Skip to main content

Posts

Showing posts from November, 2022

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 28 नोव्हेंबर 2022 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजात स्त्री शिक्षणाची सुरुवात करून समाजाला नवीन दिशा दिली. स्त्री शिक्षणासाठी पहिल्यांदा त्यांनी आपली पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते. याचा प्रत्यय त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात करून दाखवून दिला. स्त्री शिक्षणामुळे आज मोठ्या प्रमाणावर स्त्रियांनी विविध क्षेत्रात आपले वर्चस्व मिळवले आहे. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे शाळा महाविद्यालयात मुलींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शिक्षणासाठी समाजाचा रोष पत्करून त्यांनी सर्व जाती धर्मातील मुलांना आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला केला. त्यांनी अनेक ग्रंथांचे लिखाण करून समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी कृतीची जोड दिली पुणे या ठिकाणी असलेला महात्मा ज्योतिबा फुले यांचा वाडा आजही आपणाला तत्कालीन गोष्टींची जाणीव करून देतो. शेती संदर्भात त्यांनी विविध प्रयोग करून शेतीला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळेच त्यांना महात्मा ही पदवी मिळाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संजय भोसले तर आभार इतिहास विभाग प्रमुख श्री. शंकर गेजगे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील 35 विद्यार्थी - विद्यार्थिनी, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 28 नोव्हेंबर 2022 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी आपले  मनोगत व्यक्त केले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजात स्त्री शिक्षणाची सुरुवात करून समाजाला नवीन दिशा दिली. स्त्री शिक्षणासाठी पहिल्यांदा त्यांनी आपली पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते. याचा प्रत्यय त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात करून दाखवून दिला. स्त्री शिक्षणामुळे आज मोठ्या प्रमाणावर स्त्रियांनी विविध क्षेत्रात आपले वर्चस्व मिळवले आहे. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे शाळा महाविद्यालयात मुलींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शिक्षणासाठी समाजाचा रोष पत्करून त्यांनी सर्व जाती धर्मातील मुलांना आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला केला. त्यांनी अनेक ग

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी...*https://star11maharashtra.com/maharashtra/2443/*बातमी सविस्तर पहा*_ ✍️✍️ஜ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬●ஜ *स्टार११महाराष्ट्र न्युज नेटवर्क* ஜ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬ *युवराज धुमाळ* *💥७३९१८५११११💥*

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी...* https://star11maharashtra.com/maharashtra/2443/ *बातमी सविस्तर पहा*_ ✍️✍️ ஜ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬●ஜ  *स्टार११महाराष्ट्र न्युज नेटवर्क*  ஜ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬         *युवराज धुमाळ*   *💥७३९१८५११११💥*

*आ.शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या वतीने शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मृती दिनानिमित्त सायकल रॅली चे आयोजन....*https://star11maharashtra.com/maharashtra/2436/*बातमी सविस्तर पहा*_ ✍️✍️ஜ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬●ஜ *स्टार११महाराष्ट्र न्युज नेटवर्क* ஜ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬ *युवराज धुमाळ* *💥७३९१८५११११💥*

*आ.शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या वतीने शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मृती दिनानिमित्त सायकल रॅली चे आयोजन....* https://star11maharashtra.com/maharashtra/2436/ *बातमी सविस्तर पहा*_ ✍️✍️ ஜ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬●ஜ  *स्टार११महाराष्ट्र न्युज नेटवर्क*  ஜ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬         *युवराज धुमाळ*   *💥७३९१८५११११💥*

*तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे ज्युनियर कॉलेजचे घवघवीत यश*सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत वेगवेगळ्या वजन गटात आमदार शशिकांत शिंदे ज्युनियर कॉलेज ने 57 किलो वजनी गटात कु .श्रेयश संजय कदम विज्ञान शाखा इयत्ता बारावी याने प्रथम क्रमांक मिळविला .प्रफुल्ल नामदेव कदम विज्ञान शाखा इयत्ता बारावी या विद्यार्थ्याने61 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे तर अच्युत निवृत्ती पवार विज्ञान शाखा इयत्ता अकरावी या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक तर कु .उत्कर्ष प्रेमजीत गाडे वजन गट 65 किलो या कला शाखेच्या इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे .न्यू इंग्लिश स्कूल पवारवाडी या ठिकाणी पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री . जाधव टी .ए .व यांनी मार्गदर्शन केले . या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी तसेच उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी अभिनंदन केले व त्यांना जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

*तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे  ज्युनियर कॉलेजचे घवघवीत यश* सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या शालेय  तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत वेगवेगळ्या वजन गटात आमदार शशिकांत शिंदे ज्युनियर कॉलेज ने   57 किलो वजनी गटात कु .श्रेयश संजय कदम विज्ञान शाखा इयत्ता बारावी  याने प्रथम क्रमांक मिळविला . प्रफुल्ल नामदेव कदम विज्ञान शाखा इयत्ता बारावी या विद्यार्थ्याने61 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे तर अच्युत निवृत्ती पवार विज्ञान शाखा इयत्ता अकरावी या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक तर कु .उत्कर्ष प्रेमजीत गाडे वजन गट 65 किलो या कला शाखेच्या इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे . न्यू इंग्लिश स्कूल पवारवाडी या ठिकाणी पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री . जाधव टी .ए .व  यांनी मार्गदर्शन केले . या सर्व विजेत्या  विद्यार्थ्यांचे  महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी तसेच  उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी अभिनंदन केले व त्यांना जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी* जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते.  या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने  ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यास

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात विदेशी वनस्पतीचे दुष्परिणाम व त्यांचे निर्मूलन या विषयावर अभियान संपन्न*कॉसमॉस सारख्या वेगाने पसरणाऱ्या विदेशी वनस्पतींचा वाढता प्रादूर्भाव आणि त्यांचे भविष्यातील संभाव्य दुष्परिणाम याची माहिती करून देण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथील वनस्पतीशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “विदेशी वनस्पतींचे निर्मूलन” अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा, येथील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.शेखर मोहिते आणि प्रा. रविंद्र साबळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. मोहिते यांनी विदेशी वनस्पतींचा जैवविविधतेवर होणारा दुष्परिणाम आणि भविष्यातील संभाव्य धोके यावर सखोल मार्गदर्शन केले. कॉसमोस सारखी वनस्पती दिसायला कितीही चांगली असली तरी तिचे वास्तव आणि दुष्परिणाम यांची जाणीव करून दिली. तसेच प्रा.साबळे यांनी अशा वनस्पतींचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे व त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन समाजामध्ये जाणीव जागृती करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे असे प्रतिपादन केले. याच बरोबर आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा आणि लाल बहा्दूर शास्त्री महाविद्यालय, सातारा यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. महविद्यालयातील १४२ विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभाग घेतला. यावेळी बिभवी गावच्या लगत असलेल्या परिसरात वाढत असलेल्या कॉसमॉस या वनस्पतीचे राष्ट्रीय सेवा योजेनेच्या विध्यार्थ्यांनी निर्मुलन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख डॉ. उदय पवार यांनी केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी या नाविन्यपूर्ण अभियानाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करुन ग्रामीण भागात शैक्षणिक प्रगतीबरोबर सामाजिक परिवर्तन करण्यासाठी आपले महाविद्यालय महत्वपूर्ण योगदान देण्यास कटिबध्द असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे, यांची प्रमुख उपस्थिती लाभली. डॉ. संजय भोसले यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रीमती धनश्री देशमुख यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात विदेशी वनस्पतीचे दुष्परिणाम व त्यांचे निर्मूलन या विषयावर अभियान  संपन्न* कॉसमॉस सारख्या वेगाने पसरणाऱ्या विदेशी वनस्पतींचा वाढता प्रादूर्भाव आणि त्यांचे भविष्यातील संभाव्य दुष्परिणाम याची माहिती करून देण्यासाठी आमदार शशिकांत  शिंदे महाविद्यालय, मेढा येथील  वनस्पतीशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “विदेशी वनस्पतींचे निर्मूलन” अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा, येथील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.शेखर मोहिते आणि प्रा. रविंद्र साबळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. मोहिते यांनी विदेशी  वनस्पतींचा जैवविविधतेवर होणारा दुष्परिणाम आणि भविष्यातील  संभाव्य धोके यावर सखोल मार्गदर्शन केले. कॉसमोस सारखी वनस्पती दिसायला कितीही चांगली असली तरी तिचे वास्तव आणि दुष्परिणाम यांची जाणीव करून दिली. तसेच प्रा.साबळे यांनी अशा वनस्पतींचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे व त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन  समाजामध्ये जाणीव जागृती करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे असे प्रतिपादन

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्नमेढा : जयवंत प्रतिष्ठान संचलित आ. शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा (ता. जावली) यांचे वतीने दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वा. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजसदादा शिंदे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य मॅरॉथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेचे उदघाटन मा. तेजसदादा शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. या स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या. आठवी ते दहावी, आकरावी -बारावी व खुला गट या तीन गटात या स्पर्धा पार पडल्या.स्पर्धा संपल्यावर बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री तेजस दादा शिंदे तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी सर उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण व जेष्ठ पत्रकार मा. शिंगटे गुरुजी व पत्रकार सुरेश पार्टे यांची मुख्य उपस्थिती होती.विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, मा. तेजसदादा शिंदे म्हणाले " विद्यार्थ्यांनी खेळाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन, आपला तालुका राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचा तालुका होईल तसेच अभ्यासाकडे लक्ष देऊन माथाडींच्या तालुका ऐवजी अधिकाऱ्यांचा तालुका कसा होईल याकडे देण्याची गरज आहे आणि महाविद्यालयाकडून तसे प्रयत्न केले जातील " अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना विभाग प्रमुख   प्रमोद चव्हाण यांनी केले. अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनीही आपले मनोगत व्यक्त करून, यशस्वी स्पर्धेकांचे अभिनंदन करून सहभागी स्पर्धेकांचे व सर्वांचे कौतुक केले.तसेच त्यांनी सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. प्रमोद चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर मान्यवरांच्या हस्ते तीन गटातील प्रत्येकी सहा स्पर्धेकांना, रोख रक्कम, मेडल व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. त्यामध्ये इयत्ता ८ वी ते १० वी या गटामध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक रोशन आनंदा सपकाळ,  कैलासवासी अण्णासाहेब पाटील माध्यमिक विद्यालय म्हाते  बक्षीस सोळाशे रुपये, द्वितीय क्रमांक विकास कृष्णा आखाडे बक्षीस बाराशे रुपये व तृतीय क्रमांक विष्णू राजेंद्र आखाडे  न्यू इंग्लिश स्कूल कुसुंबी मुरा  तसेच माध्यमिक मुली श्रेया भैरवनाथ कुंभार जि प प्राथमीक शाळा मेढा बक्षीस सोळाशे रुपये, द्वितीय क्रमांक विद्या कृष्णा आखाडे न्यू इंग्लिश स्कूल कुसुंबी मोरा बक्षीस बाराशे रुपये, तृतीय क्रमांक अनुष्का सचिन निकम जनता माध्यमिक विद्यालय करंदी बक्षीस एक हजार रुपये व इयत्ता ११ वी, १२ वी  गटामध्ये प्रथम क्रमांक रोहन अशोक तरडे दीपक पवार कॉलेज ऑफ सायन्स कुडाळ बक्षीस दोन हजार रुपये, द्वितीय क्रमांक विवेक संजय धनावडे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा बक्षीस सोळाशे रुपये, तृतीय क्रमांक मयूर मानसिंग चव्हाण यांना महाविद्यालय मेढा बक्षीस चौदाशे रुपये तसेच जूनियर कॉलेज मुली प्रथम क्रमांक सोनाली मारुती कोकरे आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा बक्षीस दोन हजार रुपये, द्वितीय क्रमांक वैष्णवी विश्वास शेलार आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा बक्षीस सोळाशे रुपये तसेच तृतीय क्रमांक मेघना रमेश चिकणे आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा बक्षीस चौदाशे रुपये  १८ वर्षावरील खुल्या गटतील मुले प्रथम क्रमांक हर्षवर्धन संतोष दबडे एलबीएस महाविद्यालय सातारा बक्षीस चार हजार रुपये, द्वितीय क्रमांक शिवम विलास कापले कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा बक्षीस तीन हजार रुपये, तसेच तृतीय क्रमांक सुरज मधुकर वेंदे आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा बक्षीस चोवीसशे रू. व मुली प्रथम क्रमांक आदिती प्रदीप शेलार आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा बक्षीस चार हजार रुपये, द्वितीय क्रमांक ऋतुजा सुनील सपकाळ आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा बक्षीस तीन हजार रुपये, तसेच तृतीय क्रमांक ऋतुजा विश्वनाथ शेलार आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा, बक्षीस चोवीसशे रुपये देण्यात आले. यावेळी याप्रसंगी प्रसिद्ध उद्योगपती सुरेश गायकवाड तसेच मेंढा नगरीतील माजी सरपंच शिंगटे गुरुजी व ज्येष्ठ पत्रकार सुरेश पार्टे आणि श्री. संजय जुनघरे,सर्व प्रध्यापक, विध्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.सूत्रसंचालन सौ.गायत्री जाधव यांनी केले.शेवटी आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी केलेया स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व एन. एस. एस. चे स्वयंसेवक तसेच जावळी करिअर अकॅडमी, शौर्य अकॅडमी मेढा व पंचक्रोशीतील हायस्कुल व कॉलेज यांचे सहकार्य लाभले.

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न मेढा : जयवंत प्रतिष्ठान संचलित आ. शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा (ता. जावली) यांचे वतीने दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वा. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजसदादा शिंदे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य मॅरॉथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेचे उदघाटन मा. तेजसदादा शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. या स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या. आठवी ते दहावी, आकरावी -बारावी व खुला गट या तीन गटात या स्पर्धा पार पडल्या.स्पर्धा संपल्यावर बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री तेजस दादा शिंदे तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी सर उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण व जेष्ठ पत्रकार मा. शिंगटे गुरुजी व पत्रकार सुरेश पार्टे यांची मुख्य उपस्थिती होती.विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, मा. तेजसदादा शिंदे म्हणाले " विद्यार्थ्यांनी खेळाकडे जास्तीत जास्त लक्

मेढ्यात भित्तिपत्रिका स्पर्धेचे आयोजन

*“भविष्यास आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची आवश्यकता” : गटविकास अधिकारी श्री. रमेश काळे*जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी महाविद्यालयाची लैंगिक छळ प्रतिबंधक समिती आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प जावली(मेढा) यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.श्री.रमेश काळे यांच्या हस्ते पार पडले.शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.वृंदा शिवदे,पर्यवेक्षिका एकात्मिक बाल विकास योजना,सातारा,मा.डॉ.प्रियांका टकले,वैद्यकीय अधिकारी,सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्र,मा.शैलेश कांबळे,संचालक,कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र,कराड हे उपस्थित होते.शिबिराच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ.अशोक गिरी होते.तर शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती होती महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा.डॉ.प्रमोद घाटगे,मा.श्री.शाम राठोड,गटविस्तार अधिकारी पंचायत समिती जावली,मा.मानसी संकपाळ,पर्यवेक्षिका,एकात्मिक बालविकास सेवा योजना,जावली यांची.उद्घाटनपर भाषणात मा.श्री.रमेश काळे,गटविकास अधिकारी ,पंचायत समिती जावली यांनी जावलीसारख्या दुर्गम भागातील महिला आणि मुलींना लिंगभाव,आरोग्य,कायदे,कौशल्य विकास अशा विविध विषयांबद्दल माहिती देणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.त्यांनी उपस्थित शिबिरार्थी मुलींना आपल्या सामाजिक भान जागृत ठेऊन विविध जीवनविषयक कौशल्ये आत्मसात करून आपल्या पायावर ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.दुर्गम ग्रामीण भागातील रहिवासी असल्याचा न्यूनगंड मनातून काढून टाकून येणाऱ्या भविष्यास आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.या शिबिरामध्ये मा.वृंदा शिवदे यांनी सोशल मिडीयाचा सजग वापर या विषयावर,मा. डॉ.प्रियांका टकले यांनी मासिक पाळी आणि आरोग्य या विषयावर तर मा.शैलेश कांबळे यांनी स्पर्धा परीक्षाबद्दल मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ.अशोक गिरी यांनी,आपल्या ध्येयाप्रती संवेदनशील राहून त्या ध्येयासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करणे हि आपली प्राथमिकता असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादित केले तसेच आपल्या जवळ असणाऱ्या सकारात्मक उर्जेचा वापर आपण आपल्या विवेकाने योग्य ठिकाणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.अशा स्वरूपाच्या मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन हे समाजाप्रती आपली बांधिलकी जपण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी उद्धृत केले.या शिबिरासाठी १२५ किशोरवयीन मुली उपस्थित होत्या. शिबिरासाठी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी,अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.धनश्री देशमुख यांनी केले.

*“भविष्यास आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची आवश्यकता” : गटविकास अधिकारी श्री. रमेश काळे* जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी महाविद्यालयाची लैंगिक छळ प्रतिबंधक समिती आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना  प्रकल्प जावली(मेढा) यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.श्री.रमेश काळे यांच्या हस्ते पार पडले.शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.वृंदा शिवदे,पर्यवेक्षिका एकात्मिक बाल विकास योजना,सातारा,मा.डॉ.प्रियांका टकले,वैद्यकीय अधिकारी,सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्र,मा.शैलेश कांबळे,संचालक,कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र,कराड हे उपस्थित होते.शिबिराच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ.अशोक गिरी होते.तर शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती होती महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा.डॉ.प्रमोद घाटगे,मा.श्री.शाम राठोड,गटविस्तार अधिकारी पंचायत समिती जावली,मा.मानसी संकपाळ,पर्यवेक्षिका,एकात्मिक बालव

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात "भ्रष्टाचार मुक्त भारत- विकसित" भारत या विषयावर भित्ती पत्रिका स्पर्धा संपन्न.

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात "भ्रष्टाचार मुक्त भारत- विकसित" भारत या विषयावर भित्ती पत्रिका स्पर्धा संपन्न.* बुधवार, दिनांक 9/11/2022 रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे बँक ऑफ महाराष्ट्र मेढा शाखेच्या वतीने कॉमर्स विभागामार्फत" भ्रष्टाचार मुक्त भारत विकसित भारत " या विषयावर भित्ती पत्रिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सदर   स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे, कॉमर्स विभाग प्रमुख प्रा.अमेय देसाई व प्रा.डॉ.संग्रामसिंह नलवडे उपस्थित होते.या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र मेढा शाखेचे शाखा प्रमुख श्री.अविनाश सुतार यांनी स्पर्धेचे महत्व विषद करून,यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विकसित भारत घडविण्यासाठी अशा प्रकारच्या अभियानात सहभागी होऊन समाजात जाणिव जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. सहभागी या स्पर्धेत कॉमर्स व

news of unity day

*राष्ट्रपुरुष ही देशाची संपत्ती- प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी*

*राष्ट्रपुरुष ही देशाची संपत्ती- प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी*   आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा येथे राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम देशाचे  माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती या निमित्ताने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये  राज्यशास्त्र विभाग प्रमुख सौ.गायत्री जाधव यांनी राष्ट्रीय एकता दिवस शपथ वाचन करून  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे प्रतिपादन केले की, ‘देशाच्या विकासात सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांनी एकसंघ भारत बनविण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.देशाच्या एकसंध उभारणीत  कणखर  राज्यकर्ता गरजेचा असतो याचे उदाहरण त्यांनी आपल्या कार्यातून दाखून दिले.  बारडोली सत्याग्रहाचे प्रणेते, ५०० पेक्षा अधिक संस्थानांचे विलीनीकरण करून नवा भारत निर्माण करणारे सच्चे देशभक्त म्हणून त्यांची  वेगळी प्रतिमा निर्माण झाली. त्यांच्या कार्याची महती कायम रहावी म्हणून गुजरात राज्यात त्यांची जगातील सर्वात उंच प