर्जर आजाराला आमंत्रण मिळत असून, युवकांनी या व्यसनांच्या आहारी न जाता.आपले आरोग्य आजारमुक्त ठेवावे.देशाचा युवक जर सशक्त असेल तर देश सशक्त व बलशाली बनेल. अशा स्वस्थ तरुण भारतासाठी तंबाखू मुक्ती करावी.युवकांनी स्वतः निर्व्यसनी राहून समाजात व आपल्या कुटुंबात व्यसनमुक्तीचा प्रचार करावा.असे आवाहन केले.
    अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी सर यांनीही अनमोल मार्गदर्शन केले.ते आपल्या भाषणात म्हणाले की, " स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी
आपल्या प्राणाची आहुती दिली,त्या सर्वांच्या आचार-विचार व बलीदानाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपला देश व येथील लोकशाही टिकवण्याची जबाबदारी युवकांवर आहे.त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम व्यसनमुक्त राहून,आपल्या महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाबरोबरच या सर्व महापुरुषांनी आपल्यासाठी जो जाज्वल्यपूर्ण इतिहास निर्माण करून ठेवला आहे. त्याचा वारसा पुढे चालवावा.युवकांनी कोणत्याही व्यसनांच्या आहारी न जाता.आपले तन व मन सशक्त व मजबूत राखावे व या बलशाली देशाचा मान राखावा " असा उपदेश केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मराठी विभाग प्रमुख प्रा.आनंद साठे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अग्रणी महाविद्यालयांचे समन्व्यक प्रा.डॉ.संजय धोंडे यांनी सूत्रसंचालन केले.या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.विनोद पवार प्रा.संजय पाटील,प्रा.संध्या निकम,प्रा.शिंदे-कदम
मॅडम तसेच विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मराठी विभागातील विध्यार्थी तसेच आबासाहेब देशमुख, युवराज विभुते व अविनाश मदने यांनी खूपच परिश्रम घेतले.शेवटी समन्वयक प्रा. एस. एन. गेजगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.या मुख्य कार्यक्रमानंतर मानवी साखळी करण्यात आली.
यामध्ये सर्व विद्यार्थी व जवळवाडी येथील महिलामंडळाच्या सर्व सदस्य महिला,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या जनजागार मानवी साखळीत सहभागी झाले होते..
===============

Saturday, 12 August 2023

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा!!!

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा!!!

मेढा दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी लीड कॉलेज कार्यक्रम अंतर्गत ग्रंथालय व ज्ञान स्त्रोत केंद्र यांच्या वतीने ग्रंथालय शास्त्राचे प्रणेते डॉ. एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. संजय ढेरे साहेब तांत्रिक सहाय्यक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सातारा हे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी उपस्थित होते.
     मा.ढेरे यांनी आपल्या मनोगतात वाचनाचे महत्त्व,नेमके काय वाचावे,
विद्यार्थ्यांनी कोणत्या पुस्तकातून कसे संदर्भ काढावेत तसेच आत्मचरित्र पर पुस्तके कशी वाचावीत हे सांगितले.
बुद्धीला सशक्त बनवण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले. तर अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही. गिरी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन हे महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करून आपले आयुष्य बदलावे असा संदेश दिला. उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी ग्रंथपाल दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि ग्रंथालयाच्या विकासासाठी सर्व परीने मदत केली जाईल याची ग्वाही दिली.
     कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथालयामध्ये सुरू केलेल्या क्यू आर कोड गॅलरीचे उद्घाटन प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी व प्रमुख पाहुणे श्री संजयजी ढेरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लीड कॉलेजचे समन्वयक प्रा. शंकर गेजगे यांनी केले.तर सूत्रसंचालन व स्वागत डॉ.सुधीर नगरकर यांनी केले.तसेच पाहुण्यांचा परिचय प्रा.प्रमोद चव्हाण यांनी करून दिला.या कार्यक्रमासाठी श्री .वसंत धनवडे व अविनाश मदने यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वृंद विद्यार्थी उपस्थित होते.प्रा. डॉ. संग्राम शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

Wednesday, 14 June 2023

*पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस यांनी “ युज ऑफ इन्फिबनेट अँड लायब्ररी फॉर कॉम्पेटेटिव्ह एक्झाम” एक दिवशीय राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केलेली आहे.**1. विषय –INFLIBNET चे प्रमुख उपक्रम (INFLIBNET :MAJOR ACTIVITIES)* *वक्त्ते :- डॉ. सुधीर नगरकर ग्रंथपाल आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा**2. विषय –स्पर्धा परीक्षाच्या तयारीसाठी ग्रंथालयाचा वापर (“USE OF LIBRARY FOR PREPARATION OF COMPETITIVE EXAMS”)* *वक्त्ते:- श्री अतुल नगरकर ग्रंथपाल दूधसाखर महाविद्यालय बिद्री* *तारीख 16/6/2023**वेळ: सकाळी 11.00 वाजता**रजिस्ट्रेशन लिंक*https://forms.gle/s81Dar1YPkkabEg38 रजिस्ट्रेशन झाल्यानंतर खालील WhatsApp link ला जॉईन व्हावे.https://chat.whatsapp.com/HII4h2uugRQGtF7hyWzM6k ही कार्यशाळा सर्व प्राध्यापक, ग्रंथपाल व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे तेव्हा आपण आपल्या महाविद्यालयातील सर्वांना रजिस्ट्रेशन करण्यास सांगणे तसेच ही कार्यशाळा मराठी मध्ये घेण्यात येणार आहे त्याचा उपयोग आपणास नक्कीच होईल.

*पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस यांनी “ युज ऑफ इन्फिबनेट अँड लायब्ररी फॉर कॉम्पेटेटिव्ह एक्झाम” एक दिवशीय राज्यस्तरीय  ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केलेली आहे.*

*1. विषय –INFLIBNET चे प्रमुख उपक्रम  (INFLIBNET :MAJOR ACTIVITIES)*
       *वक्त्ते :- डॉ. सुधीर नगरकर ग्रंथपाल आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा*
*2. विषय –स्पर्धा परीक्षाच्या तयारीसाठी ग्रंथालयाचा वापर (“USE OF LIBRARY FOR PREPARATION OF  COMPETITIVE EXAMS”)*
       *वक्त्ते:- श्री अतुल नगरकर ग्रंथपाल दूधसाखर महाविद्यालय बिद्री*

 *तारीख 16/6/2023*

*वेळ: सकाळी 11.00 वाजता*

*रजिस्ट्रेशन लिंक*
https://forms.gle/s81Dar1YPkkabEg38 
रजिस्ट्रेशन झाल्यानंतर खालील WhatsApp link ला जॉईन व्हावे.
https://chat.whatsapp.com/HII4h2uugRQGtF7hyWzM6k 

ही कार्यशाळा सर्व प्राध्यापक, ग्रंथपाल व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे तेव्हा आपण आपल्या महाविद्यालयातील सर्वांना रजिस्ट्रेशन करण्यास सांगणे तसेच ही कार्यशाळा मराठी मध्ये घेण्यात येणार आहे त्याचा उपयोग आपणास नक्कीच होईल.