Skip to main content

Posts

Showing posts from 2023

बातमी

*विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचा आदर्श घ्यावा**श्री. नितीन तारळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी**मेढा*: आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा आयोजित शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर अंतर्गत सातारा जिल्हा विभागीय जलतरण (पुरुष आणि महिला) स्पर्धा सातारा येथे जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी पार पडल्या या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नितीन तारळकर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उदघाटन प्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचा आदर्श घ्यावा आणि त्याप्रमाणे वाटचाल करावी असे मत व्यक्त केले.सदर स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना श्री नितीन तारळकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करताना कष्ट, चिकाटी आणि अचूक प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.अध्यक्षस्थानी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा चे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध उदाहरणे देत विध्यार्थी दशेत सुनियोजित सराव व मेहनत करणे अनिवार्य असल्याचे नमूद केले. तसेच या प्रसंगी बोलताना त्यांनी जलतरणपटू अमेरिकन ऑलिंपिक खेळाडू मायकेल फेल्प्स व विरधवल खाडे , यांचे उदाहरण देत त्याप्रमाणे वाटचाल करण्याचे आवाहन केले.सदर स्पर्धेसाठी पंधरा महाविद्यालयातून सुमारे साठ विध्यार्थी विविध जलतरण प्रकारात सहभागी झाले होते.कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे सातारा विभागीय क्रीडा परिषद च्या सचिव श्रीमती वैशाली खाडे जेष्ठ प्रा .डॉ.दीपक डांगे ,प्रा. बाळासाहेब भोसले उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार डॉ संजय भोसले यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन प्रा. प्रकाश जवळ यांनी केले.सदर कार्यक्रमांस विविध महाविद्यालयातील संघ व्यवस्थापक आणि बहुसंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

*विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचा आदर्श घ्यावा* *श्री. नितीन तारळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी* *मेढा*: आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा आयोजित शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर अंतर्गत सातारा जिल्हा विभागीय जलतरण (पुरुष आणि महिला) स्पर्धा सातारा येथे जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी पार पडल्या या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नितीन तारळकर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  उदघाटन प्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचा आदर्श घ्यावा आणि त्याप्रमाणे वाटचाल करावी असे मत व्यक्त केले. सदर स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी  बोलताना श्री नितीन तारळकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करताना कष्ट, चिकाटी आणि अचूक प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. अध्यक्षस्थानी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा चे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध उदाहरणे देत विध्यार्थी दशेत सुनियोजित सराव व मेहनत करणे अनिवार्य असल्याचे नमूद केले. तसेच या प्रसंगी बोलताना त्यांनी जलतरणपटू   अमेरिकन ऑलिंपिक खेळाडू

प्रा. डॉ. प्रमोद घाटगे जावली गौरव पुरस्काराने सन्मानित जावली तालुक्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये असणारी संस्था मित्रमेळा फाउंडेशन जावली यांच्यावतीने सन 2023 साठी विविध क्षेत्रात भरीव योगदान देऊन सर्वोत्कृष्ट उल्लेखनीय काम करणारे हुमगाव तालुका जावली गावचे सुपुत्र डॉ. प्रमोद रघुनाथराव घाटगे यांना त्यांच्या 31 वर्षाच्या शिक्षण सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जावली शिक्षण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले जावली तालुक्यात जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय उभे करून डॉ. प्रमोद घाडगे सरांनी जावलीतील उच्च शिक्षणाचा खूप मोठा शैक्षणिक प्रश्न सोडवला बारावीचे एच एस सी बोर्ड परीक्षा केंद्र सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची वाटचाल प्राचार्य प्रमोद घाटगे यांच्या नेतृत्वाखाली उत्तमरीत्या सुरू असून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक व शैक्षणिक स्वरूपाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक सर्व सोयी सुविधांची उपलब्धता या महाविद्यालयाने केली आहे या महाविद्यालयात आज तालुक्यातील सुमारे 40 गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत डॉ. प्रमोद घाटगे सरांनी यावेळी माझ्या कार्याची दखल घेऊन आपण दिलेला पुरस्कार माझ्यासाठी लाखमोलाचा असून मी सदैव ऋणी राहील आणि मित्रमेळा फाउंडेशनच्या सामाजिक कार्यास सहकार्य करीत राहील हा सन्मान माझा नसून माझे कुटुंबीय, माझे गुरुवर्य, जयवंत प्रतिष्ठान संस्था आणि हुमगाव गावचा गौरव आहे असे प्रतिपादन केले यावेळी माननीय आमदार सदाशिव भाऊ सपकाळ, सिने अभिनेता विजय निकम, चंद्रकांत कांबी रे, विशाल बांदल, महिगावकर, एकनाथ ओंबळे आदींनी कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या मित्रमेळा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पवार सचिव निलेश धनवडे यांनी स्वागत केले अनुप लकडे यांनी प्रास्ताविक केले अमित लकेरी यांनी आभार मानले

प्रा. डॉ. प्रमोद घाटगे जावली  गौरव पुरस्काराने सन्मानित             जावली तालुक्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये असणारी संस्था मित्रमेळा फाउंडेशन जावली यांच्यावतीने सन 2023 साठी विविध क्षेत्रात भरीव योगदान देऊन सर्वोत्कृष्ट उल्लेखनीय काम करणारे हुमगाव  तालुका जावली गावचे सुपुत्र डॉ. प्रमोद रघुनाथराव घाटगे  यांना त्यांच्या 31 वर्षाच्या शिक्षण सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जावली शिक्षण गौरव पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले   जावली तालुक्यात जयवंत प्रतिष्ठान संचलित  आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय उभे करून  डॉ. प्रमोद घाडगे सरांनी जावलीतील उच्च शिक्षणाचा खूप मोठा शैक्षणिक प्रश्न सोडवला बारावीचे एच एस सी बोर्ड परीक्षा केंद्र सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची वाटचाल प्राचार्य प्रमोद घाटगे यांच्या नेतृत्वाखाली उत्तमरीत्या सुरू असून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक  व शैक्षणिक स्वरूपाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक सर्व सोयी सुविधांची उपलब्धता या महाविद्यालयाने केली आहे या महाविद्यालयात आज तालुक्यातील सुमार

युनि्हर्सिटी न्यूज Special Issue

New Arrival

ASSM MEDHA: NAAC A GRADE

ASSM LIBRARY & KNOWLEDGE RESOURCES CENTRE GOT 100% MARKS. !!! From NAAC!!! JAY HO!!  IT'S PROUDFUL THING FOR LIBRARY  Thank you all Library Users Happy Reading!!!  Happy Learning!!! From Librarian Dr.SR NAGARKAR

" *आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही* "प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞" आजच्या युगात ज्ञानाला खूप महत्व आहे,हे ज्ञान गुरुबरोबरच ग्रंथसंपदेत भरून उरले आहे.आपल्याला आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही. " असे मत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी व्यक्त केले.महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या वतीने, माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, "आज ज्या महान व्यक्तीची जयंती आज आपण साजरी करत आहोत,त्यांना लहानपनापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती.डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवनामध्ये शिक्षणाच्या परिस्पर्श झाल्यामुळे तसेच जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, अभ्यासातील सातत्य व सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यासाच्या व्यासंगातून शास्त्रज्ञ झाले आणि राष्ट्रपती पदापर्यंत पोहचले तसेच मेहनत व प्रामाणिकपणा अंगीकारून यशस्वी झेप घेतली.म्हणूनच ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मिती करायची असेल तर, ग्रंथवाचन करून ज्ञान,मनन,चिंतन करून ज्ञान संकलन करावे व अशा महापुरुषांचे अनुकरण विध्यार्थ्यानी करावे आणि आपले भविष्य उज्वल घडवावे " असे आवाहन केले.उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करून आपली वाचन सवयी जोपासावी हा संदेश दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथपाल डॉ. सुधीर नगरकर यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी ग्रंथालयातील नियतकालिकांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. तसेच ग्रंथालयाकडून करंट कंटेंट सर्विस सुरू करण्यात आली. याचा लाभ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतला.कार्यक्रमासाठी विध्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी प्रा.राजेंद्र ननावरे यांनी आभार मानले.

" *आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही* " प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी ∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞ " आजच्या युगात ज्ञानाला खूप महत्व आहे,हे ज्ञान गुरुबरोबरच ग्रंथसंपदेत भरून उरले आहे.आपल्याला आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही. " असे मत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी व्यक्त केले. महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या वतीने, माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती. प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, "आज ज्या महान व्यक्तीची जयंती आज आपण साजरी करत आहोत,त्यांना लहानपनापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती.डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवनामध्ये शिक्षणाच्या परिस्पर्श झाल्यामुळे  तसेच जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, अभ्यासातील सातत्य व सकारात्मक दृष्टि

*थोर व्यक्तींच्या विचारांचा वारसा युवापिढीने पुढे चालवावा*."*प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी*.=========================मेढा 2 ऑक्टोबर 2023 - " थोर व्यक्तींच्या विचारांची युवा पिढीने जपणूक करून, देश विकासासाठी आपला हातभार लावला पाहिजे आणि त्यांच्या विचारांचा वारसा आता युवा पिढीने पुढे चालवावा तीच खरी या महामानवांना खरी आदरांजली ठरेल " असे प्रतिपादन प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी यांनी केले. आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली.त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की," महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यात खडतर प्रवास सहन करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.त्यांना दक्षिण आफ्रिकेत ते रेल्वे मध्ये बसले असता,वर्णभेद मानणाऱ्या गोऱ्या लोकांनी रेल्वेमधून ढकलून दिले होते आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये वर्णभेद निर्मूलन झाले पाहिजे असा विचार आला.या उद्देशाने त्यांनी साऊथ आफ्रिकेत राहून,काळा गोराभेदाच्या विरोधात उठाव केला.भारतात परत आल्यानंतर त्यांनी वकिलीचा व्यवसाय न करता,देश स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात उडी घेतली व देशातील जनतेला जागृत करून,देश स्वतंत्र होईपर्यंत,ते अहिंसा,सत्य व शांततेच्या मार्गाने लढत राहिले.म्हणूनच आपला देश स्वतंत्र झाला. याच स्वतंत्र भारताचे तृतीय भूतपूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचीही आज जयंती आहे हे सुद्धा मूर्ती लहान पण कीर्ती महान असे व्यक्तिमत्व होते . शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि म्हणूनच भारताचा विकास हा भारतातील शेतीच्या विकासावरती आधारित आहे व भारत देशातील युवकांवर ते आधारलेला भारत देश आहे म्हणूनच लालबहादूर शास्त्री यांनी 'जय जवान, जय किसान' हा नारा दिला आणि त्यांनी शेतकरी, जवान व भारतीय जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले.या दोन्ही महापुरुषांचे योगदान आपल्याला कधीच विसरता येणार नाही "असे सांगून, राष्ट्रपिता महात्मा गांधी वं पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जीवनातील मौल्यवान आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.उदय पवार तर आभार डॉ. संजय भोसले यांनी मानले.============

*थोर व्यक्तींच्या विचारांचा वारसा युवापिढीने पुढे चालवावा*." *प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी*. ========================= मेढा 2 ऑक्टोबर 2023 -  " थोर व्यक्तींच्या विचारांची युवा पिढीने जपणूक करून, देश विकासासाठी आपला हातभार लावला पाहिजे आणि  त्यांच्या विचारांचा वारसा आता युवा पिढीने पुढे चालवावा तीच खरी या महामानवांना खरी आदरांजली ठरेल " असे प्रतिपादन प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी यांनी केले.   आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली.त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की," महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यात खडतर  प्रवास सहन करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.त्यांना दक्षिण आफ्रिकेत ते रेल्वे मध्ये बसले असता,वर्णभेद मानणाऱ्या गोऱ्या लोकांनी रेल्वेमधून ढकलून दिले होते आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये वर्णभेद निर्मूलन

NET/SET

*UGC NET/SET PAPER 2 Library & Information Science*  *SUBSCRIBE YOUTUBE CHANNEL FOR MORE UPDATES*  *LIBRARY AND INFORMATION SCIENCE* *UNIT-1* https://youtu.be/mlNwwJFF_AE *UNIT-2* https://youtu.be/5njQMtSiJWo *UNIT-3* https://youtu.be/jkNMpZIs3gU *UNIT-4* https://youtu.be/XbpXHBstXqM *UNIT-5* https://youtu.be/a0hiiSu7P1g *UNIT -6* https://youtu.be/-69T_L8MkHU *UNIT-7* https://youtu.be/uPqVvU2RMvQ *UNIT-8* https://youtu.be/tL4z9OTnmKM *UNIT-9* https://youtu.be/dAt8IH4N06s *UNIT-10* https://www.youtube.com/live/X5RQxSPotyM?feature=share *मी सेट होणारच!!! WEBSITE URL* https://sites.google.com/site/assmlibrarymedha/netset-guidance?authuser=0 *NET/SET PAPER 1 ALL UNITS URL* https://www.youtube.com/live/JUvUUyHtkTo?feature=share सर्वांनी युट्युब वरील युनिट नंबर एक ते दहा पुन्हा पुन्हा पाहायचे आहेत. कारण तो सिल्याबस नुसार कंटेंट अतिशय महत्त्वाचा आहे. आपणास न येणाऱ्या गोष्टी वन पेज नोट्स काढायच्या आहेत नक्कीच यश तुम्हाला मिळेल!!! Dr.SRN

" *महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विध्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे व अनन्यसाधारण अशा स्वरूपाचे असते*"*प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी*==========================मेढा :

" *महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विध्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे व अनन्यसाधारण अशा स्वरूपाचे असते*" *प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी* ========================== मेढा :22/9/2023 " महाविद्यालयाच्या जडण घडणीत माजी विद्यार्थी मंडळाची भूमिका अत्यंत महत्वाची असून,माजी विद्यार्थ्यानी महाविद्यालयाच्या सर्वांगिण विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे. कारण या विध्यार्थ्यांचे योगदान हे महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी अंत्यत महत्वाचे असते " असे प्रतिपादन प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही.गिरी यांनी केले.आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या माजी विध्यार्थी मंडळाच्या वतीने, महाविद्यालयात विध्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते.त्या प्रसंगी प्राचार्य डॉ.अशोक गिरी आपल्या अध्यक्षीय भाषणावेळी बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे,नॅक समितीचे समन्वयक प्रा.अमेय देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ.गिरी सर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, " महाविद्यालयातून विशेष प्राविण्य प्राप्त करून आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या,

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न*.मेढा : 29 ऑगस्ट 2023जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित ,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्ह्याचे पाहिले आयर्नमन ,मेढा येथील सुप्रसिध्द धन्वंतरी डॉ.सुधीर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयात स्पोर्ट्स बुलेटिन हा उपक्रम मान्यवरांच्या हस्ते सुरू करण्यात आला. त्यानंतर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजनकरण्यात आले.त्यानंतर डॉ.सुधीर पवार यांनी " खेळाडूंचे आरोग्य आणि आहार " या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले,खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, " चांगल्या आरोग्यासाठी आहार महत्वाचा असतो.तुम्ही जर खेळाडू असाल तर तुम्ही आपल्या आहाराबाबत खूप जागरूक असणे आवश्यक आहे.चांगल्या आहारामुळे तुमची खेळातील कामगिरी सुधारण्यास मदत होऊ शकते.कोणत्याही खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी करण्यात सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे आहार.कारण योग्य आहारावरच खेळाडूंचे वजन,शरीरातील चरबीचे,पाण्याचे प्रमाण,स्नायूची,श्वसनाची,आणि हृदयाची कार्यक्षमता आणि ताकत अवलंबून असते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ.मेजर अशोक व्ही.गिरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की," खेळाडूंनी आहारात अचानक बदल करू नये,जो आहार सुरुवातीपासून तुम्ही घेता,तोच कायम ठेवला पाहिजे,प्रत्येक खेळाडूने शारीरिक क्षमते बरोबरच आहाराला महत्व आहे " असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख जिमखाना विभागप्रमुख प्रा.प्रमोद चव्हाण यांनी केले.तर सूत्रसंचालन प्रा.शंकर गेजगे यांनी केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,खेळाडू व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. उल्हास जाधव यांनी मानले.

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे राष्ट्रीय क्रीडा दिन  संपन्न*. मेढा : 29 ऑगस्ट 2023 जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित ,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे जयंतीनिमित्त  राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्ह्याचे पाहिले आयर्नमन ,मेढा येथील सुप्रसिध्द धन्वंतरी डॉ.सुधीर पवार  यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते.         कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयात स्पोर्ट्स बुलेटिन हा उपक्रम मान्यवरांच्या हस्ते सुरू करण्यात आला. त्यानंतर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर डॉ.सुधीर पवार यांनी " खेळाडूंचे आरोग्य आणि आहार " या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले,खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, " चांगल्या आरोग्यासाठी आहार महत्वाचा असतो.तुम्ही जर खेळाडू असाल तर तुम्ही आपल्या आहाराबाबत खूप जागरूक असणे आवश्यक आहे.चांगल्या आहारामुळे तुमची खेळातील कामगिरी सुधारण्यास मदत होऊ शकते.कोणत्याही खेळाडूने सर्

मेढा महाविद्यालयात “रानभाज्या महोत्सव २०२३ " उत्साहात साजरा*

*मेढा महाविद्यालयात “रानभाज्या महोत्सव २०२३ " उत्साहात साजरा* ======================== मेढा : 21 ऑगस्ट 2023 आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा  वनस्पतीशास्त्र विभाग व तालुका कृषी विभाग जावली,मेढा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन योजना (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने,अग्रणी महाविद्यालय योजना अंतर्गत  “रानभाज्या महोत्सव ” २०२३ आयोजित करण्यात आला होता.          या महोत्सवाचे उदघाट्न या उद्घाटन मा.श्रीमती भाग्यश्री पवार – फरांदे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सातारा यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी हे होते.या प्रदर्शनासाठी उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे, कृषी सहाय्यक श्री. भानुदास चोरगे,आत्मा जावळीचे श्री.सचिन नेवसे, विभागीय संघटिका श्रीमती सुनिता राजे-घाटगे,ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे, मा. आर के. जाधव, श्री.नंदकुमार काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.आपल्या भाषणात श्रीमती भाग्यश्री पवार म्हणाल्या " आजकालच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये माणसाकडे आरोग्य व समतोल आहार घेण्यासाठी अजिबात वेळ नाही. याचाच परिणाम म्हणून वेगव

विद्यार्थी दशेत चरित्र संवर्धन करावे व रॅगिंग सारख्या वाईट प्रवृत्तीना थारा देऊ नये*

* विद्यार्थी दशेत चरित्र संवर्धन करावे व रॅगिंग सारख्या वाईट प्रवृत्तीना थारा देऊ नये*  *विधिज्ञ .अनुप लकडे* आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा या महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध समिती आणि लैंगिक छळ प्रतिबंध समिती यांच् या संयुक्त विद्यमाने 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या कालावधीत अँटी रॅगिंग सप्ताह साजरा करण्यात आला, 14 ऑगस्ट 2023 रोजी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना Ragging म्हणजे काय? जर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात Ragging सदृश्य कृत्य केले तर त्याचे होणारे दुष्परिणाम,प्रसंगी तुरुंगवासही होऊ शकतो.अशी माहिती समितीचे समन्वयक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी स्पष्ट केले,तर महाविद्यालयाचे प्राचार्य,मेजर डॉ.अशोक गिरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ,विद्यार्थ्यांना विविध चित्रपट,समाज माध्यमातून घडणाऱ्या विविध घटना व त्याचे अनुचित परिणाम याबद्दल माहिती सांगून ragging चे किती गंभीर परिणाम होतात,असे प्रसंग आपल्या महाविद्यालय घडू नयेत यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी दक्ष राहावे,असे आव्हान केले तसेच उपस्थित सर्वाना रॅगिंग न करण्याची शपथ दिली व रॅगिंग विषयांची संपूर्ण माहिती विशद क

स्वातंत्र्य, समता व बंधुता वृद्धिंगत करण्याची जबाबदारी युवा पिढीची आहे " ॲड.वर्षा देशपांडे*

" *स्वातंत्र्य, समता व बंधुता  वृद्धिंगत करण्याची जबाबदारी युवा पिढीची आहे "                        ॲड.वर्षा देशपांडे* .                        —--------------- मेढा : 14 ऑगस्ट 2023 ====================== " या देशात छत्रपती शिवरायांपासून महात्मा गांधी यांच्या पर्यंतच्या सर्वच महापुरुषांनी आपल्या युवा अवस्थेतच सामाजिक कार्यास सुरुवात केली. म्हणूनच आपल्याला स्वराज्य व स्वातंत्र्य प्राप्त झाले.महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा सुरु केली म्हणूनच मुली शिकून आज सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत सर्वांना समान संधी व अधिकार दिले. म्हणूनच हे स्वातंत्र्य आज आपण उपभोगत आहोत.परंतु अलीकडच्या काळात या देशाला धर्मांधता व स्त्री अत्याचाराचे ग्रहण लागले आहे.त्यातून भारतमातेला मुक्त करण्याची व   " स्वातंत्र्य, समता व बंधुता  वृद्धिंगत करण्याची जबाबदारी युवा पिढीची आहे " " असे प्रतिपादन सातारा येथील जेष्ठ सामाजीक कार्यकर्त्या ॲड.वर्षा देशपांडे यांनी केले.लेक लाडकी अभियान,महाराष्ट्र राज्य,दलित महिला विका

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा!!!

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा!!! मेढा दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी लीड कॉलेज कार्यक्रम अंतर्गत ग्रंथालय व ज्ञान स्त्रोत केंद्र यांच्या वतीने ग्रंथालय शास्त्राचे प्रणेते डॉ. एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. संजय ढेरे साहेब तांत्रिक सहाय्यक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सातारा हे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी उपस्थित होते.      मा.ढेरे यांनी आपल्या मनोगतात वाचनाचे महत्त्व,नेमके काय वाचावे, विद्यार्थ्यांनी कोणत्या पुस्तकातून कसे संदर्भ काढावेत तसेच आत्मचरित्र पर पुस्तके कशी वाचावीत हे सांगितले. बुद्धीला सशक्त बनवण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले. तर अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही. गिरी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन हे महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करून आपले आयुष्य बदलावे असा संदेश दिला. उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी ग्रंथपाल दि

*पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस यांनी “ युज ऑफ इन्फिबनेट अँड लायब्ररी फॉर कॉम्पेटेटिव्ह एक्झाम” एक दिवशीय राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केलेली आहे.**1. विषय –INFLIBNET चे प्रमुख उपक्रम (INFLIBNET :MAJOR ACTIVITIES)* *वक्त्ते :- डॉ. सुधीर नगरकर ग्रंथपाल आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा**2. विषय –स्पर्धा परीक्षाच्या तयारीसाठी ग्रंथालयाचा वापर (“USE OF LIBRARY FOR PREPARATION OF COMPETITIVE EXAMS”)* *वक्त्ते:- श्री अतुल नगरकर ग्रंथपाल दूधसाखर महाविद्यालय बिद्री* *तारीख 16/6/2023**वेळ: सकाळी 11.00 वाजता**रजिस्ट्रेशन लिंक*https://forms.gle/s81Dar1YPkkabEg38 रजिस्ट्रेशन झाल्यानंतर खालील WhatsApp link ला जॉईन व्हावे.https://chat.whatsapp.com/HII4h2uugRQGtF7hyWzM6k ही कार्यशाळा सर्व प्राध्यापक, ग्रंथपाल व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे तेव्हा आपण आपल्या महाविद्यालयातील सर्वांना रजिस्ट्रेशन करण्यास सांगणे तसेच ही कार्यशाळा मराठी मध्ये घेण्यात येणार आहे त्याचा उपयोग आपणास नक्कीच होईल.

*पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस यांनी “ युज ऑफ इन्फिबनेट अँड लायब्ररी फॉर कॉम्पेटेटिव्ह एक्झाम” एक दिवशीय राज्यस्तरीय  ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केलेली आहे.* *1. विषय –INFLIBNET चे प्रमुख उपक्रम  (INFLIBNET :MAJOR ACTIVITIES)*        *वक्त्ते :- डॉ. सुधीर नगरकर ग्रंथपाल आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा* *2. विषय –स्पर्धा परीक्षाच्या तयारीसाठी ग्रंथालयाचा वापर (“USE OF LIBRARY FOR PREPARATION OF  COMPETITIVE EXAMS”)*        *वक्त्ते:- श्री अतुल नगरकर ग्रंथपाल दूधसाखर महाविद्यालय बिद्री*  *तारीख 16/6/2023* *वेळ: सकाळी 11.00 वाजता* *रजिस्ट्रेशन लिंक* https://forms.gle/s81Dar1YPkkabEg38  रजिस्ट्रेशन झाल्यानंतर खालील WhatsApp link ला जॉईन व्हावे. https://chat.whatsapp.com/HII4h2uugRQGtF7hyWzM6k  ही कार्यशाळा सर्व प्राध्यापक, ग्रंथपाल व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे तेव्हा आपण आपल्या महाविद्यालयातील सर्वांना रजिस्ट्रेशन करण्यास सांगणे तसेच ही कार्यशाळा मराठी मध्ये घेण्यात येणार आहे त्याचा उपयोग आपणास नक्कीच होईल.

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न* ===========

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न*  ====================== मेढा : 19 मे 2023 " कोणत्याही स्पर्धेत यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते, त्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी असावी लागते त्याशिवाय यश संपादन करता येत नाही " असे मत प्रसिद्ध उद्योजक उदयसिंह चौघुले यांनी व्यक्त केले. जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे  महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उद्योजक मा. उदयसींह चौघुले हे  उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते.यावेळी उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.       याप्रसंगी प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी यांनीही आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.त्यावेळी ते म्हणाले " सातत्यपूर्ण व सुनियोजित प्रयत्न, शिस्त,प्रखर निर्णयक्षमता व जिद्द अंगी बाळगली तर आपले आयुष्य अत्यंत अनुकरणीय व दैदिप्यमान बनविण्यास मदत मिळते " अस

Commerce DAY 2023

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे कॉमर्स डे साजरा* ===================== मेढा : १२/०५/२०२३ येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या वाणिज्य विभागामार्फत “कॉमर्स डे” चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गिरिस्थान महाविद्यालय महाबळेश्वर येथील वाणिज्य विभागप्रमुख डॉ. शरद गोळे  होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही.गिरी होते.तर या प्रसंगी महाबळेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.कदम सर यांची प्रमुख उपस्थिती होती.  कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते वाणिज्य विभागाच्या विध्यार्थ्यानी तयार केलेल्या, पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे उदघाट्न करण्यात आले. यामध्ये ५६ विद्यार्थ्यांनी आपली विविध विषयांवरील पोस्टर तयार केली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. अमेय देसाई यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक केले.त्यानंतर प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. शरद गोळे यांनी "  विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यानंतर जयवंत  हॉल या ठिकाणी “कॉमर्स डे” या कार्यक्रमाअंतर्गत कन्सेप्ट

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे महाराष्ट्र दिन साजरा

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे महाराष्ट्र दिन साजरा… ===================== मेढा : १ मे 2023 येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये एक मे महाराष्ट्र दिन उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही.गिरी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्याप्रसंगी प्राचार्य डॉ.गिरी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले " 1 मे म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना दिवस आज सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. ” मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ,प्रणाम घ्यावा माझा ,हा श्री महाराष्ट्र देशा, राकट देशा ,कणखर देशा ,दगडांच्या देशा ,नाजुक देशा ,कोमल देशा ,फुलांच्याहि देशा ” असे महाराष्ट्राचे सुंदर वर्णन राम गणेश गडकरी यांनी केले आहे .अशा या महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत ,कलावंत ,साहित्यिक ,कलाकार ,गायक ,वादक असे अष्टपैलू जन्मले नि वाढले .हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या मातीतच लढले आणि त्यांनी मराठ्यांचे तोरण उभारले . असे अनेक थोर व्यक्तिमत्व या मराठी मातीत घडले

शशिकांत शिंदे महाविद्यालय स्टेट लेवल बेबीनार संपन्न...

video " स्पर्धेच्या युगामध्ये यश संपादन करण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही " प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी. मेढा दिनांक 28/ 4/ 2023 " सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे स्पर्धेच्या युगामध्ये यश संपादन करण्यासाठी, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि अभ्यासातील सातत्य असेल तर आपणास यश मिळण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही.बँकिंग क्षेत्रातील अनेक करिअरच्या संधी विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्न करीत राहील " असे मत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही. गिरी यांनी व्यक्त केले.         जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढाच्या ग्रंथालय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि युनिक अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पुस्तक दिनानिमित्त,आग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत  "  बँकिंग करिअर करण्यासाठी ग्रंथालयाचा वापर व अभ्यास तंत्रे " या विषयावर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात होते.त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत असताना त्

मेढा - सत्यशोधक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मेढा महाविद्यालयात उत्साहात साजरी

मेढा - सत्यशोधक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मेढा महाविद्यालयात उत्साहात साजरी जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने सत्यशोधक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य मेजर अशोक व्ही.गिरी यांनी महात्मा फुले यांचा जीवनपट उलगडून दाखविताना असे प्रतिपादन केले की,महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.ज्योतीरावांनी 1848 मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली.खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते.महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणून फु

गीता संदेश

गीता संदेश केल्याशिवाय मिळत नाही - मोफत घेणार नाही केलेले फुकट जात नाही - निराश होणार नाही काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे - न्यूनगंड ठेवणार नाही काम करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे. - विश्वास घालवणार नाही ( पांडुरंगशास्त्री आठवले

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात सायन्स फेस्टिवल साजरा

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात सायन्स फेस्टिवल साजरा  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात सायन्स फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रश्नमंजुषा, रांगोळी, फोटोग्राफी, पोस्टर आणि पुष्प रचना यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी किसनवीर महाविद्यालय, वाईच्या वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंजुषा इंगवले ह्या  प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.  त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा चे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. आर. घाटगे, अग्रणी महाविदयालय  योजनेचे समन्वयक श्री. शंकर गेजगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेमध्ये किसनवीर महाविद्यालय, वाई, गिरिस्थान आर्टस् अँड कॉमर्स महाविद्यालय, महाबळेश्वर, लालबहाद्दूर शास्त्री कॉलेज, सातारा, मिनलबेन मेहता महाविद्यालय पाचगणी इत्यादी महाविद्यालयामधून स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. एकूण २

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा,कबड्डी संघाचा प्रथम

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा,कबड्डी संघाचा प्रथम क्रमांक* ============ मेढा 23 मार्च 2023 जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा, नेहरू युवा मंडळ सातारा व यशवंतराव चव्हाण स्कुल ऑफ सोशल वर्क जाकातवाडी सातारा, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला. या कबड्डी स्पर्धा सातारा येथील शाहू स्टेडियम येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण दहा संघानी सहभाग घेतला होता.त्यावेळी अटीटतीच्या व रोमहर्षक झालेल्या या स्पर्धेत,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून,प्रथम क्रमांक प्राप्त केला.महाविद्यालयातील रोहित जाधव, राजेश देशमुख, कार्तिक कासार, ओमकार शेलार, प्रमोद जाधव,अभिषेक शिंदे व पुनीत पवार या खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळी करून हे यश संपादित केले.या सर्व विध्यार्थी खेळाडूंना जिमखाना प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.या यशाबद्दल सर्व खेळाडुंचे संस्था अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, सचिव सौ. वैशाली शिंदे, सर्व विश्वस्त तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य मे

' *सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी' - प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*

' *सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी' - प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*  आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सावित्रीबाई फुले यांचा पुण्यदिन साजरी करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी व उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी असे प्रतिपादन केले की, सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या समाजाला नवीन दिशा देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांशी समरस होऊन त्या शिक्षित झाल्या. पहिली स्त्री शिक्षिका म्हणून आज त्या ओळखल्या जातात. शिक्षण घेतल्यानंतर समाज जागृत झाला पाहिजे यासाठी त्यांनी मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली. वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करला परंतु त्या आपल्या ध्येयापासून वंचित झाल्या नाहीत. त्यांनी शिक्षणाबरोबर सामाजिक जागृती करण्याचा देखील प्रयत्न केला. पुणे येथील भिडे वाड्यात सुरू केलेली पहिली मुलींची शाळा आज एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून उभा आहे. ह

संघर्षातून स्वतःला सिद्ध करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करणे आपले कर्तव्य

संघर्षातून स्वतःला सिद्ध करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करणे आपले कर्तव्य! प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी. ===================== " जगभरात आठ मार्च या दिवशी महिलांच्या कार्याचा,त्यांच्या विचारांचा,त्यांच्या शक्तीचा ,आणि त्यांच्या अस्मितेचा एकूणच त्यांच्या अस्तित्वाचाच गौरव केला जातो.असे असताना आपले महाविद्यालय ज्या मातीवर उभे आहे त्याच जावळीच्या मातीत रुजून फुलून इतरांना फुलविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान करणे महाविद्यालयाची सामाजिक बांधिलकी असून त्याच बांधिलकीला जपताना आज हा सत्कार समारंभ साजरा करत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.संघर्षातून स्वतःला सिद्ध करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करणे आपले कर्तव्य!" असे मत प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी व्यक्त केले. जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन व या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त करताना वरील विचार म

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे ,राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेनेमराठी भाषा गौरव दिन साजरा

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे , राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेने 1मराठी भाषा गौरव दिन साजरा ========≠======== जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील मराठी विभाग,ग्रंथालय व ज्ञानस्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक 27 फेब्रुवारी रोजी,कवी कुसुमाग्रज जन्मदिन व मराठीभाषा गौरव दिनानिमित्त,राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्तरावरील विध्यार्थ्यांच्या ऑनलाईन स्वरचित काव्यवाचन स्पर्धा आयोजित करून, मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.यावेळी स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.अशोक व्ही.गिरी होते.तर उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यावेळी उपस्थित होते. उदघाटनानंतर या दोन्ही मान्यवरांनी, स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.यावेळी प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी सर म्हणाले " भारतात साजऱ्या केल्या जाणार्‍या विविध विशेष दिवसां पैकी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे प्रसिद्ध मराठी लेखक - कुसुमाग्रज यांची जयंती. दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र, भारत आणि जगभरात “मराठी राजभाषा दिन” किंवा “मराठी भाषा गौरव दिन ” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेच्या जडण घडणीत या महान व्यक्त

आमदार शशिकांत शिंदे, महाविद्यालय मेढा, येथेआंतरराष्ट्रीय मातृभाषादिनसंपन्न.

आमदार शशिकांत शिंदे, महाविद्यालय मेढा, येथे आंतरराष्ट्रीय मातृभाषादिन संपन्न. ---------------- मेढा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा,येथे ग्रंथालय ज्ञान स्त्रोत केंद्र व मराठी विभाग यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय मातृभाषादिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून,ग्रंथालयातील अभ्यासिकेत,कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाचन व पुस्तक परीक्षण स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेसाठी एकूण 21 स्पर्धकांनी सहभाग घेतला.सुरुवातीस त्यांनी त्यांना आवडतील त्या पुस्तकांची निवड केली.त्यामध्ये कविता संग्रह,कथासंग्रह, लेखसंग्रह व इतर पुस्तकांचा समावेश करण्यात आला होता. आर्धा तास वाचन व नंतर आर्धा तास परीक्षण लेखन करण्याची संधी या सर्व स्पर्धक विध्यार्थ्यांना देण्यात आली. समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी व उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे उपस्थित होते.यावेळी सहभागी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉक्टर अशोक गिरी यांनी अनमोल मार्गदर्शन केले.त्याप्रसंगी ते म्हणाले, " मनुष्य कितीही

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढाचे चार विद्यार्थी सैन्यात भरती....==============मेढा : दिनांक 8 फेब्रुवारी 23कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या सैन्य भरतीत,येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदेमहाविद्यालयातील विविध वर्ग व शाखेतील चार विध्यार्थी एकाच दिवशी भरती होवून आपले गाव,तालुका व महाविद्यालयाचे नावलौकिकात भर घातली.त्यांच्या या सैन्य भरतीतील उज्वल यशाने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. या सैन्य भरतीत भरती झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत.दर्शन राजेंद्र जाधव, बी.ए.भाग तीन, (जी.डी.आर्मी )आशुतोष राजेंद्र गावडे बी.एस. सी.भाग तीन (जी.डी.आर्मी )ऋषिकेश राकेश जाधव बी.ए. भाग.दोन ( टेक्निकल आर्मी )इंगळे दीपक संदीप बी.एस.सी भाग.तीन ( टेक्निकल आर्मी )या विविध विभागात भरती झाले.या त्यांच्या यशा मागे त्यांची अपार मेहनत,बुद्धिमत्ता आई वडील व महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे अशी प्रतिक्रिया या चारही विध्यार्थ्यांनी दिली.त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब,सचिव सौ. वैशाली शिंदे,संस्थेचे सर्व विश्वस्त,महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी,उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थ्यांनी या चारही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढाचे चार विद्यार्थी सैन्यात भरती.... ============== मेढा : दिनांक 8 फेब्रुवारी 23 कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या सैन्य भरतीत,येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील विविध वर्ग व शाखेतील चार विध्यार्थी एकाच दिवशी भरती होवून आपले गाव,तालुका व महाविद्यालयाचे नावलौकिकात भर घातली.त्यांच्या या सैन्य भरतीतील उज्वल यशाने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. या सैन्य भरतीत भरती झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत. दर्शन राजेंद्र जाधव, बी.ए.भाग तीन, (जी.डी.आर्मी ) आशुतोष राजेंद्र गावडे बी.एस. सी.भाग तीन (जी.डी.आर्मी ) ऋषिकेश राकेश जाधव बी.ए. भाग.दोन ( टेक्निकल आर्मी ) इंगळे दीपक संदीप बी.एस.सी भाग.तीन ( टेक्निकल आर्मी ) या विविध विभागात भरती झाले.या त्यांच्या यशा मागे त्यांची अपार मेहनत,बुद्धिमत्ता आई वडील व महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे अशी प्रतिक्रिया या चारही विध्यार्थ्यांनी दिली.त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब,सचिव सौ. वैशाली शिंदे,संस्थेचे सर्व विश्वस्त,महाविद्यालयाच

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना ( ISO) चे 9001-2015 जागतीक मानांकन प्राप्त*=

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास   आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना ( ISO) चे 9001-2015 जागतीक मानांकन प्राप्त* ================ दिनांक 26 जानेवारी : जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन तथा    आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना,या संस्थेकडून आय.एस.ओ.9001-2015 जागतीक मानांकन आज प्राप्त झाले आहे.त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा,हे सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने प्रमाणित केलेले पहिले महाविद्यालय  ठरले आहे. आज दिनांक 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मंगल प्रसंगी या महाविद्यालयास  "आय. एस.ओ.9001-2015" प्रमाणपत्र वितरण समारंभ पार पडला.यावेळी पुणे येथील आय एस.ओ .संस्थेचे सल्लागार श्री. अनिल येवले यांच्या हस्ते महाविद्यालयाला  आय.एस.ओ.नामांकन प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते.तर विचारपीठावर उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे, आय.एस.ओ चे लेखाधिकारी माननीय संदिप कोठुळे उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना महाव

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात संपन्न

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात संपन्न =================  जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे, भारताचा 74 व्या प्रजासत्ताक दिन उत्साही व आनंदी वातावरणात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.याप्रसंगी उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे व उद्योजक मा. संजय जुनघरे उपस्थित होते. ध्वजारोहण,राष्ट्रगीत,ध्वजगीत व  ध्वजवदंन झाल्यानंतर प्राचार्य डॉ.अशोक गिरी यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले की,  " विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील नागरिकांना,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहून 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशास अर्पण केली व आजच्या दिनी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी,या राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु झाला. तो दिन म्हणजे हा प्रजासत्ताक दिन आज आपण साजरा करत आहोत. संविधानाने आपल्याला समान हक्क दिले आहेत. आपल्या लाभलेले हक्क व कर्तव्यांचा वापर देशहितासाठी करून शांतता,समता व बंधुता ही मूल्ये जोपासावी व आपल्या हक्कांचा

कुस्तीचे जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा 'सिकंदर'

कुस्तीचे जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा 'सिकंदर' घरात असणाऱ्या अठराविश्‍वे दारिद्रातून कुस्तीतला प्रवास करत एका हमालाचा पोरगा अखंड कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. दुनियेचे ओझे पाठीवर वाहणाऱ्या आपल्या बापाच्या कष्टाचे ऋण या यशाने फेडणाऱ्या मल्लाचे नाव म्हणजे सिकंदर शेख. सध्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात रंगतेय. या स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करत सिंकदरने सर्वांची मने जिंकली आहेत. महाराष्ट्रसह देशातील प्रत्येक प्रतिस्पर्धी मल्लांला त्याने आस्मान दाखवत देशातील आघाडीचा मल्ल तो बनला आहे. हमाली करून वडीलांनी पुरवला खुराक...  सिकंदर मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा. घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा. पण या वारशावर दारिद्राची गडद छाया कायमची. घरात वडील रशिद शेख पैलवानकी करायचे. निमगावच्या मगरांच्या तालमीत सरावाला असताना तालीमीची स्वच्छता करायची आणि त्या बदल्यात तालमीतील मल्ल जो खुराक देतील, तो खायचा आणि सराव करायचा. असं सुरू असतानाच वडीलांची प्रकृती खालावली म्हणून रशीद घरी परतले आणि लग्नगाठ बांधली गेली. संसाराचा गाडा हाकत असतानाच दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत कायमच

*स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणास्त्रोतातून युवकांनी ध्येयप्राप्ती करावी: प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी*

*स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणास्त्रोतातून युवकांनी ध्येयप्राप्ती करावी: प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी* आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, इतिहास विभाग व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विशेष व्याख्यान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक डॉ. संग्राम शिंदे हे होते त्यांनी असे प्रतिपादन केले की, स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्र हे आहे. त्यांनी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व स्वीकारल्यानंतर स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले. लहानपणापासूनच त्यांनी व्यायाम खेळ अशा विविध उपक्रमात सहभाग घेतला होता. सामाजिक आणि धार्मिक बाबतीत पुरोगामी विचारांचे आणि दयाळू स्वभावाचे होते. ते पाश्चात्य गुढवादाने प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनी पाश्चात्त्य ज

**तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत आ . शशिकांत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश*मेढा . .

**तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत आ . शशिकांत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश* मेढा . दि . ४ , धुंदीबाबा विद्यालय विद्यानगर सोनगाव या ठिकाणी जावली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धा यशस्वी रित्या पार पडल्या. शिक्षण विभाग -पंचायत समिती जावली मेढा यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या स्पर्धेत आ . शशिकांत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयने तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला .    तृतीय क्रमांक इयत्ता १२ वी सायन्स मधील विद्यार्थी वेदांत जगताप व क्रिश माने यांनी होलोग्राम ( थ्रिडी इमेज ) हा प्रकल्प तयार केला होता त्यांची जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे तर उत्तेजनार्थ क्रमांक रेन वॉटर हार्वेस्टिंग या प्रकल्पाला मिळाला . इयत्ता ११वी च्या साहिल ससाणे व मंथन जगताप यांनी हा प्रकल्प तयार केला होता . सदर विद्यार्थ्यांना विज्ञान विभागाच्या श्रीमती प्रा .ज्योती कदम यांनी मार्गदर्शन केले .  गटविकास अधिकारी श्री रमेश काळे व गटशिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना तोडरमल व शिक्षण विस्तार अधिकारी श्री . चंद्रकांत कर