Thursday, 12 January 2023

*स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणास्त्रोतातून युवकांनी ध्येयप्राप्ती करावी: प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी*

*स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणास्त्रोतातून युवकांनी ध्येयप्राप्ती करावी: प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी*

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, इतिहास विभाग व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विशेष व्याख्यान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक डॉ. संग्राम शिंदे हे होते त्यांनी असे प्रतिपादन केले की, स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्र हे आहे. त्यांनी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व स्वीकारल्यानंतर स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले. लहानपणापासूनच त्यांनी व्यायाम खेळ अशा विविध उपक्रमात सहभाग घेतला होता. सामाजिक आणि धार्मिक बाबतीत पुरोगामी विचारांचे आणि दयाळू स्वभावाचे होते. ते पाश्चात्य गुढवादाने प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनी पाश्चात्त्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनाचा परिचय करून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. याशिवाय स्वामी विवेकानंद यांच्या विविध घटनांची माहिती दिली तसेच राजमाता जिजाऊ या स्वराज्याच्या संकल्पक असून त्यांनी स्वराज्याच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका निभावून कुटुंबाबरोबर स्वराज्याची जबाबदारी निष्ठेने सांभाळली.
 कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असे प्रतिपादन केले की, स्वामी विवेकानंद यांनी जागतिक धर्म परिषदेत आपले विचार मांडून वैदिक धर्माला जागतिक धर्म परिषदेत अधिष्ठान मिळवून दिले. याप्रमाणेच त्यांनी उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असा संदेश दिला. या संदेशातून प्रेरणा घेऊन युवकांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे कष्ट करून आपलं वेगळे अस्तित्व निर्माण करावे म्हणजे देशाचाही नावलौकिक वाढण्यास मदत होईल तसेच राजमाता जिजाऊ यांनी देखील प्राप्त परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकीचा विचार न करता स्वराज्याची निर्मिती करून रयतेच्या मनात स्वाभिमान जागृत केला. त्यामुळे स्वराज्य हे आपले आहे याची जाणीव होऊन अनेक मावळ्यांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी आपले प्राण दिले. अशा या थोर महापुरुषांच्या विचारांचा स्वीकार करुन आपले ध्येय प्राप्त करावे
 या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट सातारा च्या संचालिका सौ. दिपाली देशमुख, श्री मयूर देशमुख आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे शिक्षक, 30 विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त या इन्स्टिट्यूट च्या सहकार्याने महाविद्यालयातील 120 विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभले.
 प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय भोसले यांनी केले तर आभार इतिहास विभाग प्रमुख प्रा. शंकर गेजगे यांनी मानले.

Thursday, 5 January 2023

**तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत आ . शशिकांत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश*मेढा . .

**तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत आ . शशिकांत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश*

मेढा . दि . ४ , धुंदीबाबा विद्यालय विद्यानगर सोनगाव या ठिकाणी जावली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धा यशस्वी रित्या पार पडल्या.
शिक्षण विभाग -पंचायत समिती जावली मेढा यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या स्पर्धेत आ . शशिकांत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयने तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला .
   तृतीय क्रमांक इयत्ता १२ वी सायन्स मधील विद्यार्थी वेदांत जगताप व क्रिश माने यांनी होलोग्राम ( थ्रिडी इमेज ) हा प्रकल्प तयार केला होता त्यांची जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे तर उत्तेजनार्थ क्रमांक रेन वॉटर हार्वेस्टिंग या प्रकल्पाला मिळाला . इयत्ता ११वी च्या साहिल ससाणे व मंथन जगताप यांनी हा प्रकल्प तयार केला होता .
सदर विद्यार्थ्यांना विज्ञान विभागाच्या श्रीमती प्रा .ज्योती कदम यांनी मार्गदर्शन केले .
 गटविकास अधिकारी श्री रमेश काळे व गटशिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना तोडरमल व शिक्षण विस्तार अधिकारी श्री . चंद्रकांत कर्णे साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉपी देऊन विद्यार्थांना गौरविण्यात आले .
विद्यार्थ्यांच्या या यशाबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ . अशोक गिरी यांनी व उपप्राचार्य डॉ प्रमोद घाटगे यांनी अभिनंदन केले .

Wednesday, 28 December 2022

सेवागिरी युवा महोत्सवातमेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय व जयवंत प्रतिष्ठान हुमगाव या दोन्ही संघाचा पथनाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक...

सेवागिरी युवा महोत्सवात
मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय व जयवंत प्रतिष्ठान हुमगाव या दोन्ही संघाचा पथनाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक...
=================
मेढा -
प. पू. सेवागिरी महाराज पुसेगाव,यांच्या अमृतमहोत्सवी
यात्रानिमित्त,श्री सेवागिरी ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेला नववा जिल्हास्तरीय युवा महोत्सव नुकताच उत्सवात पार पडला.या महोत्सवात घेण्यात आलेल्या पथनाट्य स्पर्धेत, येथील जयवंत प्रतिष्ठान आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या,विध्यार्थी कलाकारांनी सादर केलेल्या पथनाट्यांचे विभागून द्वितीय क्रमांक आले. जयवंत प्रतिष्ठान हुमगाव आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केल्या बद्दल दोन्ही विजेत्या संघांना रोख रक्कम,चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.विध्यार्थी कलाकारांनी तसेच जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संघाने,मिळवलेल्या या यशाबद्दल,संस्थेचे अध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, सचिव सौ. वैशालीताई शिंदे,सर्व विश्वस्त आणि महाविद्यालयाचे प्राचार्य,मेजर डॉ.अशोक गिरी,उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे तसेच सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयातील विध्यार्थ्यांनी दोन्ही संघांचे,
अभिनंदन व कौतुक केले.सदर विद्यार्थी कलाकारांना डॉ.ओमकार यादव, प्रा.पी.डी.पाटील,
प्रा.धनश्री देशमुख यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले होते.

Sunday, 18 December 2022

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी साकारला भव्य वनराई बंधारा*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी साकारला भव्य वनराई बंधारा* आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर नुकतेच मौजे गवडी ता. जावली येथे 'युवकांचा ध्यास ग्राम- शहर विकास' 
हे ब्रीदवाक्य घेऊन संपन्न झाले. या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या 100 स्वयंसेवक -स्वयंसेविका यांनी मौजे गवडी येथील वेण्णा नदीवर वनराई बंधारा बांधला. हा बंधारा जवळपास 50 फूट लांब 5 फूट रुंदीचा असून त्याची उंची सहा फुटापर्यंत आहे. सदर बंधारा बांधकाम करण्यासाठी गवडी गावचे सरपंच श्री. राजाराम खुडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थानीही सहभाग घेतला तसेच तालुका कृषी अधिकारी, मेढा यांचे या वनराई बंधारा उभरणीत विशेष तांत्रिक सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. सदर बंधारा बांधकामासाठी 1200 सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या , तसेच पाच ट्रॉली काळी माती, वाळू इ.साहित्य वापरण्यात आले आहे. या बंधारामध्ये 300 मीटर लांब आणि चार फुटापर्यंत पाण्याची पातळी वाढली असून त्यामुळे गवडी गावाला या उन्हाळ्यात पाण्याचा विपुल साठा होणार आहे. या बंधाऱ्यालगत असलेल्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार असल्याने पाणी टंचाई पासून मुक्ती मिळेल अशी अपेक्षा गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
या बंधारा बांधकामासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी व उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी यांनी असे प्रतिपादन केले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या श्रम संस्करांबरोबरच सर्व विद्यार्थ्याना सामाजिक बांधिलकी जपणूक संदर्भात शिक्षण देणे गरजेचे आहे. म्हणूनच अशा प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात आमचे महाविद्यालय कायम अग्रेसर राहील.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.संजय भोसले आणि प्रा.डॉ.उदय पवार तसेच प्रा.सौ.धनश्री देशमुख, प्रा.डॉ. सारंगपाणी शिंदे,प्रा. प्रकाश जवळ आदींनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

Sunday, 11 December 2022

*जिल्हास्तरीय शालेय क्रिडा बॉक्सिंग स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे जू . कॉलेजचे यश*सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत १९ वर्षाखालील वयोगटात *पार्थ रमेश शिंगटे* याने प्रथम क्रमांक मिळविला व त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली .आज १० ऑक्टोबर रोजी झालेल्या स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडीयम सातारा या ठिकाणी सुरळीत पार पडल्या . स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री . जाधव टी .ए .व शारीरिक शिक्षक संचालक प्रा . प्रमोद चव्हाण हे होते .सदर विद्यार्थ्यांचे कॉलेजचे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी अभिनंदन केले व त्यांना विभागीय स्पर्धेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

*जिल्हास्तरीय शालेय क्रिडा बॉक्सिंग स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे जू . कॉलेजचे यश*

सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत १९ वर्षाखालील वयोगटात *पार्थ रमेश शिंगटे* याने प्रथम क्रमांक मिळविला व त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली .आज १० ऑक्टोबर रोजी झालेल्या स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडीयम सातारा या ठिकाणी सुरळीत पार पडल्या .
 स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री . जाधव टी .ए .व शारीरिक शिक्षक संचालक प्रा . प्रमोद चव्हाण हे होते .सदर विद्यार्थ्यांचे कॉलेजचे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी अभिनंदन केले व त्यांना विभागीय स्पर्धेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

Thursday, 8 December 2022

मित्रपुस्तकांसारखे मित्र नाही. पुर्वी आपल्याकडचे पुस्तक दुसर्‍याला वाचायला दिले की परत यायची शक्यता कमी होती. पण आता ही PDF ebook पुस्तके तुम्ही सर्वा मित्र आणि नातेवाईकांना मेल किंवा व्हाट्सऍपवर देऊनही तुमच्याचकडे रहातात. अगदी ज्ञानासारखीच. ज्ञान वाटल्याने वाढते. दुःख वाटल्याने कमी होते. दुःख कमी करण्याचा दुसरा उपाय म्हणजे ज्ञान होय. दुःखाचे कारण आणि उपाय समजला की दुःख कमी होते. जीवनात आनंद येतो.पुर्वी आनंद नावाचा सिनेमा फ़ार गाजला होता. त्यात हिरो राजेश खन्नाला कॅन्सर होतो आणि तो मरणार हे नक्की होते. सिनेमा फ़ार चांगला होता खरे, पण त्यातून एक चुकीचा संदेश जनमनात कोरला गेला. कॅन्सर म्हणजे मरण. पण हे खरे नाही. कॅन्सर बरा होतो. याबद्दलच्या चुकीच्या समजुती काढून टाकणारे एक पुतक आम्ही आपणाला देत आहोत. इंग्लंडमधील प्रसिद्ध कॅन्सरतज्ञ लेखकांनी ते लिहिलेले आहे. हे पुस्तक वाचा आणि सर्वांना वाचायला द्या. दुसरे एक पुस्तक आहे, विरहिणी. नववीमधे शिकणार्‍या एका मुलीने संस्कृतमधे लिहिलेले हे दीर्घकाव्य आहे. अतिशय सुंदर आहे.लहान मुलांसाठी एक मजेदार पुस्तक आहे. लाडोबा. बाबा आणि मुलगा यांच्यातील नात्यावर हे छान छान पुस्तक वाचा आणि वाचायला द्या.इंग्लिशमधील सुप्रसिद्ध लेखक समरसेट मॉम यांच्या सहा कथांचा उत्कृष्ट अनुवाद वाचायला विसरू नका. तसेच एका स्त्रीच्या अधोगतीची कहाणी सांगणारी कादंबरी वारांगना वाचनीय आहे. वारांगना अंकुश शिंगाडे कादंबरीhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/varangana_ankush_shingade.pdfविरहिणी निकिता पाटील संस्कृत काव्यhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/virahini_nikita_patil.pdfकॅन्सरचा परिचय नील सरोज सहस्रबुधे माहितीhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/cancer__neil_saroj_sahasrabuddhe.pdfलाडोबा नितीन मोरे बालसाहित्यhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/ladobaa_nitin_more.pdfसुखी जोडपे आणि इतर कथा वृषाली जोशी सॉमरसेट मॉम कथासंग्रहhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/sommerset2_stories__vrishali_joshi.pdfदिवाळी अंकांसाठी लिंकhttp://www.esahity.com/2312-235023732327233323682344.htmlमराठीतून चारही वेदांसाठी लिंकhttp://www.esahity.com/23092343238123512366234023812350.htmlडोहाचे अंतरंग1 अरविंद बुधकर कथासंग्रह http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/dohache_antarang_1_arvind_budhkar.pdfऐंद्रजाल सुप्रिया जोशी कादंबरीhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/aindrajal_supriya_joshi.pdfअथातो धर्मजिज्ञासा -4- अथर्ववेद निकिता पाटील अध्यात्मhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/dharmjidnyasa_4_nikita_patil.pdfमूळ संस्कृत वाल्मिकी रामायण आणि त्याचा मराठीत श्लोकानुवाद श्याम कुलकर्णीhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/ramayan_1_shyam_kulkarni.pdfअर्धप्रकाशित खिडकी सौरभ वागळे डिटेक्टिव्ह अल्फा कादंबरीhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/khidkee_saurabh_wagle.pdfचक्रमादित्य दरबार भाग ४ डॉ. नितीन मोरे विनोदी नाटकhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/chakramaditya_4_nitin_more.pdfपोरसपुराण सुरेखा तडकळकर इतिहासhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/porus_puran_surekha_terdalkar.pdfरास्वसंघ मुग्धा धनंजय वैचारिकhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/rss_devanuru_mugdha_.pdfशिवशाहीचे आधारस्तंभ (शिवरायांच्या मावळ्यांच्या कथा) अंकुश शिंगाडेhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shivshahi_ankush_shingade.pdf१०००० पानी महाभारत संपूर्ण – अशोक कोठारे- अध्यात्मइतके डिटेल महाभारत मराठीत इतरत्र कोठेही मिळत नाही. हे विनामूल्य आहे.http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/mahabharata_esahity.pdfअधिक माहितीसाठी www.esahity.comसंपर्क: esahity@gmail.comWhatsapp: 9987737237सुनीळ सामंतटीम ई साहित्यअशी पुस्तके नियमित मिळण्यासाठी काही खर्च नाही. फ़क्त आपले नाव व जिल्हा 9987737237 ला Whatsapp करा.हा मेसेज कृपा करून आपल्या मराठी मित्रांना *forward* करा.l

मित्र
पुस्तकांसारखे मित्र नाही. पुर्वी आपल्याकडचे पुस्तक दुसर्‍याला वाचायला दिले की परत यायची शक्यता कमी होती. पण आता ही PDF ebook पुस्तके तुम्ही सर्वा मित्र आणि नातेवाईकांना मेल किंवा व्हाट्सऍपवर देऊनही तुमच्याचकडे रहातात. अगदी ज्ञानासारखीच. ज्ञान वाटल्याने वाढते. दुःख वाटल्याने कमी होते. दुःख कमी करण्याचा दुसरा उपाय म्हणजे ज्ञान होय. दुःखाचे कारण आणि उपाय समजला की दुःख कमी होते. जीवनात आनंद येतो.
पुर्वी आनंद नावाचा सिनेमा फ़ार गाजला होता. त्यात हिरो राजेश खन्नाला कॅन्सर होतो आणि तो मरणार हे नक्की होते. सिनेमा फ़ार चांगला होता खरे, पण त्यातून एक चुकीचा संदेश जनमनात कोरला गेला. कॅन्सर म्हणजे मरण. पण हे खरे नाही. कॅन्सर बरा होतो. याबद्दलच्या चुकीच्या समजुती काढून टाकणारे एक पुतक आम्ही आपणाला देत आहोत. इंग्लंडमधील प्रसिद्ध कॅन्सरतज्ञ लेखकांनी ते लिहिलेले आहे. हे पुस्तक वाचा आणि सर्वांना वाचायला द्या. 
दुसरे एक पुस्तक आहे, विरहिणी. नववीमधे शिकणार्‍या एका मुलीने संस्कृतमधे लिहिलेले हे दीर्घकाव्य आहे. अतिशय सुंदर आहे.
लहान मुलांसाठी एक मजेदार पुस्तक आहे. लाडोबा. बाबा आणि मुलगा यांच्यातील नात्यावर हे छान छान पुस्तक वाचा आणि वाचायला द्या.
इंग्लिशमधील सुप्रसिद्ध लेखक समरसेट मॉम यांच्या सहा कथांचा उत्कृष्ट अनुवाद वाचायला विसरू नका. तसेच एका स्त्रीच्या अधोगतीची कहाणी सांगणारी कादंबरी वारांगना वाचनीय आहे.  
वारांगना अंकुश शिंगाडे कादंबरी
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/varangana_ankush_shingade.pdf

विरहिणी निकिता पाटील संस्कृत काव्य
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/virahini_nikita_patil.pdf

कॅन्सरचा परिचय नील सरोज सहस्रबुधे माहिती
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/cancer__neil_saroj_sahasrabuddhe.pdf

लाडोबा नितीन मोरे बालसाहित्य
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/ladobaa_nitin_more.pdf

सुखी जोडपे आणि इतर कथा वृषाली जोशी सॉमरसेट मॉम कथासंग्रह
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/sommerset2_stories__vrishali_joshi.pdf

दिवाळी अंकांसाठी लिंक
http://www.esahity.com/2312-235023732327233323682344.html

मराठीतून चारही वेदांसाठी लिंक
http://www.esahity.com/23092343238123512366234023812350.html


डोहाचे अंतरंग1 अरविंद बुधकर कथासंग्रह 
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/dohache_antarang_1_arvind_budhkar.pdf

ऐंद्रजाल सुप्रिया जोशी कादंबरी
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/aindrajal_supriya_joshi.pdf

अथातो धर्मजिज्ञासा -4- अथर्ववेद निकिता पाटील अध्यात्म
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/dharmjidnyasa_4_nikita_patil.pdf

मूळ संस्कृत वाल्मिकी रामायण आणि त्याचा मराठीत श्लोकानुवाद श्याम कुलकर्णी
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/ramayan_1_shyam_kulkarni.pdf

अर्धप्रकाशित खिडकी सौरभ वागळे डिटेक्टिव्ह अल्फा कादंबरी
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/khidkee_saurabh_wagle.pdf

चक्रमादित्य दरबार भाग ४ डॉ. नितीन मोरे विनोदी नाटक
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/chakramaditya_4_nitin_more.pdf

पोरसपुराण सुरेखा तडकळकर इतिहास
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/porus_puran_surekha_terdalkar.pdf

रास्वसंघ मुग्धा धनंजय वैचारिक
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/rss_devanuru_mugdha_.pdf

शिवशाहीचे आधारस्तंभ (शिवरायांच्या मावळ्यांच्या कथा) अंकुश शिंगाडे
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shivshahi_ankush_shingade.pdf

१०००० पानी महाभारत संपूर्ण – अशोक कोठारे- अध्यात्म
इतके डिटेल महाभारत मराठीत इतरत्र कोठेही मिळत नाही. हे विनामूल्य आहे.
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/mahabharata_esahity.pdf

अधिक माहितीसाठी www.esahity.com
संपर्क: esahity@gmail.com
Whatsapp: 9987737237
सुनीळ सामंत
टीम ई साहित्य
अशी पुस्तके नियमित मिळण्यासाठी काही खर्च नाही. फ़क्त आपले नाव व जिल्हा 9987737237 ला Whatsapp करा.
हा मेसेज कृपा करून आपल्या मराठी मित्रांना *forward* करा.

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा.येथे जागतिक महिला दिनानिमित्त गुणी व कर्तृत्वान माजी विध्यार्थीनीचा सन्मान*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा.येथे जागतिक महिला दिनानिमित्त गुणी व कर्तृत्वान माजी विध्यार्थीनीचा सन्मान* ==============...